ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराला त्याच्या निर्मितीमध्ये पाहिल्यास सत्याचा साक्षात्कार होतो."
प्रकरण दुसरे
अंकुर पुढे सुरु
आजी नेहमी तिच्या जीवनातील प्रसंग, चुटके सांगत असे. त्यातून मी अनेक अविस्मरणीय धडे शिकले. एका सनातनी हिंदू स्त्रीच्या नात्याने दैनंदिन जीवनात, पवित्र ग्रंथामधील शिकवणीचे आचरण करण्यावर तिची नितांत श्रद्धा होती. स्त्रियांचे वर्तन योग्य असावे यावर तिचा विशेष कटाक्ष असे. ती म्हणे:
" उंबरठ्यावर बसू नका."
" मंदिरातला दिवा रस्त्यावर ठेवला तर चालेल का ?"
" स्त्री पुरुषांनी मुक्तपणे एकत्र फिरू नये."
" कापूस अग्नीच्या जवळ ठेवू नये."
माझ्या आईप्रमाणेच आजीनेही माझ्या वडिलांच्या तत्वांना पाठिंबा दिला. कुटुंबाला कठीण परिस्थितीतून जावे लागत असताना दानधर्मासाठी तिने आपले दागिने मोडण्यासही मागे पुढे पाहिले नाही.
उर्वरित मजकूर पुढील भागात
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा