ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमच्या मुखाने केवळ सत्य वदावे, अन्य काही नाही."
प्रकरण चौदा
वसंतमयम्
माझे प्रेमकूजन संपूर्ण विश्वामध्ये निनादत राहील. अखिल विश्वाच्या नेत्रांनी मी भगवंताच्या सौंदर्याचे रसपान करेन. या अगणित नेत्रांनी त्यांचे दर्शन घेऊन मी आनंदात न्हाऊन निघेन. मी प्रत्येक रुपामधून हात जोडून त्यांची प्रार्थना करेन, त्यांच्या चरणांची सेवा करेन. माझे प्रेम सर्वत्र झिरपत जाईल. मी सर्वव्याप्त होईल. निर्मितीच्या कणकणामध्ये माझे अस्तित्व असेल. जगातील समग्र ५८० कोटी लोक वसंता होतील, फक्त वसंता ! सर्वजण जीवनमुक्त असतील. ते फक्त परमेश्वराचा ध्यास घेतील, त्याच्यासाठी अश्रू ढळतील. त्यांची इंद्रियं, मन आणि सर्वच केवळ परमेश्वराच्या विचारात असतील, परमेश्वर प्राप्तीसाठी मनन, चिंतन करतील.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा