रविवार, ३ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " छोट्या छोट्या गोष्टींच्या त्याग करा आणि पहा त्यातून तुम्हाला केवढा आनंद मिळतो."

प्रकरण सहा

सतीत्व

              माझे एका दुसऱ्या व्यक्तीशी लग्न झाले या शोकाने मी आक्रोश करत होते. तेव्हा स्वामींनी हे सिद्ध केले की त्यांनीच माझ्याशी विवाह केला होता. विवाहानंतर सहा वर्षांनी दिव्यत्वाचा एक छोटासा अंश त्या रूपामध्ये ठेवून ते त्या रुपामधून बाहेर पडले. हेही स्वामींनी उघड केले. मी टाहो फोडून म्हणत होते," मला फक्त परमेश्वराबरोबर रहायचे आहे असे असूनही मी त्या रुपाबरोबर (पतीबरोबर ) का राहत होते ? हा माझ्या पातिव्रत्याला लागलेला कलंक आहे. " या विचाराने माझे मन अत्यंत उद्विग्न झाले होते. त्यानंतर स्वामींनी उघड केले की दिव्यत्व आमच्या दोन्ही देहांमधून सोडून गेल्यानंतर केवळ आमच्या दोघांचे मायादेह तेथे एकत्र राहत होते.
              आमचे दिव्यत्व सोडून गेल्यानंतर स्वामी मला म्हणाले," तू माझ्या अंतर्यामी राहा." मी म्हणाले," नाही नाही. ते माझ्या दृष्टीने योग्य नाही. मी त्यांच्यामधूनच आले आहे. मी त्यांच्यामध्येच होते. त्यांनी मला त्यांच्यापासून वेगळे केल्यामुळे माझा जन्म झाला. मी भूतलावर जन्म घेतला. जरी त्यांनी सिद्ध केले असले की त्यांनीच माझ्याशी विवाह केला तरी सर्वांना माहित आहे ते भगवान आहेत. अवतार आहेत. ते जोपर्यंत माझा प्रत्यक्ष स्वीकार करत नाहीत तोपर्यंत ' त्यांच्या अंतर्यामी माझे अस्तित्व ' म्हणजे माझ्या सतीत्वाला कलंक ठरेल . हे एखाद्या अपहारित संपत्तीसारखे मला वाटते . म्हणूनच ते जोपर्यंत माझा प्रत्यक्ष स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत मी सिमला गुहेमध्ये तप केले. स्वामी स्वतः सिमल्याला आले आणि त्यांनी इतरांसमोर माझ्या गळ्यामध्ये हार घेतला. त्यांनी आमच्यामधील नात्याचा अधिकार प्रस्थापित करण्याआधीच मला स्पर्श केला. ते मला अजिबात आवडले नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा