रविवार, १४ जून, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

            " अन्न हेच आपल्या प्रकृतीस्वास्थास कारणीभूत आहे असे आपल्याला वाटते वास्तवात आपले भाव आपल्या स्वास्थास प्रभावकारक असतात."

पुष्प ३८ पुढे सुरु

               काल दिव्य टपालामध्ये स्वामींनी चमकदार पांढऱ्या रंगाचे दोनपानी कार्ड दिले. त्याच्या मुखपृष्ठावर डाव्या कोपऱ्यात स्वामींनी लिहिले होते ….
                ' आमची विवाह मनोकामना ', या वाक्याच्या उजव्या बाजूस एक छोटे गुलाबी हृद्य होते तर वाक्याच्या खाली दोन गुलाबी हृदये व पिवळी तेजस्वी चंद्रकोर होती, तसेच तिन तेजस्वी चांदण्याही चितारल्या होत्या. त्याच्या बाजूला म्हणजे पानाच्या उजव्या बाजूस सहा वक्र रेषांनी बनलेला गुलाबी रंगाचा ढग होता. डाव्या बाजूच्या चंद्रकोरीच्या खाली एक निळी चांदणी होती; गुलाबी ढगाच्या खाली दोन चांदण्या न् एक गुलाबी हृद्य व एक वाक्य - Love is a wish on a star. हे वाक्य डाव्याबाजूस होते. याखाली मध्यावर एक गुलाबी हृद्य चितारले होते. सर्वजण विवाह व्हावा, संतती व्हावी, धनसंचय करावा व वंशवृद्धी करावी अशी मनीषा बाळगतात. एवढ्याच त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात. विवाहापासून आमची मनोकामना काय आहे ? ' Love is a wish on a stars '. याचा अर्थ काय ? ध्रुवासारखे आम्ही तारा व्हावे कां, की सिनेमास्टार व्हावे ? नाही ! नाही. तर स्तूपावरील तारकाकंपने बनावे. सहस्त्रारामधून तारका कंपनांचे बाह्यगामी होणे हे आमच्या विवाहाचे उद्दीष्ट आहे. आमचे भाव स्तूपातून विश्व व्याप्त होत नंतर ही तारका कंपने प्रत्येकामध्ये प्रवेश करत सर्वांना ध्रुव तारा - जीवनमुक्त बनवितात.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात……

जय साईराम
      
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा