रविवार, ३१ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " कुटुंबातील सर्वजण प्रवासात सामानाचे ओझे वाटून घेतात. तथापि तुमच्या कर्मांचे ओझे दुसरे कोणीही वाटू शकत नाही. 

प्रकरण सहा 

सतीत्व 

             ४)  एकदा भजनाच्या दरम्यान स्वामी प्रेम साई बनून माझ्याजवळ येऊ लागले. मी रडत रडत म्हणाले, " माझ्याजवळ येऊ नका, माझ्या जवळ येऊ नका " माझ्या मनात फक्त स्वामी आहेत. माझ्या लहानपणीचा प्रिय कृष्ण, त्याने सुद्धा माझ्या जवळ येऊ नये. कृष्ण किंवा प्रेम साई ध्यानामध्ये, स्वप्नामध्ये किंवा प्रत्यक्ष माझ्याजवळ आले तर त्याने माझे पातिव्रत्य कलंकित होईल असे मला वाटते. मागील अवतारात मी कृष्णाची राधा होते आणि पुढील अवतारात मी प्रेमसाईंची पत्नी प्रेमा असेल. आता माझे मन फक्त स्वामींनी व्यापले आहे. केवळ स्वामी, स्वामी, स्वामीच माझे आहेत त्यांच्याशिवाय आलेला एखादा विचारही माझे पातिव्रत्य कलंकित करतो. 
              ५) नाडीग्रंथात असे म्हटले आहे की शिर्डीसाई आणि शुकमुनी माझ्या रक्तात आहेत. रडू अनावर होऊन मी स्वामींनी विचारले, " ते माझ्या रक्तात का आहेत ?" मी आक्रोश करत होते की माझा देह - माझा जीवप्रवाह अन्य कोणाशीही जोडला जाऊ नये. स्वामींनी अनेक गोष्टी सांगून माझी समजूत घातली. ते म्हणाले की अखिल जगत आपल्या पोटी जन्म घेईल. सर्वजण शुकासारखा भगवंताचा धावा करतच जन्म घेतील. स्वामी म्हणाले, " आपली सर्व मुले शुकमुनींसारखी असावीत असे तू म्हणटलेस म्हणून ते तुझ्या रक्तात आहेत असे त्यांनी लिहिले आहे." स्वामी पुढे असही  म्हणाले की शिर्डी साईंचा केलेला उल्लेख म्हणजे त्यांचाच (सत्य साईंचा ) उल्लेख आहे. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २८ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आचरणात न आणलेले ज्ञान अपूर्ण असते. "

प्रकरण सहा 

सतीत्व 

               हे संपूर्ण जगत विष्णूमय आहे. येथे अनेक महान स्त्रिया पातिव्रत्याचे आदर्श उदाहरण आहेत. त्यांचं सतीत्व सीमित आहे तर माझं अपरिमित आहे. या पातिव्रत्याद्वारे कलियुगाचे सत्ययुग होते. सिमल्याच्या गुहेमधील लिंग खूप उंच आहे. कारण माझे प्रेम भक्षण करून त्याची वाढ होते. मी हिमालयातील लक्ष्मी गुहेमध्ये तप केल्याचे, या अगोदर स्वामींनी सांगितले आहे. तेथील लिंग सपाट आहे. परमेश्वरच माझा आहार आहे हे ते दशवते. मी केवळ मुखानेच नव्हे तर पंचेंद्रियांद्वारे परमेश्वर भक्षण करते. माझ्या उसळणाऱ्या प्रत्येक भावामधून आणि पंचेंद्रियांमधून मी परमेश्वर ग्रहण करत असल्यामुळे तो माझ्या अणुरेणूंमध्ये मिसळून गेला आहे, माझ्या संपूर्ण देहामध्ये रक्त बनून वाहत आहे, हे मी माझ्या ' इथेच,  याक्षणी, मुक्ती ' या पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये लिहिले आहे. लक्ष्मी गुहेतील लिंग हे दर्शवते. आता स्वामी म्हणाले, की सिमल्यातील लिंग माझे प्रेम भक्षण करून उंच झाले. परमेश्वर माझे प्रेम भक्षण करून वृद्धिंगत होतो. 
             त्याचा आकार आणि वाढ बघता, एक अवतारात तो स्वतःला सामावू शकणार नाही. त्याला दुसरा अवतार घ्यावाच लागेल. तो त्रीविक्रम अवतारसारखा वाढतो आहे. या तीन अक्षरी प्रेमासाठी तो तीन अवतार घेईल. पहिला शिर्डी साई, नंतर सत्य साई आणि शेवटी प्रेम साई. लक्ष्मी गुहेमध्ये मी त्यांचे भक्षण केले. सिमला गुहेमध्ये त्यांनी माझे भक्षण केले. माझ्या विवाहनांतर मी सिमला गुहेत तप केले. माझ्या ४० वर्षांच्या तापानंतर २००१ मध्ये स्वामींनी मला मंगळसूत्र दिले. यावरून त्यांनी माझे भक्षण केले हे दिसून येते. या प्रेमभक्षणाची सांगता प्रेम साई अवतारात होईल. आपण माझी सतीत्व संहिता पुन्हा एकदा पाहू या. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २४ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " केवळ स्वतः आचरणात आणलेल्या गोष्टींचीच वाच्यता आपण करावी. "

प्रकरण सहा

सतीत्व 

             स्वामी माझ्या पातिव्रत्याबद्दल काय म्हणतात ते आपण पाहू या. 
             स्वामी म्हणतात, 
             येथे अनेक महान पतिव्रता स्त्रिया आहेत. तथापि कोणीही मूर्तिमंत पातिव्रत्य नाहीत. केवळ तू मूर्तिमंत पातिव्रत्य बनून या भूतलावर आली आहेस. 
             माझे नेत्र सर्व गोष्टींमध्ये स्वामीच पाहतात. जर त्यांनी अन्य काही पाहिले, तर मी म्हणते माझ्या नेत्रांचे सतीत्व नष्ट झाले. माझ्या मुखांमधून केवळ स्वामींविषयीचे बोल बाहेर पडतात. जर स्वामी व्यतिरिक्त काही बोलले गेले तर, मी म्हणते की माझ्या मुखाचे सतीत्व नष्ट झाले. माझे कान फक्त स्वामींशी संबंधित असलेल्या गोष्टी ऐकतात. अशा तऱ्हेने माझे ज्ञानेंद्रिये स्वामींशी संयुक्त झाली आहेत. मी नेहमी स्वामींचाच विचार करते. ही माझी सतीत्व संहिता आहे. जन्मापासून माझा हा स्वभाव आहे. ह्या एकाग्र विचारातून नवनिर्मिती होत आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

शनिवार, २३ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प पंधरावे 
चैतन्य युग


              आपण चैतन्य युगामध्ये, शुद्ध सत्व युगामध्ये   प्रवेश करत आहोत. खरच ! किती आनंददायी आहे ही जाणीव . आपण नवयुगात प्रवेश केला आहे का ? आपल्यामध्ये असणाऱ्या अस्वस्थ , असंतुष्ट , दुःखी आत्मे कोठे आहेत ?  ॐकार आणि वेदांच्या दिव्य उच्चारणाने आसमंत भरून गेला आहे ! कानामध्ये संगीताचा निनाद ऐकू येतोय हृदय पुलकीत झाले आहे . हे साम वेदाचे संगीत आहे का ? नाही मानवाचा आवाज आहे का हे स्वर्गातील गंधर्वगायन आहे ? 
               आपल्या पावलांखाली असणाऱ्या भूमीचा स्पर्श किती मऊशार आहे, असे वाटते की आपण पृथ्वीवर चालत आहोत का स्वर्गामध्ये. आपल्या पावलांना ह्या पवित्र भूमीचा दिव्य स्पर्श जाणवतो आहे. फुलाच्या पाकळीसारखा अत्यंत कोमल स्पर्श आहे हा ! 
               ही सत्ययुगाची, चैतन्य युगाची भूमी आहे ! ह्या सुपीक आणि वैभवशाली भूमीने पोषित झालेल्या लोकांच्या भाग्याची कल्पना करा. ह्या भूमीने लोकांना वैभवशाली बनवले का लोकांनी ह्या भूमीला पवित्र बनवले ? आपल्या पावलांना अशा ह्या भूमीचा स्पर्श लागेल का ? 
                येथे सामान्यजनांचे महात्म्यांमध्ये परिवर्तन होत आहे. येथे सदाचरणाची राजवट आहे. सदाचरण हा ह्या भूमीचा कायदा आहे. गवताचे पाते व प्रत्येक मूळ सुद्धा ह्या सदाचरणाच्या कायद्यानुसार वाढते. जेथे गवताचे पातेसुद्धा सदाचरणाचा मार्ग अंगिकारते तेथे मनुष्याचा तर प्रश्नच नाही. येथे वेद घरे आहेत, उपनिषदे मार्ग आहेत, परमेश्वर म्हणजे मानवच आहे, नद्या प्रेम आहेत, पर्वतशिखरे त्याग आहेत. येथील दुकानांमधून ज्ञानाची विक्री होते परंतु दुकानांमध्ये मालाचा (ज्ञानाचा ) साठा पडून आहे कारण तेथे खरेदीदार नाही. कारण हे लोकं ज्ञानदेह आणि प्रेमदेह घेऊन जन्मले आहेत. त्यामुळे त्यांना ज्ञानाच्या साठ्याची गरज नाही. 
              येथे श्वासासाठी प्राणवायू नाही ते श्वासातून मुक्तीवायू आत घेतात. येथे कृपेचा पाऊस पडतो. येथे केवळ एकच परमेश्वर आहे. सर्वसत्ताधिश, सर्वशक्तिमान परमेश्वर ! साईंच्या साम्राज्यात समस्त लोकं जीवनमुक्त आहेत. सर्वजण परब्रम्हाचा दिव्य अंश आहेत. ह्या भूमीवर त्याच्या कृपेचा सरींचा वर्षाव होतो. अशा ह्या समृद्ध भूमीतून उपजणाऱ्या अन्नावर येथील लोकांचे पोषण होते. त्यांचे पेयजल म्हणजे साक्षात प्रेमरसच !
              गाई आणि वाघ गुण्यागोविंदाने एकत्र राहतात वाघांचे बछडे गाईंच्या आचलांमधून दूध पितात. सिंह  आणि हरणे एकाच तळ्यामधील पाणी पितात. बगीच्यांमध्ये कुत्री आणि मांजरे ही एकत्र फिरताना दिसतात. घराघरांमधून, बागबगीच्यांमधून पारिजातकाच्या फुलांचा सुगंध दरवळताना आढळतो. तसेच इतर स्वर्यीग वृक्षांनी घरे व बागबगीचे सुशोभित झालेले दिसतात. 
             सूर्य ही मंद मंद तळपत असल्यामुळे कोणीही झाडाच्या सावलीचा शोध घेत नाही. बाबांनी म्हटले आहे " वैकुंठ हे असे स्थान आहे जेथे दुःखाचा लवलेशही नाही. " येथे सर्वजण सुखात, आनंदात आहे. रात्र होताच चंद्राच्या शीतल, आल्हाददायक प्रकाशात सर्वजण परमेश्वराबरोबर रासक्रीडा करतील.  
              येथील विद्यालये म्हणजे गुरुकुले आहेत तेथे वेदांमधील ज्ञान आचरणात कसे आणावे हे शिकवले जाते. येथील विज्ञान म्हणजे केवळ शुद्ध आध्यात्मिक विज्ञान, ह्याची बरोबरी कशाशीही होऊ शकत नाही.  येथे केवळ आंतरिक ज्ञान दिले जाते, बाह्यविषयक ज्ञान दिले जात नाही. येथील सर्व बालके ज्ञानसंपन्न असतील. 
              येथे आध्यात्मिक ज्ञानाव्यतिरिक्त अन्य कोणतेही शिक्षण दिले जात नाही. येथे वेदमंत्रोच्चारणाच्या ध्वनिशिवाय अन्य कोणताही ध्वनी नाही. येथे जात, धर्म, वंश आणि भाषा असा कोणताही भेदभाव नाही.  

संदर्भ - श्री वसंत साईंच्या Bliss, Bliss, Bliss ह्या पुस्तकातून. 

जय साईराम 


गुरुवार, २१ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

            " अनंत अवकाशाला कोण मर्यादा घालणार ? अमर्याद महासागराला कोण बंधन घालणार ? त्याच प्रमाणे सर्वव्यापी प्रेमाला कोणत्याही मर्यादा वा बंधने नाहीत. "

प्रकरण सहा

सतीत्व 

                मी जे जे काही पाहते ते सर्व भगवंताशी जोडते. याचा उल्लेख मी ' योगसूत्र ' पुस्तकात ' तोडजोड ' या प्रकरणात केला आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट मी भगवंताशी जोडली. जगातील कोणतीही गोष्ट, कोणताही विचार माझ्या मनाला स्पर्श करणार नाही यासाठी मी सदैव जागरुक असते. अन्य विचार मला रावणसमान वाटतात. आपण नेहमी बाह्य कृती विचारात घेतो. आपण म्हणतो, " हे सत्कृत्य आहे, ते दुष्कृत्य आहे." मनुष्याची त्याच्या कर्मावरून पारख केली जाते. हा मनुष्य चांगला आहे, तो मनुष्य वाईट आहे. तथापि त्याच्या मनातील विचारांबद्दल आपण अनभिज्ञच असतो. आपल्याला त्याच्या मनाचे गुणविशेष माहीत नसतात. वरवर पाहता एखादा सत्कृत्ये करत असेलही परंतु त्याचा अंतरात्मा मत्सर, क्रोध,आसक्ती, तिरस्कार अशा दुर्गुणांनी व अहंकाराने (मी व माझे ) भरलेला असू शकतो. 
               आपला प्रत्येक भाव एक सुप्त राक्षस असतो. एखाद्या व्यक्तीची बाह्यकर्मे चांगली असूनही, जर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तीव्र लालसा असेल तर ती व्यक्ती रावणच म्हणायला हवी. एखादी व्यक्ती अंतरात क्रोध ठेऊन बाहेर महान भक्तीचा देखावा करता असेल, सेवाकार्य करत असेल तर ती व्यक्ती हिरण्यकश्यपू ठरेल. म्हणून आपण लोकांच्या बाह्यकर्मांवरून त्यांची  पारख  न करता त्यांचे भाव आणि गुणावगुणांची परीक्षा केली पाहिजे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १७ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " रात्रंदिवस आपले भाव आपण परमेश्वराला अर्पण केले तर ती २४ तास अखंड परमेश्वराची पूजा होईल. "

प्रकरण सहा 

सतीत्व 

              स्वामींनी त्यांच्या काव्यरचनेतून पातिव्रत्याचे सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. ध्यानानंतर ती काव्यरचना मी माझ्या डायरीमध्ये लिहिली. माझ्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. मला त्यांचे स्पष्टीकरण पेलता येत नव्हते. मी जर पातिव्रत्यावर पुस्तक लिहायला घेतले असते, तर स्वामींनी लिहिलेल्या कवितेच्या सहजसोप्या मार्गाने त्याचे स्पष्टीकरण देता आले असते. ही एक कविताच त्यासाठी पुरेशी आहे. स्वामी म्हणले की रावणाने केलेले सीतेचे अपहरण ही एक बाह्य कृती आहे ; सीतेला अग्निपरीक्षा देऊन आपले पावित्र्य सिद्ध करावे लागले. माझे भावपावित्र्य आंतरीक आहे. प्रत्येकक्षणी मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराबाबत मी पूर्णतः सतर्क असते. लहानपणापासूनच ही सवय माझ्या अंगवळणी पडली आहे. मी प्रत्येक विचारावर लक्ष ठेवते आणि स्वतःमध्ये बदल घडवते. अन्य विचाररूपी रावण मला स्पर्श करणार नाही, याबाबत मी सदैव सावधान असते. माझ्या या सवयीमुळे अन्य भावभावना मनाला स्पर्श करत नाहीत. माझे भावविश्व फक्त भगवंताशी म्हणजेच स्वामींशी निगडित आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, १४ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " दिखाऊ कर्मकांडापेक्षा अंतर्भक्ति अधिक परिणामकारक आहे. " 

प्रकरण सहा 

सतीत्व 

१७ फेब्रुवारी २००९ ८सकाळचे ध्यान 

वसंता - स्वामी, मी पातिव्रत्याबद्दल लिहितेय, प्लीज मला त्याविषयी काही सांगा ना. 
स्वामी - रावणाने केलेले सीतेचे अपहरण ही एक बाह्यात्कारी कृती होती. पतिव्रतेच्या मनाला शिवणारा प्रत्येक विचार हा रावणच असतो असे सांगून तू पातिव्रत्याची व्याख्याच बदललीस. तू संपूर्ण सृष्टीमध्ये परमेश्वरालाच पाहतेस. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडून तू योगसूत्र लिहितेस. स्वामींनी एक काव्य म्हटले. ते खाली देत आहे.

हे प्रिये, 

विचारी तू मला व्याख्या पातिव्रत्याची  
अनेक महान पतिव्रता आहेत इथे 
तथापि मूर्तिमंत पातिव्रत्य देखील ना कोणी 
भूतलावरील तुझे आगमन 
एक अपूर्व अद्भूत उदाहरण 
प्रेम तुझे पाहून 
जीव माझा व्याकुळतो 
कशा साहू मी कळा ज्या लागल्या जीवा 
वैश्विक कालयंत्र दर्शवते पातिव्रत्य तुझे 
त्या पातिव्रत्यातून होई निर्मिती नवयुगाची 
जे जे रूप पाहसी लोचनी - तो एकमात्र परमेश्वर 
अन्य रूप दिसता म्हणसी ... 
नष्ट झाले पावित्र्य लोचनांचे 
जे जे बोल उच्चारसी - केवळ प्रभूचे गुणगान 
अन्य उच्चारण होता म्हणसी .... 
नष्ट झाले पावित्र्य वाणीचे 
विचार तुझे फेर धरती - त्या एकमात्र परमेशाभोवती 
अन्य विचार येता म्हणसी ..... 
नष्ट झाले पावित्र्य विचारांचे 
जे जे श्रवण करीसी - केवळ ईश वाणी 
हुकता श्रवण ईशवाणीचे म्हणसी .... 
नष्ट झाले पावित्र्य कर्णेंद्रियांचे  
स्पर्श करीसी तू त्या एकमात्र परमेशासी 
चुकता स्पर्श म्हणसी .... 
नष्ट झाले पावित्र्य स्पर्शाचे 
सृष्टीत पाहसी अखिल रूप सृष्टीकर्त्याचे 
कला जाणूनी परिवर्तनाची   
लीलया करीसी परिवर्तन तू 
सृष्टीचे सृष्टीकर्त्यात  

वसंता - स्वामी, मी हे पत्रामध्ये लिहिते, कृपया तुम्ही ते घ्या. 
स्वामी - हो. मी नक्की घेईन. 
वसंता - स्वामी, सिमला गुहेमध्ये लिंग होते का ? तुम्ही त्याबद्दल काहीच सांगितले नाहीत. 
स्वामी - हो. तेथे लिंग होते. लक्ष्मी गुहेतील लिंग सपाट होते आणि सिमल्यातील लिंग उंच होते. ते सतत तुझेच सेवन करत असल्यामुळे ते वाढत आहे. मी तुझ्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी प्रतीक्षा करतो आहे. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम     

रविवार, १० मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " आपल्या भक्तीची गुणवत्ता म्हणजे आपल्या मनोदशेचे थेट प्रतिबिंब." 

प्रकरण सहा 

सतीत्व 

सतीत्व संहिता 

            स्वामींनी मला माझ्या सतीत्व संहितेबद्दल लिहिण्यास सांगितले. त्याची यादी मी खाली देत आहे. 

१) दिवसाचे २४ तास मी स्वामींच्याच विचारात असायला हवे. अन्य कोणताही विचार माझे पातिव्रत्य कलंकित करेल. 
२) परमेश्वराच्या विचारात राहण्यामध्ये खंड पडेल म्हणून मला झोपही नकोशी वाटे. मी सतत १५ वर्षे जागून काढली आहेत. झोप मला परमेश्वरापासून दूर करू शकते म्हणून झोपसुद्धा माझ्या पातिव्रत्याला कलंकच आहे. 
३) मला समाधी नको. जर मी समाधी अवस्थेत गेले तर मी स्वामींशी बोलू शकणार नाही. मला फक्त स्वामी हवेत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ७ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रेमाद्वारे त्यागाची जोपासना होते. त्यागामुळे प्रेम फोफावते. " 

प्रकरण सहा 

सतीत्व 

                २००१ मध्ये स्वामींनी मला माझे मंगळसूत्र काढायला सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वतः आशीर्वाद दिलेले मंगळसूत्र मला घालायला सांगितले. आता स्वामींनी मला स्पष्ट करून सांगितले, की सिमल्यामध्ये त्यांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्रच घातले होते. ते म्हणाले की त्यामुळे मला पत्नीचे स्थान प्राप्त होऊन आमच्यामध्ये शाश्वत बंध प्रस्थापित झाले. मी त्यांचे मंगळसूत्र घातले. ह्या नात्याचा मला अधिकार आहे. तथापि स्वामी हे सर्व जगासमोर घोषित करेपर्यंत मला प्रतीक्षा करणे भाग आहे.  


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

सोमवार, ४ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

शिवरात्रीचे महत्व

              शिवरात्रीमध्ये काय असे विशेष आहे ?वास्तविक आपण अनेक रात्री अनुभवतो परंतु ह्या रात्रीला आपण शिवरात्र का म्हणतो ? शिवरात्र म्हणजे मंगलरात्र, पवित्ररात्र. म्हणून ही मंगलरात्र परमेश्वराच्या पवित्र नामाचे उच्चारण करण्यात व्यतीत केली पाहिजे. शिवरात्र म्हणजे केवळ रात्रभर जागरण करणे नव्हे. काही लोकं रात्रभर जागरण करतात आणि जागरण करून ते काय करतात ? रात्रभर पत्ते खेळणे ह्याला तुम्ही जागरण म्हणू शकत नाही. किंवा तीन, चार लागोपाठ चित्रपट पाहून जागरण केले असे म्हणू शकत नाही. शिवरात्र म्हणजे केवळ परमेश्वराच्या नामस्मरणात रात्र घालवणे. ते नामस्मरणही अंतःकरणातून यायला हवे. म्हणून याला ' अंतरात्म्याचे चिंतन, मनन ' असे म्हटले जाते. अंतःकरणापासून येणाऱ्या परमेश्वराच्या पवित्र नामाला ' शिवतत्व ' असे म्हणतात. आपण जे काही करतो ते आतून यायला हवे. उस्फूर्तपणे यायला हवे बळजबरीने नव्हे. जे करायचे ते मनापासून व प्रेमाने केले पाहिजे. प्रेमही उत्स्फूर्त हवे बळजबरीचे नव्हे. आजकाल आपण सर्व बळजबरीतून करत असतो हे योग्य नाही. तुम्ही सर्व गोष्टी (नामस्मरण )मनापासून केल पाहिजे मग ते अर्ध्या मिनीटाचे का असेना ! एक चमचा साखर, एक चमचा गायीचे दूध पुरेसे आहे. त्या ऐवजी हंडाभर गाढवीणीचे दूध कशाला ?
               मनुष्याची १० इंद्रिये त्याला कुमार्गावर घेऊन जाण्यास जबाबदार असतात. शिवरात्र ह्या शब्दामध्ये शि, व, रा, त्र अशी चार अक्षरे आहेत. ह्या चार अक्षरांचा अर्थ व संख्याशास्त्र ह्यामध्ये जवळचा संबंध आहे. ' शि ' हे अक्षर ५ ह्या आकड्याचे, ' व  ' ४ ह्या आकड्याचे, ' रा ' २ ह्या आकड्याचे प्रतिनिधित्त्व करते. ५ + ४ +२ ह्याची बेरीज ११ येते. ५ कर्मेंद्रिये, ५ ज्ञानेंद्रिये आणि मन ह्याची बेरीज ११ येते. हे ११ रुद्र आहेत. हे एकादश रुद्र काय करतात. ते मनुष्याला भौतिक गोष्टींच्या विश्वामध्ये ओढतात; त्यांच्या क्षुद्र इच्छा वाढवतात व त्याला भौतिक जगामध्ये हरवून जाण्यास भाग पडतात. ह्या ११ रुद्रांच्या पलीकडे एक अस्तित्व आहे ते म्हणजे ' परमात्मा '. त्या बाराव्यास जर आपण घट्ट धरून ठेवल तर आपल्याला  इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येते. म्हणून आपण या १२ व्या अस्तित्वाकडे, परमात्म्याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.
              शिवरात्र - १५ कला नियंत्रणामध्ये आहेत आणि केवळ मनाची एक कला जिंकायची आहे .
               रात्र मूलतः काळोखाचे प्रतिक आहे. चंद्रमा मनसो जातः | चक्षोः सूर्यो अजायत. चंद्र आणि मन ह्यांचे जवळचे नाते आहे. आज चतुर्दशी आहे. चंद्राच्या १६ कला आहेत तसेच मानवी मनालाही १६ कला आहेत. आज मनुष्याने मनाच्या १५ कला जिंकल्या आहेत आणि त्याला केवळ मनाच्या एका कलेवर विजय मिळवायचा आहे. ह्याच कारणामुळे आज मानवता परमेश्वराच्या अत्यंत निकट आहे, जो कोणी आज हृदयाच्या गाभ्यापासून परमेश्वराचे नामस्मरण करेल त्याला अलभ्य लाभ होईल. 
              आजचा संपूर्ण वेळ, मनाला इतस्तः भटकू न देता केवळ परमेश्वराच्या चिंतनात घालवणे आवश्यक आहे. ह्या अमूल्य समयातील एक क्षणही व्यर्थ दवडू नका. क्षणाक्षणाने बर्फाच्या खड्यासारखा समय कमी कमी होत आहे ! छिद्र असलेल्या भांड्यातून जसे पाणी गळते तसे आपले आयुष्य सतत कमी होते. असे असताना, आपण पुढे कधीतरी परमेश्वराची भक्ती करू, अशा विचारांना थारा देऊ नका. परमेश्वराची भक्ती लांबणीवर टाकली जाऊ  नये ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. आपल्याला लाभलेल्या या महद्भाग्याची आंनदाने अनुभूती घ्या व त्याचे सार्थक करा. 
- बाबा 



जय साईराम 


रविवार, ३ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " छोट्या छोट्या गोष्टींच्या त्याग करा आणि पहा त्यातून तुम्हाला केवढा आनंद मिळतो."

प्रकरण सहा

सतीत्व

              माझे एका दुसऱ्या व्यक्तीशी लग्न झाले या शोकाने मी आक्रोश करत होते. तेव्हा स्वामींनी हे सिद्ध केले की त्यांनीच माझ्याशी विवाह केला होता. विवाहानंतर सहा वर्षांनी दिव्यत्वाचा एक छोटासा अंश त्या रूपामध्ये ठेवून ते त्या रुपामधून बाहेर पडले. हेही स्वामींनी उघड केले. मी टाहो फोडून म्हणत होते," मला फक्त परमेश्वराबरोबर रहायचे आहे असे असूनही मी त्या रुपाबरोबर (पतीबरोबर ) का राहत होते ? हा माझ्या पातिव्रत्याला लागलेला कलंक आहे. " या विचाराने माझे मन अत्यंत उद्विग्न झाले होते. त्यानंतर स्वामींनी उघड केले की दिव्यत्व आमच्या दोन्ही देहांमधून सोडून गेल्यानंतर केवळ आमच्या दोघांचे मायादेह तेथे एकत्र राहत होते.
              आमचे दिव्यत्व सोडून गेल्यानंतर स्वामी मला म्हणाले," तू माझ्या अंतर्यामी राहा." मी म्हणाले," नाही नाही. ते माझ्या दृष्टीने योग्य नाही. मी त्यांच्यामधूनच आले आहे. मी त्यांच्यामध्येच होते. त्यांनी मला त्यांच्यापासून वेगळे केल्यामुळे माझा जन्म झाला. मी भूतलावर जन्म घेतला. जरी त्यांनी सिद्ध केले असले की त्यांनीच माझ्याशी विवाह केला तरी सर्वांना माहित आहे ते भगवान आहेत. अवतार आहेत. ते जोपर्यंत माझा प्रत्यक्ष स्वीकार करत नाहीत तोपर्यंत ' त्यांच्या अंतर्यामी माझे अस्तित्व ' म्हणजे माझ्या सतीत्वाला कलंक ठरेल . हे एखाद्या अपहारित संपत्तीसारखे मला वाटते . म्हणूनच ते जोपर्यंत माझा प्रत्यक्ष स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत मी सिमला गुहेमध्ये तप केले. स्वामी स्वतः सिमल्याला आले आणि त्यांनी इतरांसमोर माझ्या गळ्यामध्ये हार घेतला. त्यांनी आमच्यामधील नात्याचा अधिकार प्रस्थापित करण्याआधीच मला स्पर्श केला. ते मला अजिबात आवडले नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम