रविवार, ३० डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" त्याग ही सत्याची गुरुकिल्ली आहे."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

स्वामी म्हणले, 
              " तुझ्या सतीत्वाबद्दल लिही " आधी तू म्हणालीस, " विवाहासंदर्भात माझे नाव जर सामान्य मानवाशी जोडले गेले तर मी जगू शकणार नाही." आता तू म्हणतेस की, जर तुझे नाव माझ्याशिवाय इतर कोणत्याही अवताराच्या नावाशी जोडले गेले तरीसुद्धा तू जगू शकणार नाहीस. या सर्वश्रेष्ठ सतीत्वाविषयी लिही. 
               २००१ मध्ये स्वामींनी मला वसिष्ठ गुहेमध्ये येण्यास सांगितले. ते म्हणाले की ते स्थूलरूपात तिथे येऊन ते माझ्याशी विवाह करतील. वसिष्ठ गुहेमध्ये जाण्याअगोदर एका मनुष्याने आम्हाला सांगितले की माझ्यासाठी सीतेचे मंगळसूत्र चमत्कारी रितेने साक्षात होईल. मी म्हणाले," मी सीतेचे मंगळसूत्र घालणार नाही. ते श्रीरामाने बांधलेले मंगळसूत्र आहे. मला ते नको." मी विलाप करू लागले. " मंगळसूत्र म्हणजे इतकी हलकी सलकी गोष्ट आहे का ? बाजारातील भाजीपाला आहे काय, की कोणीही त्याची देवघेव करायला ? कोणीतरी अंगावर ल्यालेलं मंगळसूत्र मी स्वीकारणार नाही. त्याने माझे पातिव्रत्य डागाळेल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांद्वारेच सत्याचा बोध होतो. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

                स्वामींकडे पाहत असताना दिव्यानंदाची अनुभूती होते. असे का होते ? कारण माझ्या देहातील अणुरेणूंच्या निदिध्यासातून त्यांचे रूप निर्माण झाले. परमेश्वराच्या मनमोहक हालचालींनी आपले हृदय न हरवून बसणारा कोणीतरी आहे का ? माझी सच्ची भक्ती त्यांच्या पदन्यासाचे सौंदर्य आहे. हा सौंदर्याचा पुतळा परमेश्वर भूतलावर कसा अवतरला ? माझ्या अश्रूपूर्ण नेत्रांनी घातलेल्या सादेनी, माझ्या मनात सतत असणाऱ्या त्यांच्या विचारांनी त्यांचे मोहक स्मित निर्माण केले. मी अखंड उच्चारण करत असलेल्या त्यांच्या नामामुळे त्यांचे नेत्र आकर्षक झाले. जो कोणी त्यांच्याकडे पाहतो त्याला ते आकर्षित करतात. त्यांचे नाम माझ्या रक्तातून वाहते. माझे भाव व्यक्त करणाऱ्या, मी लिहिलेल्या अगणित पद्मरचनांमधून त्यांचे दिव्य चरण कोरले गेले. माझ्या आत्म्याच्या तृष्णेने त्यांचे रूप मनमोहक झाले. 
                माझ्या भावविश्वाने स्वामींचे हे रूप निर्माण केले. माझ्या भावांमधून निर्माण झालेले हे रूप माझ्या भावांशी तद्रूप झाले आणि माझ्याहून वेगळी अशी त्यांच्या रूपाची कल्पना मी करू शकत नाही. जरी मी त्यांना पाहिले तरी माझ्या मनात त्यांच्या रूपाची नोंद होत नाही. मी नेहमी माझ्या भावविश्वातील रूपच पाहते. म्हणून भौतिक देह माझ्या मनात टिकतच नाही.

*    *    * 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

मोती बारावा
 भगवत् प्रिती  

        सर्वजण परमेश्वरावर प्रेम करू शकतात. तसेच ' हे परमेश्वरा, माझे तुझ्यावर प्रेम आहे ' असे खुलेपणाने सांगून आपला भक्तीभाव व्यक्त करू शकतात. तथापि मी परमेश्वराला खुश केले असे किती जण सांगू शकतात ? परमेश्वराला खुश करणे तेवढे सोपे नाही ' निष्ठा ब्रोकन ' ह्या प्रकरणात मी ह्याविषयी लिहिले आहे. मी म्हटले आहे," लोक परमेश्वराचे ऐकत नाहीत त्याच्या शब्दांचे पालन करत नाहीत अवताराची अवज्ञा करण्यातच धन्यता मानतात. १२ वर्षांपूर्वी स्वामींनी हेच सांगितले. आपण परमेश्वरावर प्रेम करत असू, त्याची भक्तीही करत असू परंतु आपण त्याची शिकवण आचरणात आणून, त्याला खुश केले पाहिजे. त्यांनी दिलेल्या आज्ञा शिरसावंद्य मानल्या पाहिजेत. मनुष्याने जीवन कसे जगावे, हे दर्शवण्यासाठी भगवंताने गीतेतून शिकवण दिली. स्वामींनी गेली ८० वर्षे, त्यांच्या जीवनातून हीच शिकवण दिली किती जण त्यांचे अनुसरण करत आहेत ? एखादी व्यक्ती त्यातील काही शिकवणींचे अनुसरण करत असेल परंतु परमेश्वराला खुश करण्यासाठी सर्व शिकवणींचे अनुसरण कोण करू शकते. आपण सर्व कर्म त्याला खुश करण्यासाठी केली पाहिजेत सर्व भौतिक सुखांचा त्याग करून केवळ त्याच्यासाठी जीवन जगले पाहिजे हा झाला बाह्यस्वरूपाचा त्याग. भगवे वस्त्र धारण करून एखाद्या आश्रमात वा गुहेत राहणे पुरेसे नाही मनातून, अंतरातूनही वैराग्यभाव असायला हवा. काहीजण हे ही करतील तथापि ते अंतरातील महत्वाच्या व्यक्तीचा अहम् त्याग करणार नाहीत. 
                आपण सदैव अहंकारास दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे अणुमात्र अहंकार जरी उरला तर आपण परमेश्वरास खुश करू शकणार नाही. आपण जग आपल्याविषयी काय विचार करेल, ह्याची चिंता आपण सोडली पाहिजे. स्तुती वा निंदा दोन्ही बाबत आपण अलिप्त राहिले पाहिजे तसेच निर्भय आणि आत्ममग्न राहिले पाहिजे. 
                मी नेहमी स्वामींचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषण ह्यासाठी अश्रू ढाळत असे आता मी माझे मन बदलले आहे आता मला ह्या फळाचीही अपेक्षा नाही. परमेश्वराला खुश करणे व त्याच्यावर प्रेम करणे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे. 
वसंतासाई 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या आनंद सूत्र ह्या पुस्तकातून 

जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ सर्वसंगपरित्याग केल्याने मोक्षप्राप्ती होते. " 

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

               रुपाला एवढे महत्व का ? तो परमेश्वर आहे. एवढे पुरेसे आहे. जर एखाद्याला बाह्यरूपामध्ये रुची असेल तर ते दश आणि शिव यांच्या गोष्टीसारखे होईल. मला फक्त परमेश्वर हवा, मग तो ८० वर्षांचा असला काय किंवा अगदी १०० वर्षांचा असला काय ?
                मी लिहिले आहे की मी प्रेम साई अवतारास घेऊन येणार आहे. या विषयावर मी ' इथेच, याक्षणी, मुक्ती ' भाग -३ या पुस्तकामध्ये एक अध्याय लिहिला आहे. माझ्यामध्ये राधाचे जे संस्कार आहेत त्या संस्कारांमुळे पृथ्वीतलावर आणल्या जाणाऱ्या अवताराची स्वभाववैशिष्ट्ये कोणती असतील ? या पुस्तकातील ७ व्या प्रकरणात मी एक कविता लिहिली आहे. त्यामध्ये मी त्याचे वर्णन केले आहे. स्वामी, म्हणाले, की कृष्णाची अनुभूती घेण्याच्या राधेच्या अतृप्त तृष्णेनेच त्यांना भूतलावर येण्यास भाग पाडले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " आपण केलेले सत्कर्मसुद्धा परमेश्वराच्या साक्षात्कारामध्ये अडथळा बनू शकते. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

                 परमेश्वराची अवस्था किंवा दिव्य तत्वही युगानुयुगे उत्क्रांत होत जाते. ' प्रेम साई ' हा परिपूर्ण अवतार असेल. त्यांचे प्रेम निर्दोष आणि परिपूर्ण असेल. 
                 लहानपणापासूनच मला कृष्णाशी लग्न करायचे होते. म्हणून मला त्याच्या रूपाचे वर्णन करता आले पाहिजे. मी फक्त एवढेच म्हणू शकते, की कृष्ण नीलवर्णी आहे. त्याने मुकुटावर मोरपीस धारण केले आहे. हातामध्ये बासरी आहे. तुम्ही जर मला स्वामींबद्दल विचारलेत तर मी म्हणेन, की स्वामींनी केसांचा मुकुट धारण केला आहे आणि भगव्या रंगाची कफनी परिधान केली आहे. 
                  मला परमेश्वराचे रूप डोळ्यापुढे का बरं आणता येत नाही ? मी परमेश्वरावर प्रेम केले, कृष्णावर प्रेम केले व मला त्याच्याशी लग्नही करायचे होते. परंतु परमेश्वराच्या विशिष्ट चेहऱ्याची किंवा रूपाची मी कल्पना करू शकत नाही. कारण परमेश्वराचे रूप कल्पनेच्या पलीकडचे आहे. मी कृष्णावर प्रेम केले परंतु त्याच्या रुपाकडे लक्ष दिले नाही, म्हणून प्रेम साई अवतारात स्वामी कसे दिसतील हे मी सांगू शकत नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १६ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " आपल्या मृत्युचे ठिकाण आणि वेळ ही अगोदरच निश्चित असते, त्यानुसारच हे घडते. यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. " 

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

परम पातिव्रत्य

वसंता - स्वामी, प्रेम साई अवतारात माझे रूप कसे असेल ? तुमच्या मनात कल्पनाचित्र तयार आहे का ?
स्वामी - तुझं रूप परमेश्वरच्याही कल्पनेबाहेरचे आहे. 
वसंता - काय सांगताय, स्वामी ?
स्वामी - निर्मितीच्या तत्वांपलीकडे आणि देवतांच्याही पलीकडे जाऊन तू स्वतःचे रूप स्वतःच निर्माण केले आहेस. एक उदाहरण देतो. सीतामातेने माया हरीण मिळावे अशी इच्छा बाळगली, अशी छोटीशी इच्छाही मनात न बाळगता तू स्वतःला निर्मण करते आहेस. अशातऱ्हेने तू परिपूर्ण पवित्र्याने रुक्मिणी, सत्यभामा, दाक्षायिणी आणि इतर देवतांमधील छोटासा दोषही स्वतःमध्ये येणार नाही अशी खबरदारी घेऊन स्वतःला घडवत आहेस. ज्यामध्ये कणभरही दोष नसेल असा महाशक्ती अवतार म्हणून तू स्वतःला घडवत आहेस. आजपर्यंत जगाने पाहिलेच नाही, असे देवतातत्व तू जगाला दाखवत आहेस. तू तुझ्या पातिव्रत्याचे पावित्र्य दर्शवते आहेस. तुझ्या उच्चतम पातिव्रत्याची कल्पना देवदेवतासुद्धा करू शकणार नाहीत. 
प्रेमसाई अवतारात मी कसा दिसेन ते तुला माहित नाही, असे तू का म्हणतेस ? जेव्हा तू प्रत्यक्ष माझे दर्शन घेतेस तेव्हा तू सर्वांना विचारतेस. " स्वामी माझ्याकडे पाहत होते का ? ते माझ्याकडे बघून हसले का ?" का बरं असं विचारतेस ?
वसंता - मला माहीत नाही, स्वामी. 
स्वामी - जगामध्ये बाह्य रूपाच्या आधारे लोक कल्पनाचित्रे तयार करतात. तू भावचित्र तयार केलेस. तू हे रूप कसे तयार केलेस ? भावविश्वातून. त्याविषयी तू एका गीतामध्ये लिहिले आहेस. " तुला हे दिव्य रूप कोणी दिले." माझे हे रूप तू निर्माण केले आहेस. तू फक्त तुझ्या भावांमधून निर्माण झालेले रूपच पाहू शकतेस ; तुला भौतिक रूप पाहता येत नाही आणि म्हणूनच तू असे म्हणू शकत नाहीस की मी पुढील अवतारात कसा दिसेन. तू साक्षात परमेश्वराच्या कल्पनेच्याही पलीकडे आहेस. तुझे पातिव्रत्य एवढे उच्च आहे की कोणीही तुझ्या पातिव्रत्याच्या पावित्र्याची कल्पना करू शकत नाही ; म्हणून मी पूर्वी म्हणालो की, तू तुझ्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे माझ्या हातातूनही निसटून उंच उंच जात आहे. 
वसंता - स्वामी, मला असे पातिव्रत्य नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुमच्या पलीकडे जाऊन मी काय करू ? नको ! मला हे पातिव्रत्य नको. सीता, रुख्मिणी आणि सत्यभामा यांच्यामधील उणीवा माझ्यामध्ये असल्या तरी मला चालतील, पण माझी जागा तुमच्याहून खालीच असायला हवी. 
स्वामी - उणीवांमुळे पातिव्रत्याला मर्यादा येतात. तुझ्या गुणांमुळे तू पातिव्रत्याची उंच उंच शिखरे पादाक्रांत करत आहेस. तुझ्या पावित्र्याची कोणीही कल्पनासुद्धा करू शकणार नाही. मी तुझ्या तोलचा नाही.
वसंता - स्वामी ! स्वामी !  हे तुम्ही काय बोलताय ? मला काहीही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. 
स्वामी - प्रेम साई अवतारामध्ये तुझ्या रूपाशी मिळते जुळते माझे रूप तू निर्माण करत आहेस. प्रेम साई अवतारामध्ये, राम, कृष्ण आणि सत्य साई यांच्यातील दोष नसतील. पुढील अवताराच्या कालखंडात सर्व काही निर्दोष आणि परिपूर्ण असेल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

             " आपल्या अतृप्त इच्छा आकांशा व आसक्ती पुढील जन्मात आपल्या बरोबर येतात. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

                 सर्वसाधारणपणे अवताराचा इतिहास त्याच्या प्रवेशानंतरच नोंद केला जातो. मी प्रेमसाईंच्या प्रवेशाअगोदरच त्यांची कथा त्यांच्या कुटुंबाचा तपशील लिहिले आहेत. मी त्यांच्या घराचे नाव, भेट देतील ती ठिकाणे, त्यांच्या कुटुंबात घडणारे प्रसंग अशा अनेक गोष्टी तपशीलवार लिहीत आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा इतिहास आणि त्याचा पूर्वजन्म याविषयी लिहीत आहे. एवढेच नाही तर मी गतयुगातील त्यांच्या जन्माचाही मागोवा घेत आहे. मी प्रेमसाईंचा विवाह, विवाहाप्रसंगी घडणाऱ्या घटना, प्रेमाची प्रसूती व त्या अपत्याच्या जन्मामागचे रहस्य हे सर्व पाहू शकते. एवढेच नाही तर त्या मुलाचे जन्मनक्षत्र, जन्मदिनांक, जन्मवेळ हे सर्व आधी सांगू शकते. एका प्रकरणामध्ये तर मी मुलाच्या नामसंस्कार विधीचेही वर्णन केले आहे. हे सर्व मी कसे काय पाहू शकते ?
                माझे पवित्र प्रेम आणि पातिव्रत्य त्यामुळे हे शक्य झालंय. माझं परमपातिव्रत्य मला एवढ्या टोकाचे सत्य ग्रहण करण्याची ताकद देते. माझं एकाग्र प्रेम आणि पातिव्रत्य त्यामुळे हे सर्व शक्य होतं. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम   

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " तुमचे सर्व भाव ईश्वराकडे वळवा. राग आला तर तो परमेश्वराप्रती व्यक्त करा," मला तुझे दर्शन का नाही मिळाले ?" त्याच्यापाशी तुम्ही तुमचे भाव व्यक्त करा."  

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

स्वामी म्हणतात, 
               " तुला मी प्रेम साईंविषयी का लिहायला सांगतोय हे तुला माहीत आहे ? आजपर्यंत अवताराच्या प्रवेशाअगोदर कोणीतरी अवताराविषयी लिहिले आहे का ? त्याचे नाव, त्या नावामागचे कारण किंवा त्याचे नातेवाईक कोण असतील, नातेवाईक म्हणून त्यांचीच निवड का करण्यात आली, त्यांच्या कुटुंबात घडणाऱ्या घटना, हे आजपर्यंत कोणीही सांगितले नाही. फक्त तूच हे करू शकतेस. आपल्याबरोबर येणाऱ्या सर्वांची तूच निवड केली आहेस. म्हणूनच मी त्यांना ' निवडलेले मोती ' म्हणतो. तुझ्या परम  पावित्र्यामुळेच तुला हे ज्ञात होऊ शकते. निर्मिती व अवताराचे अवतरण ह्या विषयीचे सत्य खेचून घेऊन ही परम रहस्ये तू अखिल जगतासाठी उघड करत आहेस ."

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

      " तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या जन्माची निर्मिती करत असता. तुमचे भाव तुम्हाला जन्ममृत्युच्या चक्रात ढकलतात. " 

प्रकरण पाच

प्रेम साई अवतार 

                  जग कर्मभूमी आहे. इथे केलेल्या प्रत्येक कर्माला फळ आहे. मनात उमटणाऱ्या प्रत्येक भावाला प्रतिक्रिया, प्रतिबिंब आणि प्रतिध्वनी आहे. यालाच कर्मकायदा म्हणतात. हाच आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवतो. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण कुविचारांना थारा देणार नाही. मनामध्ये भौतिक भाव ठेवणाऱ्यांनाही केलेले कर्म आणि त्यानुसार मिळणारे कर्मफल हे तत्व लागू होते. जर आपण भिंतीवर बॉल टाकला तर तो तेवढ्याच वेगाने तेवढ्याच अंतरावर आपल्याकडे परत येतो. तुम्ही सर्वजण मायेमध्ये अडकला आहात. जेव्हा तुम्ही मायारूपी भिंतीवर बॉल टाकता तेव्हा तो बॉल तुमच्याकडे परत येतो. हाच कर्मकायदा आहे याच कर्मकायद्याने मला प्रेम साई अवताराचे फळ दिले. माझा प्रत्येक भाव परमेश्वराशी निगडित असतो. मी अहोरात्र भगवद्भावात रममाण असते. त्याची परतफेड करण्यासाठी भगवंत भूतलावर येऊन त्याचे भाव दर्शवणार आहे. मुक्ती निलयममध्ये माझ्याबरोबर राहणारे आश्रमवासी माझे नातेवाईक बनून पुन्हा येणार आहेत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ परमेश्वराची इच्छा धरा. तोच एकमात्र सत्य आहे. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

                  प्रेमावताराच्या काळात सर्वजण एकत्र राहतील. माझे आई वडील, आजी, मामा, मामी, काका,काकी ह्या सर्वांची पुढील जन्मात तीच नावे असतील. मी त्याच कुटुंबात जन्म घेईन फक्त माझं नाव बदलेल. माझं नाव प्रेमा असेल. ह्यातून काय निदर्शनास येते ? अशातऱ्हेने सर्वजण सत्ययुगात जन्म घेतील. ह्या जन्मात माझ्या कुटुंबातील विभक्त झालेले सर्वजण पुढील जन्मात एकत्र राहतील. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंब प्रेमरज्जूने बांधलेले असेल व त्यामुळे कुटुंबात एकोपा असेल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम