ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" ईश्वर प्रेम आहे, ह्या प्रेमाची अभिव्यक्ती हा मानवधर्म आहे. "
पुष्प ३८ पुढे सुरु
२४ मे २०१३, मध्यान्ह ध्यान वसंता - स्वामी, ८ कागदी बटणे व एक खरे बटण याचा अर्थ काय ?
स्वामी - आपण वैकुंठामधून भूतलावर येऊन एकमेकांशी सांधले. बटणाने भूलोकाला वैकुंठाशी जोडले. वैकुंठ भूतलावर उतरले. एकाचे दोन झाले.
वसंता - आता मला समजले. मी लिहीन.
ध्यान समाप्त
आठ बटणे वैकुंठाचे द्योतक आहेत. वैकुंठामधून अवतरलेल्या स्वामीनी मला त्यांच्यापासून वेगळे करून येथे आणले. एक खरे बटण भूतलास वैकुंठाशी जोडते. आम्हा दोघांचा योग होतो. आता या १००० वर्षांत होणारे सर्व विवाह परिपूर्ण असतील; सत्य आणि प्रेम यांचे विवाह होतील. हे सर्व आमच्या भावविश्वाद्वारे घडणार आहे.
चंद्रकोर शिवाचा निर्देश करते. ही नवनिर्मिती आमच्या हृदयातून विश्व ब्रम्ह गर्भ कोटम् मधून आकारास येईल व स्तूपाद्वारे बाह्य जगात दृश्य होईल. म्हणून स्वामी म्हणतात, " तुझा विवाह परिपूर्ण असेल अशी आम्ही आशा करतो. स्वामीनी भगवान शिव कां दाखवले ? कारण सर्वांची कुंडलिनी हे शिवशक्तीचे प्रतिक आहे. सर्वांमधील सुप्तावस्थेत स्थित असणाऱ्या शक्तीचे मूलाधारातून उत्थान होऊन आज्ञाचक्रात शिवाशी संयोग होईल. ही जीवनमुक्त अवस्था आहे. म्हणून अंतर्विवाह व बाह्यविवाह दोन्ही एक आहे.
. . .
स्वामीना मी ध्यानात विचारले…
वसंता - हे तुम्ही दिले का ?
स्वामी - हो. हे तुझे जीवन आहे. आंडाळ व रंगनाथाच्या विवाहासारखे. हे आपल्या विवाह दिनासाठी आहे.
ध्यान समाप्त.
या अध्यायात मी हेही लिहिले आहे की सत्ययुगात स्वामी आणि मी सर्व विवाहांना आशीर्वाद देऊ. आंडाळ आणि रंगनाथ. विवाह आणि ऐक्य, संयोग याचे प्रतिनिधित्व करतात.
होसूरहून मोहना व त्यांचे कुटुंबिय आले. त्यांनी आमच्या विवाह दिनानिमित्य साडी आणि परकर आणला. त्यावर लिहिले होते. सत्यम वसंतम ७ भाग. जेव्हा ते साडी खरेदीला दुकानात गेले तेव्हा तेथे एक व्हॅन आली त्यावर लिहिले होते अम्मांचे आशीर्वाद आणि त्यांनी घेतलेल्या साडीवर लिहिले होते वा-भाव-सिल्क मिल्स आणि त्या दुकानाचे नाव होते ॐ .
जय साईराम
व्ही. एस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा