गुरुवार, १८ जून, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

           " जर आपले भाव शुद्ध असतील तर आपण शक्ती आणि उत्साह दोन्हीचा आनंद घेऊ शकतो. "

पुष्प ३८ पुढे सुरु

               कार्डच्या आतील पानावर थोडे डावीकडे एक गुलाबी हृद्य व एक चांदणी होती. त्याखाली लिहिले होते…
a smile at the end 
of a rainbow ….
या वाक्याखाली स्वामीनी एक इंद्रधनुष्य चितारले होते. गुलाबी पिवळसर सूर्यापासून दृश्यमान झालेले इंद्रधनुष्य दोन मेघांमध्ये लय पावले होते. सूर्याला १९ किरणे होती. माझ्या १९ गुणांमुळे सर्व घडत आहे असे सुचित केले आहे. सुर्याखाली एक छोटेसे निळे हृद्य होते तर ते दोन मेघ निळ्या व गुलाबी रंगात होते. यांखाली ' A warm hug ' लिहिले होते. त्याखाली डाव्याबाजूला एक मोठे गुलाबी हृद्य तर एक छोटे निळे हृद्य चितारले होते. गुलाबी स्वामींच्या हृदयात s s असे लिहिले होते. निळ्या हृदयाच्या उजव्या बाजूला निळे फुलपाखरू व विलयनाच्या ( जांभळ्या ) रंगाची दोन फुले व सात पाने होती. आमचे सत्य व प्रेम भाव स्तूपाच्या सात चक्रांमधून बाहेरील जगात पसरून सर्वांना अमृत पान करणाऱ्या फुलपाखरांमध्ये परिवर्तित करतात. आता आपण तिसरे पान पाहू. 
               सर्वात वर दोन टोकांकडून पक्षी एकमेकांच्या दिशेने उडत येत आहेत. त्या पक्षांच्या मध्ये थोडे खाली लिहिले होते …
… and a happy bride 
And groom !
या खाली डाव्याबाजूला एक छोटुकला गुलाब तर उजवीकडे एक छोटेसे निळे हृद्य. त्या खाली विलयनाच्या रंगात दोन मोठी हृदये. यांच्या खाली आठ वक्ररेषांचा एक पुष्ट ढग. याच्या खाली उजव्या बाजूला एक वाक्य ……
Hope your
Wedding day
Is perfect.
या खाली मनगटावर कंकण बांधून पुढे केलेला एक हात. आता आपण कार्डच्या मलपृष्ठावर काय होते ते पाहू ; पानाच्या तळाशी मध्यावर एक मोठे भगवे हृद्य होते. याच्या उजव्या बाजूस आठ कागदी बटणे तर एक खरे बटण. हृदयावर किंचित डावीकडे दोन एकत्र जोडलेल्या घंटा होत्या. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….. 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा