ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" अनंत अवकाशाला कोण मर्यादा घालणार ? अमर्याद महासागराला कोण बंधन घालणार ? त्याच प्रमाणे सर्वव्यापी प्रेमाला कोणत्याही मर्यादा वा बंधने नाहीत. "
प्रकरण सहा
सतीत्व
मी जे जे काही पाहते ते सर्व भगवंताशी जोडते. याचा उल्लेख मी ' योगसूत्र ' पुस्तकात ' तोडजोड ' या प्रकरणात केला आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट मी भगवंताशी जोडली. जगातील कोणतीही गोष्ट, कोणताही विचार माझ्या मनाला स्पर्श करणार नाही यासाठी मी सदैव जागरुक असते. अन्य विचार मला रावणसमान वाटतात. आपण नेहमी बाह्य कृती विचारात घेतो. आपण म्हणतो, " हे सत्कृत्य आहे, ते दुष्कृत्य आहे." मनुष्याची त्याच्या कर्मावरून पारख केली जाते. हा मनुष्य चांगला आहे, तो मनुष्य वाईट आहे. तथापि त्याच्या मनातील विचारांबद्दल आपण अनभिज्ञच असतो. आपल्याला त्याच्या मनाचे गुणविशेष माहीत नसतात. वरवर पाहता एखादा सत्कृत्ये करत असेलही परंतु त्याचा अंतरात्मा मत्सर, क्रोध,आसक्ती, तिरस्कार अशा दुर्गुणांनी व अहंकाराने (मी व माझे ) भरलेला असू शकतो.
आपला प्रत्येक भाव एक सुप्त राक्षस असतो. एखाद्या व्यक्तीची बाह्यकर्मे चांगली असूनही, जर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तीव्र लालसा असेल तर ती व्यक्ती रावणच म्हणायला हवी. एखादी व्यक्ती अंतरात क्रोध ठेऊन बाहेर महान भक्तीचा देखावा करता असेल, सेवाकार्य करत असेल तर ती व्यक्ती हिरण्यकश्यपू ठरेल. म्हणून आपण लोकांच्या बाह्यकर्मांवरून त्यांची पारख न करता त्यांचे भाव आणि गुणावगुणांची परीक्षा केली पाहिजे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा