ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" आपल्या भक्तीची गुणवत्ता म्हणजे आपल्या मनोदशेचे थेट प्रतिबिंबच होय . "
पुष्प ३४ पुढे सुरु
केवढी महान साधना ! मनुष्य हे करू शकतो का ? परमेश्वर आता आला आहे आणि तो संपूर्ण विश्वाचे भारतातील प्राचीन वेदिक कालामध्ये परिवर्तन करणार आहे. यासाठी त्याने त्याचे पायाभूत कार्य पूर्ण केले व लोकांना परमेश्वराचा स्वाद घेण्याची संधी दिली. आध्यात्मिक जागृती करून त्याने लोकांचे पोषण केले. अशा तऱ्हेने अनेक जण जागृत झाले. आता सर्वांनी अखंड साधना करून स्वतःला प्रशिक्षित केले पाहिजे आणि ज्ञान संपादन केले पाहिजे.
त्या कासवाच्या कवच्यावर सर्वत्र V होते आणि मधोमध एक मोठे हृद्य होते. सर्वांना ज्ञानाप्रत घेऊन जाणाऱ्या साधनेचे प्रात्यक्षिक दर्शविण्यासाठी मी येथे आले आहे. यासाठी स्वामींनी हा पुरावा दिला. तुम्हाला कदाचित असे वाटेल की स्वामींची संघटना जगभर हेच कार्य करत आहे मग तुमच कार्य काय ? जेव्हा मी स्वामींच्या आणि माझ्या भावविश्वाबद्दल लिहिते तेव्हा आमचे भाव गर्भगृहातून बाहेर पडून स्तूपाद्वारे विश्वामध्ये परिवर्तन घडवत आहेत. या कारणासाठी मी लेखन करते .
जय साईराम
व्ही.एस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा