ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" जर मनाने भगवद् नामाच्या अमृताची चव चाखली तर ते इतर कोणत्याही चवीचा विचार करणार नाही. "
पुष्प ३७ पुढे सुरु
दुसऱ्या दिवशी श्री विलीपुदूरच्या डॉक्टर आल्या. त्यांनी माझ्या गुडघेदुखीविषयी विचारपूस केली. यावेळी त्यांनी इन्फ्रारेड लॅम्प आणला होता. तो कसा वापरावा हे त्यांनी दाखविले. गुडघ्याला मालीश करून त्यावर मलम लावावे व नंतर बँडेज करावे असे सांगीतले. लॅम्प १० मिनीटे वापरावा, नंतर बर्फाच्या पिशवीने शेकावे अशा सूचना देऊन ते परत गेले. वडक्कमपट्टीला मी होते तेव्हापासून डॉ. षण्मुगलक्ष्मी माझ्याकडे येत असत. आता त्या मुक्ती निलयमला दर रविवारी येतात. एकदा त्यांचा एक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असताना त्यांनी आश्रमात फोन केला. एडींनी लगेचच स्तूपापाशी जाऊन प्रार्थना केली. रुग्ण बरा झाला. अशा रुग्णांसाठी त्या नेहमीच फोन करतात. साधारणपणे अशावेळी फक्त रुग्णांवर मानसिक ताण असतो पण इथे या डॉक्टर सुद्धा ताण सहन करतात. त्यांची माझ्यावर अपार श्रद्धा आहे. मी नेहमी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. दर आठवड्याला इथे येउन त्या स्वामींचे दिव्य संदेश वाचतात. जेव्हा स्वामी एखादा श्लोक देतात तेव्हा तो लिहून घेऊन त्या त्याचे उच्चारण करतात. त्यांचे समस्त कुटुंब अत्यंत भक्तिशील आहे. त्यांचे पती डॉ. लक्ष्मण सध्या पुढील शिक्षणासाठी चेन्नैमध्ये आहेत. ते श्रीविलीपुदुरला आले की आवर्जून येथे येऊन जातात.
जय साईराम
व्हि. एस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा