ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराप्रत असणारी अढळ श्रद्धा, परमेश्वराहून अधिक महान आणि सामर्थ्यशील आहे."
प्रकरण चौदा
वसंतमयम्
" स्वामी, माझ्या प्रेमाने संपूर्ण मानवजातीमध्ये प्रवेश केला आहे. त्याबद्दल मला आनंद आहे ; परंतु वृक्ष, वल्ली, माती यांचे काय ? त्यांच्यामध्ये काही बदल व्हायला नको का ?"
मी डोळे मिटून प्रार्थना केली.
स्वामी म्हणाले,
" वृंदावनाच्या मातेच्या विचार कर. त्या, मातेसारखाच सर्वत्र बदल घडेल."
सत्ययुगामध्ये संपूर्ण जगच वृंदावन बनून जाईल. वृक्ष, वल्ली, पक्षी, प्राणी, मानव यासर्वांमध्ये राधा कृष्णाचे प्रेम भरून उरेल. संपूर्ण मानवजात प्रेमामध्ये चिंब भिजून जीवनमुक्त गोपगोपींप्रमाणे दिव्य लीलांचा आणा लुटेल. एका वसंतेच्या भावविश्वामधून वसंतमयम झाले. वसंतमयम म्हणजे विश्वात्मक भाव.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा