ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत."
प्रकरण पंधरा
रिक्त
वसंता - अवतार कसा अवतरतो ?
स्वामी - तुझ्या तपाचे सामर्थ्य उच्च कोटीचे आहे. त्याबद्दल मी तुला इनाम देणे भाग आहे. दैवी कायद्यानुसार, एखाद्याने केलेल्या यज्ञानवर त्याचे पुण्य ठरवले जाते. उदा. जर एखाद्याने काही विशिष्ट संख्येने यज्ञ केले असतील तर त्याला इंद्रपद प्राप्त होते. त्याहून अधिक यज्ञ केले असतील तर ब्रह्म पद प्राप्त होते. तुझ्या प्रेमभक्तीसाठी तुला अवतारपद हेच एक इनाम मी देऊ शकतो. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. तुझ्याप्रेमासाठी मी तुला हेच एक देऊ शकतो.
वसंता - मग मला ते नको. मला अवतारपद नको.
स्वामी - अवतारपदास नकार दिल्यामुळे तुझ्या शक्तीचे सामर्थ्य वाढते आहे. जसे रामाने रावणाचे शीर कापले की तेथे नवीन शीर निर्माण होत होते, त्याचप्रमाणे तुझ्या त्यागामुळे तुझे तपोबल वृद्धिंगत होत आहे.
वसंता - मग मी काय करू ? तुम्ही माझी सर्व शक्ती घ्या - आणि मला रिक्त करा. मला फक्त तुम्ही हवे आहात . माझं तुमच्यावर निरतिशय प्रेम आहे. तुम्हाला माझ्या यातना कळत नाहीत का ?
स्वामी - प्रत्येक अवतार विशिष्ट अवतारकार्यासाठी अवतरित होतो. श्रीरामाने आपल्या दिव्य कोदंडाने राक्षसांचा संहार करण्यासाठी अवतार घेतला. श्रीरामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण कधीही लक्ष्याचा वेध घेतल्याशिवाय रहात नसे. श्री कृष्ण दुष्टदुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी आला होता. त्याचे शस्त्र होते दिव्य सुदर्शन चक्र. या युगामध्ये आपण संहाराविना परिवर्तन घडवणार आहोत. या करता केवळ एकाच शस्त्राची गरज आहे. तुझे प्रेम ! प्रेमावर फक्त तुझा अधिकार आहे. केवळ तूच त्याचा वापर करू शकतेस. त्यासाठी आवश्यक असणारी प्रेमाची सखोल तीव्रता दुसऱ्या कोणाहीकडे नसून फक्त तुझ्याकडेच आहे आणि म्हणूनच केवळ तूच प्रेमसाई बनून येऊ शकतेस.
वसंता - स्वामी, मला काही नको. मला काही माहित नाही. मला फक्त तुमची पत्नी म्हणून यायचं आहे. स्वामी, माझं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे माझं तुमच्यावर. मी अवतार म्हणून येणार नाही.
स्वामी - मी तरी काय करू ? यासाठी इतर कोणीही योग्य नाही. तुझ्यासारखं अतीव प्रेमही कोणाकडे नाही. केवळ तूच एवढ्या प्रेमाचा वर्षाव करत आहेस.
बर, ठीक आहे, आपण एक काम करू. तू तुझं सर्वकाही उदा. तुझे प्रेम, साधेपणा, कारुण्य, पावित्र्य आणि तुझे सर्व सद्गुण मला अर्पण कर.
वसंता - स्वामी, माझ्याकडे जे काही आहे ते सर्व मी तुम्हाला अर्पण करते. कृपया त्याचा स्वीकार करा.
(मी माझ्या ओंजळीतून स्वामींच्या ओंजळीत उदक सोडून सर्वकाही त्यांना अर्पण केले.)
वसंता - स्वामी, तुम्ही म्हणाला होतात की मी माझ्या शक्ती इतरांना दिल्या की त्या कमी न होता वाढतच जातात. आत्ताही तसेच घडेल का ?
स्वामी - नाही. तू तुझे सर्वस्व मला अर्पण केलेस. तू आता रिक्त झालीस. मी माझ्या सत्याने हा रिक्त घट भरेन. तुझ्यादेहामध्ये सत्य भरून उरेल व तुझे भावविश्व या साईनामक देहात वास करेल, आता मीच प्रेम साई बनून येईन.
वसंता - स्वामी, आता मी खूप खूप आनंदात आहे.
स्वामी - अगं वेडाबाई ! तू परत एकदा चुकलीस ! तू सत्य आहेस. मी तुझ्यामध्ये आहे. तू माझ्यात आहेस.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा