ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" सत्य मनाला निर्मल बनवते सत्य वचन ही अंतर्शुद्धी आहे. "
पुष्प ३७ पुढे सुरु
माझ्या डाव्या गुडघ्यामध्ये तीव्र वेदना होत होत्या; वेदनांची तीव्रता वाढत होती तरीही मी माझे दैनंदिन कामकाज तसेच चालू ठेवले.
२१ मे २०१३ मध्यान्ह ध्यान
वसंता - स्वामी, माझा गुढघा खूप दुखतोय. मी माझी काया तुम्हाला अर्पण करायला हवी. परंतु ही काया डॉक्टरांच्या औषधांनी भरली आहे. तुम्ही मनात आणलेत तर ही क्षणभरात बरी होईल.
स्वामी - ही व्याधी डॉक्टर बरे करू शकतील कां ? हे जगाच्या पापकर्मांमुळे होत आहे. योग्य वेळ येताच हे बरे होईल.
वसंता - स्वामी, आता ही गुढघेदुखी कशासाठी ? यामागे काही कारण आहे कां ?
स्वामी - संध्याकाळी मी तुला एक गोष्ट सांगीन.
ध्यान समाप्त
आता आपण याविषयी जाणून घेऊ. मला माझी काया स्वामींना समर्पित करायची आहे. परंतु या देहाला रोज नवीन रोगबाधा होते. या अगोदरही मला थोडी गुडघेदुखी होती. विमलने मालिश केल्यानंतर दुखायचे थांबले होते पण यावेळी नाही.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा