गुरुवार, ३० जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

            " संचित तपफल हे बँकेतील व्याज देणाऱ्या बचती सारखे असते." 

पुष्प ४० पुढे सुरु 

                 स्वामींनी मला नाडीग्रंथ पहावयास सांगितले. आमचे दोघांचेही नाडीग्रंथ स्वामी परत येणार असल्याचे घोषित करतात. कोणत्या कारणांसाठी स्वामींनी देह त्यागला हे यानंतरच स्वामींनी सांगितले. त्यांनी मला हे सांगून लिहायलाही लावले. आता मी ह्या चौथ्या साईविषयी लिहिते आहे. आता येऊ घातलेले स्वामी साक्षी भावात नसतील. ते, अवघे विश्व एका छत्राखाली आणतील. माझे अश्रू व विलाप यांमुळे येणारे ते प्रेमस्वामी आहेत. आता १४ भुवने वसंतमयम् होतील. हे दाखविण्यासाठी त्यांनी V काढले. 
                त्याच्याबाजूला अग्निचे चिन्ह होते. हे नूतन सृष्टी अग्निनिर्मित असल्याचे सुचित करते. माझ्या पातिव्रत्याच्या अग्निपासून ही निर्मिति जन्मेल. या पातिव्रत्याने स्वामींखेरीज कोणालाही कशालाही स्पर्श केलेला नाही. 
                राम, कृष्णा सारखे सर्व अवतार येथे अवतरले . तथापि धाकला राम, धाकला कृष्ण, छोटा शिव, छोटा ब्रम्हा नव्हते. केवळ साई अवतारातच धाकला साई आहे. हा झेरॉक्स कॉपीसारखा, तंतोतंत तोच . सत्य युग ही सत्यसाईंची झेरॉक्स कॉपी आहे. सर्वकाही साई आहे. कोणत्याही अवताराने निर्मिती नूतन बनविली नाही. या परमेश्वराचे महाकाव्य मोठे विलक्षण आहे. कोणत्याही युगात हे घडलेले नाही. म्हणून मायेमधून जागे व्हा ! धाकटा परमेश्वर बनण्याचा प्रयत्न करा. 

                                      जय साईराम 

रविवार, २६ जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

            " जीवाने इच्छा वासनांपासून रिक्त झाले पाहिजे आणि अस्तित्वासाठी अहंकाराचा नाश केला पाहिजे." 

पुष्प ४० पुढे सुरु 

आता 13D 
                 याचा अर्थ असा की एक सत्य तीन झाले. एक परमेश्वर तीन बनला. परमेश्वर, त्याची शक्ती व नवनिर्मिती, हे तिन्ही एकच आहे. हे असे असल्यामुळे स्वामींनी 3 D लिहिले. म्हणजे तिन्ही दैवी आहेत. 
अजून एका कापडावर खालील मजकूर होता. 
              Vighnesh  i with  an SA inside, 414 VV and V on its side. 
                विघ्नेश हे विघ्नहर्त्या विनायकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी स्वामींनी लिंगाला आलिंगन देणाऱ्या विनायकाचे चित्र दिले. त्या लिंगाच्या आत माझे रूप दिसत आहे. विनायक मला दोन्ही हातांनी आलिंगन देत आहे. त्याच्या एका हातात असलेल्या दीपामध्ये स्वामींचे रूप दिसत आहे. स्वामींचा नवीन देह हलाहल पचविणाऱ्या शिवापासून येणार आहे. अशा रीतीने विनायक सर्व विघ्नांचे हरण करून स्वामींच्या पुनरागमनास सहाय्य करत आहे. 
                आता आपण i या अक्षराविषयी पाहू. या अक्षराच्या आत S व A ही अक्षरे दिसत आहेत. ही  तिन्ही एकवटून साई शब्द तयार होतो. म्हणजेच चौथे साई येत आहेत. स्वामींनी आता पर्यंत शिर्डीसाई, सत्यसाई व प्रेमसाई हे साईंचे तीन अवतार घोषित केले आहेत. स्वामी स्वतः हे तीन अवतार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सर्व जगाला ज्ञात आहे. तथापि देहत्याग केल्यानंतर ते पुन्हा त्याच साईंच्या रुपात येणार असल्याचे कोणालाही माहित नाही. पूर्वी स्वामींनी सांगितले होते की ते वयाच्या ९६ वर्षापर्यंत या देहात राहतील, परंतु वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी देह त्यागला. परमेश्वराची वाणी खोटी कशी ठरेल ? यासाठी मी करूण विलाप करते आहे . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……. 

जय साईराम

गुरुवार, २३ जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" परमेश्वर ना नर आहे ना नारी. वास्तविक त्याला लिंग नाही." 

पुष्प ४० पुढे सुरु 

 दुसऱ्या कापडावर खालील मजकूर होता. 
Night ( तमिळमध्ये ) Meet tex 
13 D 
         मला याचा अर्थ न उलगड्ल्याने मी स्वामींना विचारले. 
२ जून २०१३ प्रातध्यान 
वसंता - स्वामी , ' Night Meet tex ' याचा अर्थ काय ? 
स्वामी - Night Meet म्हणजे उषःकाल . Night कलियुगाचा संबोध करते व Morning सत्ययुगाचा. या दोन युगांचा संगम म्हणजे उषःकाल. या मजकुराद्वारे कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन कसे होते हे आपण जगास दर्शवू. 
वसंता - स्वामी, किती विलक्षण ! स्वामी, आकाशरत्न म्हणजे काय? 
स्वामी - तू भूतलावर अवतरलेले आकाशरत्न आहेस. 
वसंता - मला समजले स्वामी, आता मी लिहीन. 
ध्यान समाप्त 
              Night Meet म्हणजे रात्र जेव्हा दिवसाला भेटते, उषःकाल रात्र कलियुगाचे रूपक आहे. आता रात्र सरून पहाट उषःकाल म्हणजे सत्ययुग उदयास आले आहे. चतुर्युगांपैकी कलियुगामध्ये घनघोर अंधःकार असतो. या युगात सर्वांचे धर्ममार्गावरून अधःपतन होते. धर्माचा ऱ्हास होऊन दुराचार फैलावतो. स्वामी कलियुगामध्ये सत्ययुग आणण्यासाठी येथे आले. तो महामहीम अवतार येथे आला, त्याने केवळ भारतातच नव्हे तर समस्त विश्वामध्ये भारताच्या सनातन धर्माचे पुनरुत्थान केले ; धर्मसंस्थापना केली. स्वामींनी, ८४ वर्षे मानवाला जीवन कसे जगावे याची शिकवण दिली. जगाची सर्व पापकर्मे आपल्या अंगावर घेत देहत्याग केला. आता स्वामी पुन्हा येत आहेत. त्यांच्या आगमनानंतर हे युग नवनिर्मितीमध्ये परिवर्तित होईल. सर्वांमध्ये परिवर्तन होण्यास सुरुवात होईल. कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन कसे होईल हे मी माझ्या सर्व पुस्तकांमधून लिहिले आहे. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम

रविवार, १९ जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

           " परमेश्वर आपले अधिकाधिक प्रेम भक्षण करून हृद्य गुंफेमध्ये तेजाने तळपतो." 

पुष्प ४० पुढे सुरु 

* Junior GG SOS 18 - १८ योगांद्वारे पूर्ण परिवर्तन होईल. या योगांचे अनुसरण करणारा परमात्म स्वरूपास प्राप्त होईल. सर्वजण परमेश्वराची लेकरे आहेत. 26 GG  म्हणजे परमेश्वर + त्याची देवी, शक्ती. परमेश्वर व त्याची शक्ती २६ तत्वांसहित मानवी देहात इथे विद्यमान आहेत. नवनिर्मितीमध्ये सर्व त्याच्या भावविश्वांमधून  जन्म घेतील. म्हणून स्वामी म्हणाले, " Junior 26 GG - सर्वजण धाकटे देवदेवता म्हणून जन्म घेतील. ते त्यांच्या जीवनात गीतेच्या १८ अध्यायांचे अनुसरण करतील. आमच्या भावविश्वांमधून जन्मल्यामुळे ते धाकले देवदेवता आहेत. स्वामींनी Junior का लिहिले ? कारण मी या अगोदर प्रल्हादावर एक अध्याय लिहिला आहे. प्रल्हाद सदैव ' ॐ नमो नारायणाय ' हा मंत्र जपत असे हे मी त्यात लिहिले आहे. त्याची ईश्वरावर पूर्ण श्रद्धा होती. त्यामुळे या मंत्रजपाने त्याला सर्व संकटांपासून तारले. जर त्याच्या मनात श्रद्धा नसती तर तो छोटा हिरण्यकश्यपू  झाला असता. जसे हिरण्यकश्यपूचा पुत्र म्हणजे छोटा हिरण्यकश्यपू तसे परमेश्वराचा पुत्र म्हणजे छोटा परमेश्वर. म्हणूनच स्वामींनी धाकला परमेश्वर असे लिहिले. नवनिर्मितीत सर्वांचा जन्म आमच्यापासून होईल, सर्व आमची संतती असेल. सर्वजण जीवनमुक्त असतील. सर्व पुरुष सत्य साई तर सर्व स्त्रिया वसंता म्हणून जन्मतील. याचा अर्थ असा की, त्यांच्या मनात केवळ सत्य आणि प्रेम हे भाव असतील. त्यांचे विचार, उच्चार अन्  आचार यांमधून सत्य आणि प्रेम अभिव्यक्त होईल. सर्वजण साईपुत्र असतील.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात..... 

जय साईराम
  

गुरुवार, १६ जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार


           " पंचतत्वांचा पंचेंद्रीयांवर थेट प्रभाव पडतो. जर आपण शुद्ध नसलो तर पंचतत्वही त्यांची शुद्धता गमावतात म्हणून पंचतत्वांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आपण प्रत्येकजण जबाबदार आहोत." 
 
पुष्प ४० पुढे सुरु 

                  हे स्त्री व शक्ती यांच्या आकर्षणातून होणारे प्रेम नाही. माझ्या रुपाद्वारे स्वामी स्वतःच स्वतःवर प्रेम करीत आहेत. यासाठीच ज्योतीरूपाने मी त्यांच्यापासून जन्मले. मी पुन्हा ज्योतीस्वरूप धारण करून त्यांच्यात विलीन होईन. हे सिद्धकरण्यासाठीच आम्ही दोघं महिन्याच्या २३ व्या दिवशी जन्मलो. स्वामींनी आमचा जन्मदिवस २३ च का निवडला ? तर ४६ गुणसूत्रे सुचित करण्यासाठी. माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर रामेश्वरमच्या सागरातून कृष्णाची मूर्ती अन् १० रुपयांची नोट आली. त्या नोटेवर लिहिले होते," साई साई राणी " मी साई राणी असल्याचे स्वामींनी सुचविले. वैश्विक मुक्ती हे स्वामींचे अवतार कार्य आहे. 
                   बनियनच्या ५ कापडी तुकड्यांवर स्वामींनी काही अक्षरे व आकडे लिहिले होते. आता आपण याविषयी पाहू. 
पहिल्या तुकड्यावर लिहिले होते - 18
                                                 PT 27
                                                 26 GG 18
                                                 Junior 26 GG  SOS ( on it's side )
                                                           ***
आता याचा अर्थ ….. 
* 18 ही संख्या स्तूपात समाविष्ट असणारे १८ योग आणि मोज्याचे आचरण केले ते भगवत्  गीतेचे १८ अध्याय सुचित करते. स्तूप माझी कुंडलिनी संपूर्ण जगात १८ योग प्रसारित करते. 
* PT - याचा सर्वसामान्य अर्थ आहे. प्लीज टर्न, म्हणजे पान उलटा. पण इथे PT म्हणजे प्रेमाने परिवर्तन. 
* 27 - २७ हा आमचा विवाह दिन आहे . 
* 26 GG - याचा अर्थ परमेश्वराची २६ तत्वे.  मानवी देहात २४ तत्वे असतात. अंतरात्मा त्याच्याशी संलग्न झाल्यावर २५ तत्वे होतात. मानवाने मुक्ती प्राप्त केल्यानंतर त्याचा परमेश्वराशी योग होतो. मानवी शरीरातील २४ तत्वे + अंतरात्मा = २५; २५ + परमात्मा = २६ तत्वे. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम

रविवार, १२ जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

            " जीव त्याच्या १०१ नाड्यांद्वारे आत्मनिवासी परमेश्वराला भक्ती भाव अर्पित करून त्या बदल्यात आत्मज्ञान प्राप्त करतो."

वसंतामृतमाला  
पुष्प ४० 

ज्युनिअर साई 


                 २७ मे २०१३ ह्या विशेष दिनी सत्या पोद्दार माझ्यासाठी एक नवीन गादी भेट म्हणून घेऊन आले. त्याच्या कव्हरवर स्वामींनी पिवळ्या मोठ्या अक्षरात लिहिले होते …… 
A S हृदयाचा आकार 723
SMQ  -   यातील संदेश काय आहे ? 
* A - अम्मांसाठी 
* S - सत्यसाईंसाठी
* हृदयाचा आकार - दोन हृदयांचे मिलन
* 7 - ७ चक्रांद्वारे आमच्या हृदयीचे भाव बाह्यगामी होतात. 
* 23 - ही स्वामींच्या व माझ्या जन्माची तारीख आहे. सत्या पोद्दार बरोबर २७ मे ला ही भेट घेऊन आले, या दिवशी माझा स्वामींशी योग झाला.
* SMQ - सत्य साईंची मुक्ती राणी. ( Satya Sai's Mukthi Queen ) मी या जगात सर्वांना मुक्ती प्रदान करण्यासाठी आले आहे. माझा जन्म स्वामींपासून झाला. हे स्वामींनी आधीच व्यक्त केले आहे, ते असे," माझ्यावर प्रेम करण्यासाठी मी स्वतःस स्वतःपासून अलग केले." 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….. 

जय साईराम 


गुरुवार, ९ जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

           " प्रेमाला लज्जा माहित नाही. कोणतीही गोष्ट प्रेमाला नियंत्रित करू शकत नाही. ते कोणावरही अवलंबून नाही. ते सदा मुक्त असते." 

पुष्प ३९ पुढे सुरु 

                एकलव्य शिकला त्याचप्रमाणे तुमची इष्टदेवता एकामागोमाग एक ज्ञानाची दारे खुली करेल. आत्मविद्या संपादन करणे अनिवार्य आहे. एकलव्याने साधकांना हा विलक्षण मार्ग दाखविला आहे. तुमच्या इष्टदेवतेसमोर बसा, हृद्यपूर्वक प्रार्थना व ध्यान करा ; तो साक्षी भावातील परमेश्वर जागृत होऊन मार्गदर्शन करेल. जीव जोपर्यंत ' महेश्वर ' अवस्थेत परमेश्वरामध्ये विलीन होत नाही तोपर्यंत परमेश्वर त्याच्या जीवनात साक्षी, अनुमन्त, भर्ता, भोक्ता म्हणून प्रकट होत असते. स्वामी आपले एकमेव गुरु आहेत . जगत् गुरु आहेत . मी त्यांचे चरण घट्ट धरून ठेवल्यामुळे मी वैश्विक मुक्ती देऊ शकते. 
                कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन शक्य आहे. सर्वकाही शक्य आहे. सर्व देवदेवतास्वरूप स्वामींच्या चरणी हे सामर्थ्य आहे. कोणत्याही नामरूपाची भक्ती केल्याने तुम्हाला स्वामींची कृपा प्राप्त होईल. कलियुगाला वाचविण्यासाठी हा परमेश्वर इथे अवतरला. अशी संधी पुन्हा कधीही येणार नाही, म्हणून म्हणते आता प्रयत्न करा ! स्वामींनी कार्डावर सूर्यफुले चितारली. एक पूर्ण विकसित फुल तर दोन कळ्या. सुर्यफुल केवळ सूर्यप्रकाशातच उमलते. त्याचप्रमाणे ही वसंताही केवळ साई सूर्यप्रकाशातच उमलली पाहिजे. प्रयत करा. हा ज्ञानसूर्य तुमचे ज्ञानचक्षू उघडेल. अज्ञानाचा अंधार दूर करा. ज्ञानसूर्या  समोर मायेचा अंधार दूर होतो. जागे व्हा ! मायेत गुरफटणे पुरे झाले !
                 सर्व साधकांसाठी एकलव्य एक उत्तम आदर्श आहे. त्याला त्याच्या साधनेची फलाशा नव्हती. त्याने अर्जित केलेले सर्व ज्ञान गुरुचरणी अर्पित केले. एवढेच नव्हे तर गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा कापून देऊन त्याने सर्व कौशल्य ही गमावले. जगासाठी त्यागाचे हे श्रेष्ठ उदाहरण आहे. परमेश्वरासाठी सर्वसंगपरित्याग कसा करावा हे यावरून आपल्याला शिकता येते. द्रोणाचार्यांच्या सगुण नामरूपाने अर्जुनाला धनुर्विद्येचे कौशल्य शिकविले परंतु ' इष्टदेवता ' द्रोणांनी एकलव्याला शिकविलेले कौशल्य हे त्यापलीकडचे होते. ' इष्टदेवता ' सर्वश्रेष्ठ आहे. तिला नामरूपाच्या कोणत्याही मर्यादा नाहीत. 

जय साईराम 

व्ही. एस.

रविवार, ५ जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

            " शुद्ध भाव मानवाला माधव बनवतात. अशुद्ध भाव मानवाला पशु बनवतात ".


 पुष्प ३९ पुढे सुरु




                 या जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून अर्जुन ओळखला जातो. एकलव्याला धनुर्विद्या शिकायची होती. द्रोणांना गुरुस्थानी ठेऊन तो स्वतःच धनुर्विद्या शिकला व अर्जुनापेक्षा अधिक निष्णातही झाला. हे कसे शक्य झाले ? त्याच्या इष्ट देवतेने द्रोणांचे रूप धारण करून त्याला शिकवले. आपणही अशाच पद्धतीने शिकले पाहिजे. सध्याच्या काळात धनुर्विद्या कालबाह्य झाली आहे. आपण आत्मविद्या शिकायला हवी. हीच खरी विद्या आहे. ही विद्या आत्मसात केली तर आपण सहजी भवसागर पार करू शकू. आत्मविद्येसाठी कोणी गुरु नाही. ती गुरुकडून शिकता येत नाही. प्रत्येकाने अथक प्रयत्न करून ती प्राप्त करावी. यासाठी एक गोष्ट अत्यावश्यक आहे. ती म्हणजे नित्य अनित्य विवेक. 
                शाश्वत काय, अशाश्वत, क्षणभंगुर काय याचा आपण अभ्यास केला पाहिजे. केवळ परमेश्वर सत्य आहे आणि आपण त्याला प्राप्त केलेच पाहिजे. यासाठीच केवळ आपल्याला हा मानव जन्म दिला गेला आहे. परमेश्वराव्यतिरिक्त सर्व नातीगोती अशाश्वत आहेत. हे शिकविण्यासाठी तो महान अवतार इथे अवतरला. त्यांची शिकवण अनुसरून आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होऊ शकतो. तुमचा बहुमुल्य वेळ तुम्ही कथाकादंबऱ्या वाचण्यात वाया  घालवू नका. रामायण, महाभारत वाचणे अवघड वाटत असेल तर, स्वामींची पुस्तके वाचा. त्यांची शिकवण तुमच्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करा. तुमचे मन न् इंद्रियांना बाह्य गोष्टींच्या मागे भटकू देऊ नका. सर्व ईश्वराभिमुख करा. अशा पद्धतीने आचरण केलेत तर तुमची इष्टदेवता तुम्हाला मार्गदर्शन करेल.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात  ….. 

जय साईराम

गुरुवार, २ जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" प्रेम हवेला शुद्ध बनवून, पृथ्वीला मंगल बनवते. "

पुष्प ३९ पुढे सुरु

               पराकोटीच्या श्रद्धेमुळे त्याच्या मनाने गुरु हाच भगवंत हा भाव निर्माण केला; त्यामुळे त्याला दुसऱ्या भगवंताची गरज कुठे ! ही अति उच्च मनोवस्था आहे. अजून एकदा सर्वजण कावेरी नदी पार करत होते. त्यावेळी रामानुजांनी पादत्राणे काढून नम्बीच्या हाती दिली. रामानुज एक ट्रंकेमध्ये सर्व मूर्ती व पूजा साहित्य ठेवत असत व दररोज त्या मूर्तींची पूजाअर्चा करत. ती ट्रंक नम्बीनी शिरावर घेतली होती. तीर पार केल्यावर रामानुजांनी नम्बीकडे पादत्राणे मागीतली. नम्बीनी ट्रंक शिरावरून उतरवून त्यात ठेवलेली पादत्राणे काढून दिली. रामानुजांना धक्काच बसला, ते त्याच्यावर ओरडले, " हे तू काय केलेस ? माझी पादत्राणे देवाच्या ट्रंकेत ?" नम्बी शांतपणे उत्तरला," माझा देव तुमच्या देवाहून कमी नाही !" केवढी ही महान भक्ती ! ही उदाहरणे परमेश्वराचे चरण घट्ट धरून ठेवणा-यांसाठी आहेत. असे लोक सहजतेने व जलद गतीने संसार सागर पार करून मोक्षास प्राप्त होतात. 
               यासाठी शास्त्रपुराणे शिकण्याची व वाचण्याची गरज नाही. एकलव्याने गुरुविना विद्या कशी प्राप्त केली ? याचे कारण त्याने आपल्या हृदयात गुरूंची प्रतिष्ठापना करून बाह्यतः त्यांच्या रूपावर भक्तीचा अपरिमीत वर्षाव केला. आपणही आपल्या इष्ट देवतेच्या नामरूपाची बाह्यतः भक्ती करतो. प्रत्येकाने स्वतःची इष्ट देवता समोर ठेवून साधना केली पाहिजे, जप, ध्यान व मनःपूर्वक प्रार्थना करावयास हवी. आपण आपल्या अंतरंग निवासी साक्षीभावातील भगवंतास जागृत करावे, तो आपल्याला समग्र ज्ञान देईल.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात …. 

जय साईराम