ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" रात्रंदिवस आपले भाव आपण परमेश्वराला अर्पण केले तर ती २४ तास अखंड परमेश्वराची पूजा होईल. "
प्रकरण सहा
सतीत्व
स्वामींनी त्यांच्या काव्यरचनेतून पातिव्रत्याचे सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. ध्यानानंतर ती काव्यरचना मी माझ्या डायरीमध्ये लिहिली. माझ्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. मला त्यांचे स्पष्टीकरण पेलता येत नव्हते. मी जर पातिव्रत्यावर पुस्तक लिहायला घेतले असते, तर स्वामींनी लिहिलेल्या कवितेच्या सहजसोप्या मार्गाने त्याचे स्पष्टीकरण देता आले असते. ही एक कविताच त्यासाठी पुरेशी आहे. स्वामी म्हणले की रावणाने केलेले सीतेचे अपहरण ही एक बाह्य कृती आहे ; सीतेला अग्निपरीक्षा देऊन आपले पावित्र्य सिद्ध करावे लागले. माझे भावपावित्र्य आंतरीक आहे. प्रत्येकक्षणी मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराबाबत मी पूर्णतः सतर्क असते. लहानपणापासूनच ही सवय माझ्या अंगवळणी पडली आहे. मी प्रत्येक विचारावर लक्ष ठेवते आणि स्वतःमध्ये बदल घडवते. अन्य विचाररूपी रावण मला स्पर्श करणार नाही, याबाबत मी सदैव सावधान असते. माझ्या या सवयीमुळे अन्य भावभावना मनाला स्पर्श करत नाहीत. माझे भावविश्व फक्त भगवंताशी म्हणजेच स्वामींशी निगडित आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा