गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांद्वारेच सत्याचा बोध होतो. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

                स्वामींकडे पाहत असताना दिव्यानंदाची अनुभूती होते. असे का होते ? कारण माझ्या देहातील अणुरेणूंच्या निदिध्यासातून त्यांचे रूप निर्माण झाले. परमेश्वराच्या मनमोहक हालचालींनी आपले हृदय न हरवून बसणारा कोणीतरी आहे का ? माझी सच्ची भक्ती त्यांच्या पदन्यासाचे सौंदर्य आहे. हा सौंदर्याचा पुतळा परमेश्वर भूतलावर कसा अवतरला ? माझ्या अश्रूपूर्ण नेत्रांनी घातलेल्या सादेनी, माझ्या मनात सतत असणाऱ्या त्यांच्या विचारांनी त्यांचे मोहक स्मित निर्माण केले. मी अखंड उच्चारण करत असलेल्या त्यांच्या नामामुळे त्यांचे नेत्र आकर्षक झाले. जो कोणी त्यांच्याकडे पाहतो त्याला ते आकर्षित करतात. त्यांचे नाम माझ्या रक्तातून वाहते. माझे भाव व्यक्त करणाऱ्या, मी लिहिलेल्या अगणित पद्मरचनांमधून त्यांचे दिव्य चरण कोरले गेले. माझ्या आत्म्याच्या तृष्णेने त्यांचे रूप मनमोहक झाले. 
                माझ्या भावविश्वाने स्वामींचे हे रूप निर्माण केले. माझ्या भावांमधून निर्माण झालेले हे रूप माझ्या भावांशी तद्रूप झाले आणि माझ्याहून वेगळी अशी त्यांच्या रूपाची कल्पना मी करू शकत नाही. जरी मी त्यांना पाहिले तरी माझ्या मनात त्यांच्या रूपाची नोंद होत नाही. मी नेहमी माझ्या भावविश्वातील रूपच पाहते. म्हणून भौतिक देह माझ्या मनात टिकतच नाही.

*    *    * 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा