ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" दिखाऊ कर्मकांडापेक्षा अंतर्भक्ति अधिक परिणामकारक आहे. "
प्रकरण सहा
सतीत्व
वसंता - स्वामी, मी पातिव्रत्याबद्दल लिहितेय, प्लीज मला त्याविषयी काही सांगा ना.
स्वामी - रावणाने केलेले सीतेचे अपहरण ही एक बाह्यात्कारी कृती होती. पतिव्रतेच्या मनाला शिवणारा प्रत्येक विचार हा रावणच असतो असे सांगून तू पातिव्रत्याची व्याख्याच बदललीस. तू संपूर्ण सृष्टीमध्ये परमेश्वरालाच पाहतेस. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडून तू योगसूत्र लिहितेस. स्वामींनी एक काव्य म्हटले. ते खाली देत आहे.
हे प्रिये,
विचारी तू मला व्याख्या पातिव्रत्याची
अनेक महान पतिव्रता आहेत इथे
तथापि मूर्तिमंत पातिव्रत्य देखील ना कोणी
भूतलावरील तुझे आगमन
एक अपूर्व अद्भूत उदाहरण
प्रेम तुझे पाहून
जीव माझा व्याकुळतो
कशा साहू मी कळा ज्या लागल्या जीवा
वैश्विक कालयंत्र दर्शवते पातिव्रत्य तुझे
त्या पातिव्रत्यातून होई निर्मिती नवयुगाची
जे जे रूप पाहसी लोचनी - तो एकमात्र परमेश्वर
अन्य रूप दिसता म्हणसी ...
नष्ट झाले पावित्र्य लोचनांचे
जे जे बोल उच्चारसी - केवळ प्रभूचे गुणगान
अन्य उच्चारण होता म्हणसी ....
नष्ट झाले पावित्र्य वाणीचे
विचार तुझे फेर धरती - त्या एकमात्र परमेशाभोवती
अन्य विचार येता म्हणसी .....
नष्ट झाले पावित्र्य विचारांचे
जे जे श्रवण करीसी - केवळ ईश वाणी
हुकता श्रवण ईशवाणीचे म्हणसी ....
नष्ट झाले पावित्र्य कर्णेंद्रियांचे
स्पर्श करीसी तू त्या एकमात्र परमेशासी
चुकता स्पर्श म्हणसी ....
नष्ट झाले पावित्र्य स्पर्शाचे
सृष्टीत पाहसी अखिल रूप सृष्टीकर्त्याचे
कला जाणूनी परिवर्तनाची
लीलया करीसी परिवर्तन तू
सृष्टीचे सृष्टीकर्त्यात
वसंता - स्वामी, मी हे पत्रामध्ये लिहिते, कृपया तुम्ही ते घ्या.
स्वामी - हो. मी नक्की घेईन.
वसंता - स्वामी, सिमला गुहेमध्ये लिंग होते का ? तुम्ही त्याबद्दल काहीच सांगितले नाहीत.
स्वामी - हो. तेथे लिंग होते. लक्ष्मी गुहेतील लिंग सपाट होते आणि सिमल्यातील लिंग उंच होते. ते सतत तुझेच सेवन करत असल्यामुळे ते वाढत आहे. मी तुझ्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी प्रतीक्षा करतो आहे.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा