ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" त्याग ही सत्याची गुरुकिल्ली आहे."
प्रकरण पाच
प्रेम साई अवतार
" तुझ्या सतीत्वाबद्दल लिही " आधी तू म्हणालीस, " विवाहासंदर्भात माझे नाव जर सामान्य मानवाशी जोडले गेले तर मी जगू शकणार नाही." आता तू म्हणतेस की, जर तुझे नाव माझ्याशिवाय इतर कोणत्याही अवताराच्या नावाशी जोडले गेले तरीसुद्धा तू जगू शकणार नाहीस. या सर्वश्रेष्ठ सतीत्वाविषयी लिही.
२००१ मध्ये स्वामींनी मला वसिष्ठ गुहेमध्ये येण्यास सांगितले. ते म्हणाले की ते स्थूलरूपात तिथे येऊन ते माझ्याशी विवाह करतील. वसिष्ठ गुहेमध्ये जाण्याअगोदर एका मनुष्याने आम्हाला सांगितले की माझ्यासाठी सीतेचे मंगळसूत्र चमत्कारी रितेने साक्षात होईल. मी म्हणाले," मी सीतेचे मंगळसूत्र घालणार नाही. ते श्रीरामाने बांधलेले मंगळसूत्र आहे. मला ते नको." मी विलाप करू लागले. " मंगळसूत्र म्हणजे इतकी हलकी सलकी गोष्ट आहे का ? बाजारातील भाजीपाला आहे काय, की कोणीही त्याची देवघेव करायला ? कोणीतरी अंगावर ल्यालेलं मंगळसूत्र मी स्वीकारणार नाही. त्याने माझे पातिव्रत्य डागाळेल.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा