ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" केवळ परमेश्वराला स्पर्श केल्याने आपल्याला चिरंतन शांतीचा लाभ होतो."
वसंतामृतमाला
पुष्प ३७
मी परमेश्वर नाही
…. " अम्मा , तुमच्या सान्निध्यात राहणारे आम्हीही चुका करतो, त्याचे काय ? "
मी उत्तरले, " पहिली गोष्ट म्हणजे मी परमेश्वर नाही. " अनेकजण माझ्याशी कठोर शब्दात बोलले, त्यांनी माझ्याशी वादविवाद केला ; मला टाकून बोलले. परंतु माझ्या मनात त्यांच्याविषयी काही किल्मिष नाही. मी माता आहे. मुलांनी केलेल्या चुकांचा बाऊ न करता आई त्यांच्या चुका पोटात घालून त्यांना क्षमा करते तर वडील कठोरपणे शिक्षा करतात. अखिल जगताची पापकर्म घेण्यासाठी मी येथे आले आहे. मी परमेश्वर नाही. परमेश्वर केवळ साक्षीभावात स्थित असतो. तो करुणा दाखवत नाही. माझे हृद्य करुणेने ओतप्रोत आहे. यामुळेच मी येथे येऊन क्लेश सोसते आहे.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा