ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
पुष्प ३८ पुढे सुरु
एकदा स्वामी म्हणाले,
' तुझ्या अश्रूंनी तू जगाला पापमुक्त करत आहेस. या पापकर्मांपासून मुक्त होण्याचा अन्य कोणताही मार्ग नाही. तुझ्या अश्रू व प्रेमाद्वारे पापक्षालन करण्यासाठी तू इथे आली आहेस. हा अवतारकार्याचाच भाग आहे.' असे आहे माझे जीवन.
२३ मे २०१३ ध्यान
वसंता - स्वामी, मला तुमच्या सुंदर सुमुखाचे दर्शन केव्हा होईल ? तुमचे पदलालित्य कधी माझ्या नजरेस पडेल ? हे पाहण्याची इच्छा मला बाल्यावस्थेपासून आहे.
स्वामी - मी लवकरच येईन; तू अनुभूती घेशील.
वसंता - स्वामी, १६ वर्षाची असल्यापासून मी ज्यांच्यावर प्रेम करते त्यांना मी वयाच्या ७६ व्या वर्षी तरी पाहू शकेन कां ? माझे मन रसरशीत आहे. तरुणपणातील माझे विचार आजही तसेच ताजे आहेत. पण माझ्या कायेला वार्धक्य आले. माझ्या देह मनात समन्वय नाहीये.
स्वामी - यत् भावम् तत् भवति …. या उक्तीनुसार तुझा देह परिवर्तित होईल. आपण निश्चितच अनुभूती घेऊ. मी ही तुझ्यासाठी तळमळतो आहे. परमेश्वराला तळमळ लावणारी तू पहिली स्त्री आहेस. म्हणून आपण सगळ्याची अनुभूती घेऊ.
वसंता - स्वामी, देव शर्मा कोण ?
स्वामी - श्रीविलीपुदूरचे डॉक्टर; म्हणूनच त्यांना अधून मधून चालताना त्रास होतो. आता त्यांनी तुझ्यावर उपचार केले.
वसंता - आता मला सगळ्याचा उलगडा झाला.
ध्यान समाप्त.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा