रविवार, २३ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

मोती बारावा
 भगवत् प्रिती  

        सर्वजण परमेश्वरावर प्रेम करू शकतात. तसेच ' हे परमेश्वरा, माझे तुझ्यावर प्रेम आहे ' असे खुलेपणाने सांगून आपला भक्तीभाव व्यक्त करू शकतात. तथापि मी परमेश्वराला खुश केले असे किती जण सांगू शकतात ? परमेश्वराला खुश करणे तेवढे सोपे नाही ' निष्ठा ब्रोकन ' ह्या प्रकरणात मी ह्याविषयी लिहिले आहे. मी म्हटले आहे," लोक परमेश्वराचे ऐकत नाहीत त्याच्या शब्दांचे पालन करत नाहीत अवताराची अवज्ञा करण्यातच धन्यता मानतात. १२ वर्षांपूर्वी स्वामींनी हेच सांगितले. आपण परमेश्वरावर प्रेम करत असू, त्याची भक्तीही करत असू परंतु आपण त्याची शिकवण आचरणात आणून, त्याला खुश केले पाहिजे. त्यांनी दिलेल्या आज्ञा शिरसावंद्य मानल्या पाहिजेत. मनुष्याने जीवन कसे जगावे, हे दर्शवण्यासाठी भगवंताने गीतेतून शिकवण दिली. स्वामींनी गेली ८० वर्षे, त्यांच्या जीवनातून हीच शिकवण दिली किती जण त्यांचे अनुसरण करत आहेत ? एखादी व्यक्ती त्यातील काही शिकवणींचे अनुसरण करत असेल परंतु परमेश्वराला खुश करण्यासाठी सर्व शिकवणींचे अनुसरण कोण करू शकते. आपण सर्व कर्म त्याला खुश करण्यासाठी केली पाहिजेत सर्व भौतिक सुखांचा त्याग करून केवळ त्याच्यासाठी जीवन जगले पाहिजे हा झाला बाह्यस्वरूपाचा त्याग. भगवे वस्त्र धारण करून एखाद्या आश्रमात वा गुहेत राहणे पुरेसे नाही मनातून, अंतरातूनही वैराग्यभाव असायला हवा. काहीजण हे ही करतील तथापि ते अंतरातील महत्वाच्या व्यक्तीचा अहम् त्याग करणार नाहीत. 
                आपण सदैव अहंकारास दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे अणुमात्र अहंकार जरी उरला तर आपण परमेश्वरास खुश करू शकणार नाही. आपण जग आपल्याविषयी काय विचार करेल, ह्याची चिंता आपण सोडली पाहिजे. स्तुती वा निंदा दोन्ही बाबत आपण अलिप्त राहिले पाहिजे तसेच निर्भय आणि आत्ममग्न राहिले पाहिजे. 
                मी नेहमी स्वामींचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषण ह्यासाठी अश्रू ढाळत असे आता मी माझे मन बदलले आहे आता मला ह्या फळाचीही अपेक्षा नाही. परमेश्वराला खुश करणे व त्याच्यावर प्रेम करणे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे. 
वसंतासाई 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या आनंद सूत्र ह्या पुस्तकातून 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा