ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपल्या मृत्युचे ठिकाण आणि वेळ ही अगोदरच निश्चित असते, त्यानुसारच हे घडते. यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. "
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
वसंता - स्वामी, प्रेम साई अवतारात माझे रूप कसे असेल ? तुमच्या मनात कल्पनाचित्र तयार आहे का ?
स्वामी - तुझं रूप परमेश्वरच्याही कल्पनेबाहेरचे आहे.
वसंता - काय सांगताय, स्वामी ?
स्वामी - निर्मितीच्या तत्वांपलीकडे आणि देवतांच्याही पलीकडे जाऊन तू स्वतःचे रूप स्वतःच निर्माण केले आहेस. एक उदाहरण देतो. सीतामातेने माया हरीण मिळावे अशी इच्छा बाळगली, अशी छोटीशी इच्छाही मनात न बाळगता तू स्वतःला निर्मण करते आहेस. अशातऱ्हेने तू परिपूर्ण पवित्र्याने रुक्मिणी, सत्यभामा, दाक्षायिणी आणि इतर देवतांमधील छोटासा दोषही स्वतःमध्ये येणार नाही अशी खबरदारी घेऊन स्वतःला घडवत आहेस. ज्यामध्ये कणभरही दोष नसेल असा महाशक्ती अवतार म्हणून तू स्वतःला घडवत आहेस. आजपर्यंत जगाने पाहिलेच नाही, असे देवतातत्व तू जगाला दाखवत आहेस. तू तुझ्या पातिव्रत्याचे पावित्र्य दर्शवते आहेस. तुझ्या उच्चतम पातिव्रत्याची कल्पना देवदेवतासुद्धा करू शकणार नाहीत.
प्रेमसाई अवतारात मी कसा दिसेन ते तुला माहित नाही, असे तू का म्हणतेस ? जेव्हा तू प्रत्यक्ष माझे दर्शन घेतेस तेव्हा तू सर्वांना विचारतेस. " स्वामी माझ्याकडे पाहत होते का ? ते माझ्याकडे बघून हसले का ?" का बरं असं विचारतेस ?
वसंता - मला माहीत नाही, स्वामी.
स्वामी - जगामध्ये बाह्य रूपाच्या आधारे लोक कल्पनाचित्रे तयार करतात. तू भावचित्र तयार केलेस. तू हे रूप कसे तयार केलेस ? भावविश्वातून. त्याविषयी तू एका गीतामध्ये लिहिले आहेस. " तुला हे दिव्य रूप कोणी दिले." माझे हे रूप तू निर्माण केले आहेस. तू फक्त तुझ्या भावांमधून निर्माण झालेले रूपच पाहू शकतेस ; तुला भौतिक रूप पाहता येत नाही आणि म्हणूनच तू असे म्हणू शकत नाहीस की मी पुढील अवतारात कसा दिसेन. तू साक्षात परमेश्वराच्या कल्पनेच्याही पलीकडे आहेस. तुझे पातिव्रत्य एवढे उच्च आहे की कोणीही तुझ्या पातिव्रत्याच्या पावित्र्याची कल्पना करू शकत नाही ; म्हणून मी पूर्वी म्हणालो की, तू तुझ्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे माझ्या हातातूनही निसटून उंच उंच जात आहे.
वसंता - स्वामी, मला असे पातिव्रत्य नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुमच्या पलीकडे जाऊन मी काय करू ? नको ! मला हे पातिव्रत्य नको. सीता, रुख्मिणी आणि सत्यभामा यांच्यामधील उणीवा माझ्यामध्ये असल्या तरी मला चालतील, पण माझी जागा तुमच्याहून खालीच असायला हवी.
स्वामी - उणीवांमुळे पातिव्रत्याला मर्यादा येतात. तुझ्या गुणांमुळे तू पातिव्रत्याची उंच उंच शिखरे पादाक्रांत करत आहेस. तुझ्या पावित्र्याची कोणीही कल्पनासुद्धा करू शकणार नाही. मी तुझ्या तोलचा नाही.
वसंता - स्वामी ! स्वामी ! हे तुम्ही काय बोलताय ? मला काहीही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात.
स्वामी - प्रेम साई अवतारामध्ये तुझ्या रूपाशी मिळते जुळते माझे रूप तू निर्माण करत आहेस. प्रेम साई अवतारामध्ये, राम, कृष्ण आणि सत्य साई यांच्यातील दोष नसतील. पुढील अवताराच्या कालखंडात सर्व काही निर्दोष आणि परिपूर्ण असेल.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा