ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" जेथे जेथे आपली दृष्टी जाते तेथे आपले मन जाते आणि इच्छांचा उदय होतो. "
पुष्प ३७ पुढे सुरु
भीष्म , द्रोणाचार्य आणि कृपाचार्य हे महान गुरु होते. कृष्ण म्हणाला की या तिघांनीही एकेक चूक केली होती. आपण अजून अशी काही उदाहरणे पाहू. युधिष्ठीर हा धर्मराज होता. तो धर्ममार्गावरून कधीही ढळला नाही. परंतु महाभारत युद्धाच्या वेळी तो मोठ्याने ओरडला, " अश्वत्थामा हतह कुंजरवा (अश्वत्थाम्याचा मृत्यू झाला ). " त्यानंतर अगदी मृदू आवाजात तो उद्गारला " हत्ती अश्वत्थामा ." या पापकर्मांसाठी धर्मराजाला त्याच्या अंतिम यात्रेत नरकाचा अनुभव घ्यावा लागला. अंतिम यात्रेवर निघालेल्या पांडवांचे एकामागोमाग एक पतन झाले. द्रौपदीला इतर चार भावांहून अर्जुन अधिक प्रिय होता त्यामुळे प्रथम द्रौपदी पडली. हे तिचे पापकर्म होते. दुसरा सहदेव पडला, कारण त्याला त्याच्या शास्त्रपुराणांविषयी असणाऱ्या विद्वत्तेचा किंचित अहंकार होता. स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार नकुलच्या पतनास कारणीभूत झाला. सर्वश्रेष्ठ धनुर्धर असण्याचा अहंकार अर्जुनाच्या पतनास कारण ठरला होता. भीमाचे पतन त्याला असणाऱ्या अफाट शक्तीच्या अहंकारामुळे झाले.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा