ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराचे अखंड चिंतन म्हणजे परमेश्वराचे अखंड सान्निध्य."
प्रकरण पंधरा
रिक्त
स्वामींनी मला सांगितले की मी पुढील जन्मात प्रेमसाई बनून येईल. ते काय म्हणताहेत हे न समजल्यामुळे मी रडू लागले ....
स्वामी - सर्वांना मुक्ती मिळवून देण्याची तुझी इच्छा हा मातृभाव आहे. हा भावच तुला अवतार बनवेल. दोन अवतारांच्या अवतरणास तू कारण आहेस. तुझा प्रेमभाव घेऊन सत्यसाई अवतरला तर तुझा मातृभाव घेऊन प्रेमसाई येईल.
वसंता - स्वामी, मी नाही येणार. मला स्त्री बनूनच तुम्ही अनुभूती घ्यायची आहे.
स्वामी - तू निश्चित माझी अनुभूती घेशील. यापूर्वी कोणीही वैश्विक मुक्ती मागितलेली नाही. संपूर्ण मानववंशासाठी असलेला तुझा कारुण्यभावच तुला अवतार म्हणून घेऊन येईल. ह्यामुळेच प्रेमसाई शक्ती स्वरूप म्हणून ओळखले जातील. तुझे अपरिमित प्रेमच अनंत शक्ती बनून प्रेमसाई अवतार धारण करेल.
वसंता - स्वामी, तुम्ही काय सांगताय ? मी प्रेमसाई अवतार बनून येणार असे तुम्ही म्हणालात का ? मला हे शक्य नाही. स्वामी, मी तुमच्यावर प्रेम करते !
स्वामी - तुझ्या तपाचे सामर्थ्य अति महान आहे.
वसंता - माझे संपूर्ण तपोबल तुम्ही घ्या, मला रिक्त करा, मला रिक्त करा. माझे तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही मला प्राणाहुनही अधिक प्रिय आहात. मला फक्त तुमची अनुभूती घ्यायची आहे ! मला फक्त तुम्ही हवे आहात. मला तुमच्याशिवाय दुसरे काहीही नकोय. तुम्ही मला समजू शकत नाही का ? माझ्या जीवाची घालमेल तुम्हाला कळत नाही का ? अरे देवा, मी का जन्मास आले ? माझ्या प्रेमाचे हेच का प्राक्तन ?
स्वामी - रडू नकोस , शांत हो ! शांत हो ! मी काय म्हणतोय ते ऐकतेस का ?
वसंता - आता काही बोलू नका. मी पुट्टपर्तीला येईन आणि तुमच्यासमोर प्राणत्याग करेन. माझे प्रेम शुद्ध आहे, पवित्र आहे ... फक्त तुमच्यासाठीच आहे. तुम्ही दुसऱ्या एखाद्याला अवतारपद बहाल करा. मला माझे स्वामी द्या ! वैश्विक मुक्तीची सबब सांगून तुम्ही मला फसवलेत आणि पुन्हा पुन्हा तुम्ही माझी फसवणूक कराल. मी फक्त स्त्री म्हणूनच जन्म घेईल. स्वामी , माझे तुमच्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आधी तुम्ही म्हणालात की प्रेमसाई अवतारात तुम्ही माझ्याशी विवाह कराल आणि आता तुम्ही म्हणता की मी प्रेमसाई बनून येईल. मला ते नको आहे. माझे तुमच्यावर प्रेम आहे. हे शब्द उच्चारताच माझा जीव हे शरीर सोडू देत.
स्वामी - ठीक आहे, ठीक आहे ! रडू नकोस. तू प्रेमसाई होऊन येऊ नकोस. मग तर झालं ! आता रडू नकोस.
वसंता - स्वामी, तुम्ही माझ्या सर्व शक्ती घ्या आणि मला रिक्त करा.
स्वामी - तुझ्या तपामधून अवतार होण्याइतकी प्रचंड शक्ती तू मिळवली आहेस. तरीसुद्धा माझ्यावर असलेल्या तुझ्या अतीव प्रेमामुळे तू सर्व काही नाकारत आहेस. तुझ्या या प्रेमाच्या बदल्यात मी तुला काय देऊ ?
ध्यानसमाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा