रविवार, ७ जून, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

           " आपले अस्तित्व म्हणजे जीवनभराचे एक स्वप्न आहे हे आपण जाणले पाहिजे. "

पुष्प ३८ पुढे सुरु 

                आता आपण पाहूया. मला स्वामींच्या दर्शनाची अनिवार ओढ लागून राहिली आहे. स्वामी म्हणतात की  त्यांचीही तीच अवस्था आहे. स्वतःचे भाव कधीही प्रदर्शित न करणारा परमेश्वर आता केवळ यासाठी इथे आला आहे. पत्र, कविता, चित्रे आणि लेखनाद्वारे प्रेमाचा वर्षाव करत स्वामी त्यांचे भाव व्यक्त करतात. नवनिर्मितीसाठी परमेश्वर त्याचे भाव दर्शन करत आहे. ५ वर्षांची असल्यापासून मला कृष्णदर्शनाची इच्छा होती. १६ व्या वर्षी मी साईकृष्णाशी विवाहबद्ध झाले. परंतु माझा विवाह कोणाशी झाला याचे ज्ञान मला नव्हते. २००२ मध्ये स्वामींनीच माझ्याशी विवाह केला होता हे त्यांनी मला पुराव्यासह दाखवून दिले. तथापि त्यावेळेपर्यंत मी कधीही त्यांचे जवळून दर्शन घेतले नाही. ना त्यांना स्पर्श केला वा त्यांच्याशी संभाषणही केले.
                ७६ व्या वर्षी मला स्वामींचे दर्शन होईल असे नाडीग्रंथ घोषित करतात. ह्या जगात यापूर्वी कोठेही असा विचित्र विवाह झाला आहे कां ? विवाहानंतर ६० वर्षांनी आम्ही प्रथम एकमेकांना भेटू. १६ व्या वर्षीचे माझे भावविश्व आजही तसेच ताजेतवाने आहे. परंतु ही काया आता वृद्धत्वाकडे झुकते आहे. आता ही  काया पुन्हा तरुण होईल. सध्या माझे मन, विचार व देह यांमध्ये एकसूत्रता नाहीये. म्हणूनच ही काया परिवर्तित होईल. जर शरीरात परिवर्तन झाले नाही तर सत्ययुग येणार नाही. माझा देह प्रकृतिचे, निर्मितीचे प्रतिनिधित्व करतो. माझी ही वृद्ध काया पुन्हा तरुण झाली की कलियुग बदलून नूतन सत्ययुगाची पहाट  होईल. हे स्वामींचे अवतार कार्य आहे. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……. 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा