गुरुवार, २८ मार्च, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आचरणात न आणलेले ज्ञान अपूर्ण असते. "

प्रकरण सहा 

सतीत्व 

               हे संपूर्ण जगत विष्णूमय आहे. येथे अनेक महान स्त्रिया पातिव्रत्याचे आदर्श उदाहरण आहेत. त्यांचं सतीत्व सीमित आहे तर माझं अपरिमित आहे. या पातिव्रत्याद्वारे कलियुगाचे सत्ययुग होते. सिमल्याच्या गुहेमधील लिंग खूप उंच आहे. कारण माझे प्रेम भक्षण करून त्याची वाढ होते. मी हिमालयातील लक्ष्मी गुहेमध्ये तप केल्याचे, या अगोदर स्वामींनी सांगितले आहे. तेथील लिंग सपाट आहे. परमेश्वरच माझा आहार आहे हे ते दशवते. मी केवळ मुखानेच नव्हे तर पंचेंद्रियांद्वारे परमेश्वर भक्षण करते. माझ्या उसळणाऱ्या प्रत्येक भावामधून आणि पंचेंद्रियांमधून मी परमेश्वर ग्रहण करत असल्यामुळे तो माझ्या अणुरेणूंमध्ये मिसळून गेला आहे, माझ्या संपूर्ण देहामध्ये रक्त बनून वाहत आहे, हे मी माझ्या ' इथेच,  याक्षणी, मुक्ती ' या पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये लिहिले आहे. लक्ष्मी गुहेतील लिंग हे दर्शवते. आता स्वामी म्हणाले, की सिमल्यातील लिंग माझे प्रेम भक्षण करून उंच झाले. परमेश्वर माझे प्रेम भक्षण करून वृद्धिंगत होतो. 
             त्याचा आकार आणि वाढ बघता, एक अवतारात तो स्वतःला सामावू शकणार नाही. त्याला दुसरा अवतार घ्यावाच लागेल. तो त्रीविक्रम अवतारसारखा वाढतो आहे. या तीन अक्षरी प्रेमासाठी तो तीन अवतार घेईल. पहिला शिर्डी साई, नंतर सत्य साई आणि शेवटी प्रेम साई. लक्ष्मी गुहेमध्ये मी त्यांचे भक्षण केले. सिमला गुहेमध्ये त्यांनी माझे भक्षण केले. माझ्या विवाहनांतर मी सिमला गुहेत तप केले. माझ्या ४० वर्षांच्या तापानंतर २००१ मध्ये स्वामींनी मला मंगळसूत्र दिले. यावरून त्यांनी माझे भक्षण केले हे दिसून येते. या प्रेमभक्षणाची सांगता प्रेम साई अवतारात होईल. आपण माझी सतीत्व संहिता पुन्हा एकदा पाहू या. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा