ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपल्या अतृप्त इच्छा आकांशा व आसक्ती पुढील जन्मात आपल्या बरोबर येतात. "
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
सर्वसाधारणपणे अवताराचा इतिहास त्याच्या प्रवेशानंतरच नोंद केला जातो. मी प्रेमसाईंच्या प्रवेशाअगोदरच त्यांची कथा त्यांच्या कुटुंबाचा तपशील लिहिले आहेत. मी त्यांच्या घराचे नाव, भेट देतील ती ठिकाणे, त्यांच्या कुटुंबात घडणारे प्रसंग अशा अनेक गोष्टी तपशीलवार लिहीत आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा इतिहास आणि त्याचा पूर्वजन्म याविषयी लिहीत आहे. एवढेच नाही तर मी गतयुगातील त्यांच्या जन्माचाही मागोवा घेत आहे. मी प्रेमसाईंचा विवाह, विवाहाप्रसंगी घडणाऱ्या घटना, प्रेमाची प्रसूती व त्या अपत्याच्या जन्मामागचे रहस्य हे सर्व पाहू शकते. एवढेच नाही तर त्या मुलाचे जन्मनक्षत्र, जन्मदिनांक, जन्मवेळ हे सर्व आधी सांगू शकते. एका प्रकरणामध्ये तर मी मुलाच्या नामसंस्कार विधीचेही वर्णन केले आहे. हे सर्व मी कसे काय पाहू शकते ?
माझे पवित्र प्रेम आणि पातिव्रत्य त्यामुळे हे शक्य झालंय. माझं परमपातिव्रत्य मला एवढ्या टोकाचे सत्य ग्रहण करण्याची ताकद देते. माझं एकाग्र प्रेम आणि पातिव्रत्य त्यामुळे हे सर्व शक्य होतं.
उर्वरित प्रकरण पुढील भागात
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा