गुरुवार, ११ जून, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" आपले भाव आपल्या जीवननिर्मितीस जबाबदार असतात ."

पुष्प ३८ पुढे सुरु 

                देव शर्मांविषयी मी स्वामींना विचारले तेव्हा श्रीविलिपुदूरचे डॉक्टरच देव शर्मा आहेत असे स्वामी म्हणाले. या डॉक्टरांनी इथे येऊन माझ्या गुडघ्यावर उपचार केले. गतजन्मी ते देव शर्मा होते. तेव्हा त्यांनी स्वतपश्चर्येने शिवशक्तीस प्रसन्न करून घेऊन त्यांची कृपा प्राप्त केली. यामुळेच त्यांचे कुटुंब आमच्या संपर्कात आहे. हे कुटुंब अतिशय श्रद्धावान व भक्तिमान आहे. त्यांचे अवघे कुटुंब डॉक्टर आहे. ते येथे सहकुटुंब येतात, येताना आंडाळचे गाव श्रीविलिपुदूरहून एक हार घेऊन येतात. 
                माझ्या जीवनाचा आंडाळशी घनिष्ट संबंध आहे. डॉ. कुटुंबाने माझ्याशी संबंध जोडले आहेत. यावरून असे दिसून येते की गतकाळात केलेली सत्कर्मे आपल्याकडे परत येतात. गतजन्मी त्यांच्या वेदना मी घेतल्या. या जन्मात ते माझ्या वेदनांवर उपचार करतात. कितीही युगांपूर्वी तुम्ही केलेली सत्कर्मे तुमच्याकडे परत येतात हे यावरून सिद्ध होते. याप्रमाणे दुःष्कर्मही तुमच्याकडे परत येते. म्हणून जागे व्हा ! या मायाजालातून बाहेर पडा. या जगामध्ये कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. मात्र परमेश्वर सत्य आहे. त्याला धरून ठेवा. अर्जित धन तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. केवळ भगवंताची कृपा तुमच्याबरोबर येते म्हणून त्याच्या कृपेचा ध्यास घ्या, त्याची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….. 

जय साईराम
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा