ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" ईश्वराभिमुख केलेले तुमचे भाव तुम्हाला परमेश्वर बनवतात. "
वसंतामृतमाला
पुष्प
३९
एकलव्य
- साधकांचा
गुरु
आज स्वामींनी एका कार्डाच्या आतल्या पृष्ठावर एक श्लोक लिहिला. आम्हाला त्याचा अर्थ मिळाला नाही. २५ मे २०१३ ला जे.पींच्या एका मित्राने ई-मेल केला व हा श्लोक श्री शंकराचार्यांनी रचलेल्या गोविंदाष्टकम् मधील आहे असे कळवले. मी स्वामींना विचारले की याविषयी मी कसे लिहावे ? त्यांनी वसंतामृतमालेमध्ये लिहिण्यास सांगीतले. स्वामींनी दिलेला श्लोक खाली देत आहे.
गुरुचरणाम्बुज निर्भरभक्तः
संसारादचिराद् भवः मुक्तः
सेंद्रिय-मानस नियमादेवं
द्रक्ष्यसि निज हृदयस्थं देवम्
हा श्लोक एका कार्डाच्या आतल्याबाजूत लिहिला होता. मुखपृष्ठावर तिन पिवळी सूर्यफुले होती. एक विकसित फुल तर दोन कळ्या. मागच्या बाजूस ' हे कार्ड आतमध्ये कोरे आहे ' असे लिहिले होते. त्या कोऱ्या जागीच स्वामींनी श्लोक लिहिला. आता आपण श्लोकाचा अर्थ पाहूया. गुरूंच्या चरणकमली तुम्ही शुद्ध भक्तीने समर्पित झालात तर लवकरच तुम्ही या संसारसागरातून मुक्त व्हाल. मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवून आपल्या हृदयात परमेश्वराची अनुभूती घ्याल.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा