गुरुवार, ३० मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " एका मागोमाग एक ज्ञानाची कवाडे खुली झाली की आपल्याला सत्याच्या सुवर्ण तेजाचे दर्शन होते. "

भाग -सातवा 

प्रेम सूत्र

            स्वामी कदाचित या  प्रेमाच्या महासागरात पोहतील, खोलवर जातील, सुरकांडीही मारतील परंतु ते या प्रेमाचं गहिरेपण कधीही जाणू शकणार नाहीत. ते ' परमेश्वर ' आहेत. ते ' अस्तित्व ' अवस्थेत आहेत.  राम आणि कृष्ण यांच्या काळात अवतारांनी प्रेमाची छोटीशी झलक आनंदाने अनुभवली. 
            रामाने अशा कोमल भावनांना फारसे स्थान दिले नाही. फक्त मिथिलेतील मार्गावरून जात असता त्याने सीतेला पाहिले तेव्हा प्रेम भावनेने त्याच्या हृदयाची तार छेडली. त्यानंतर रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर ' सीता, सीता ' असा टाहो फोडत राम सीतेच्या शोधार्थ गेले. त्यावेळी त्यांनी आपले प्रेम व्यक्त करून अश्रू ढाळले. रामाने सामान्य माणसाप्रमाणे क्वचितच आपल्या खऱ्या भावना व्यक्त केल्या. केवळ सीतेच्या विरह प्रसंगी त्यांचे भाव प्रकट झाले. 
            कृष्णाने राधेचे प्रेम अनुभवले. स्वामींनीही माझे प्रेम अनुभवले आहे. परंतु पूर्णत्वाने नाही. 
            श्री राम आणि श्री कृष्ण दोघांनी प्रेमाची ओझरती निकटता अनुभवली आहे. तथापि स्वामींनी व मी ही जवळीक अनुभवली नाहीय. आमचे प्रेम पूर्णत्वास पोहोचले नाही. ते अपूर्ण आहे. अधुरे आहे. 
             हनुमानाने त्याच्या रोमारोमात रामनाम गुंजत असल्याचे उघड केले. रामनाम त्याचे अविभाज्य अंग कसे काय बनले ? त्याच्या भक्तीची सखोलता दर्शवण्यासाठी हे घडले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम      

रविवार, २६ मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

      " माया सत्याला दडवून ठेवते. एकोहम बहुस्यामी हे सत्य जाणा. " 
भाग-सातवा

प्रेम सूत्र

            समुद्रातील एखाद्या विशिष्ठ स्थानाची खोली आपण मोजू शकतो. परंतु त्यावरून तीच संपूर्ण समुद्राची खोली आहे असे आपण म्हणू शकत नाही. माझ्या स्वामींवरील प्रेमाचे मोजमाप तरी कसे करणार ? हा प्रेमाचा महासागर आहे. या महासागरातील केवळ काही थेंबांमधून या पुस्तकांची निर्मिती झाली आहे. त्यातील अजून काही थेंबांमधून मी स्वामींना लिहिलेल्या पत्रांचे रूप आकारास आले आहे. माझ्या सोबत राहणाऱ्यांना कदाचित याहून थोडी अधिक (एक चमचाभर पाण्याइतकी ) कल्पना असेल. ज्यांना हे प्रेम जाणवते, ते या प्रेमाशी एकरूप होतात आणि या प्रेमाची अनुभूती घेतात, ते या प्रेमाच्या महासागरातून एक कपभर रसपान करू शकतात. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २३ मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
पुष्प सतरावे 
वसंत सत्य
         वेदिक धर्मग्रंथ व गीता सत्य प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी साधनेमध्ये उच्च अवस्था प्राप्त केली आहे केवळ त्यांनाच त्याचा बोध होतो. सत्याचे पूर्ण प्रकटीकरण करण्यासाठी, आता सत्य साई अवतार आला आहे. ह्या अवतारकाळात, उच्च अवस्था प्राप्त न केलेले लोकं,सामान्य जन, आपल्यासारखे मंद बुद्धी आणि एवढेच नव्हे तर पाषाणहृदयी लोकांनाही सत्याचा बोध होऊ शकेल. करुणामयी भगवान अत्यंत सोप्या व सुलभ रितीने सत्याची उकल करून सामान्य माणसाला परमेश्वराचा बोध करून देत आहेत. अवतार केवळ आपल्याला त्याच्याबरोबर स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येथे आला आहे हे लक्षात घ्या. तो दयाधन आहे. यापूर्वी कोणत्याही युगात असा अवतार झाला नाही. तो आपल्याला सत्याचा मार्ग दाखवून, आपल्याला सत्य बनवण्यासाठी येथे आला आहे. 
         स्वामी म्हणाले, " सामान्य माणसाला सत्याचा बोध होण्यासाठी तुझे लेखन व तुझी पुस्तके सहाय्यकारी ठरतात. तुझे जीवन आणि अनुभव सामान्यांना सुलभ रितीने वेद आणि उपनिषदांचे ज्ञान उलगडून दाखवतात.  हे वसंत सत्य आहे 
         जेव्हा अवतार भूतलावर येतात तेव्हा त्यांना त्यांच्या दिव्यत्वाचे ज्ञान असते. तू अवतार आहेस तथापि तुला ते ज्ञान नाही, तू एक जीव म्हणून जन्माला आलीस, साधनेद्वारे तू उच्चअवस्था प्राप्त केलीस. प्रत्येक जीवास तुझी अवस्था प्राप्त करणे शक्य आहे हे तू दर्शवते आहेस. अवताराचा महिमा जाणणे अवघड आहे. तू ज्या पद्धतीने जीवन जगते आहेस त्या जीवनप्रणालीचा सामान्य माणूसही अवलंब करू शकतो. अनुसरण करू शकतो. 
      स्वामींनी त्यांच्या वयाच्या १४ व्या वर्षी ते कोण आहेत, हे घोषित केले. त्यांनी अनेक चमत्कार केले. क्षणोक्षणी,  ते  परमपुरुष असल्याचे त्यांनी प्रकट केले. 
   मी स्वतःला छोट्या गावातील एक सामान्य स्त्री समजते. माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी कठोर तप केले. सामान्य जीवाचा शिव कसा बनतो हे मी माझ्या जीवनाद्वारे दर्शवत आहे. 
        मी माझे मन, इंद्रिये, अहंकार व बुद्धी ह्यांच्यावर ताबा मिळवून विजय मिळवला व सर्व स्वामींना समर्पित केले. १७ एप्रिल २००२ रोजी स्वामींनी सर्व स्वीकारून, माझा त्यांच्याशी योग झाल्याचे घोषित केले. त्यानंतर मी अधिक साधना केली व स्वतःला रिक्त केले. स्वामींनी ह्या रिक्त पात्राला त्यांच्या सत्याने भरून टाकले आणि त्याला वसंत सत्य असे संबोधित केले. छोट्या गावातील एक सामान्य स्त्री वसंता, वसंत सत्य कशी बनली हे माझे जीवन दर्शवते. 
         सकाळचे दर्शनासाठी स्वामी आले नाहीत. मी खूप रडले. 
३० जून २००४ 
स्वामी - रडू नकोस. प्रत्येक अवतारात मी तुझाच आहे. मी तुझ्या प्रेमाचा गुलाम आहे. ह्याचा पुरावा म्हणून मी हे लिहून ठेवेन. 
वसंता - स्वामी, असे नका म्हणू . 
स्वामी - तू जगद्जननी आहेस. तू तुझ्या मुलांची सुटका करण्यासाठी छोट्या गावातील एक सामान्य स्त्री बनून आलीस. वेदिक धर्मग्रंथांनी दाखवलेला मार्ग समजण्यास कठीण आहे. तुझे जीवन, परमेश्वराप्रत पोहोचण्याचा सोपा मार्ग दर्शवते. तुझ्या ध्येयाची परिपूर्ती करण्यासाठी मी येथे आलो आहे. 

संदर्भ - श्री वसंत साईंच्या May २७ to May २७. ह्या पुस्तकातून.  
जय साईराम   
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" वैराग्य सर्व इच्छांचा नाश करत मनुष्याला रिक्त करते. "

भाग- सातवा 

प्रेम सूत्र 

            जो प्रेम करतो तोच फक्त हे प्रेम जाणू शकेल. एवढेच काय पण ज्याच्यावर प्रेम केले जाते, त्यालाही हे अनाकलनीय आहे. 
            माझे स्वामींवर अतीव प्रेम आहे. परंतु ते ही माझ्या प्रेमाची खोली समजू शकणार नाहीत. 
             एखाद्या पर्वताकडे पाहून किंवा पुस्तकातील चित्र पाहून त्याच्या उंचीचा अंदाज घेता येतो. पर्वताची उंची मोजता येते. उदा. आपल्याला माऊंट एव्हरेस्टची उंची माहीत आहे. गिर्यायारोहक त्यावर चढून जातात व त्याची छायाचित्रे घेतात, हे आपण पाहतोच. परंतु समुद्राची खोली आपण कशी पाहू शकणार ?पृथ्वीची खोली आपल्याला कशी पाहता येणार ?

उर्वरित प्रकरण उर्वरित भागात ..... 

जय साईराम    

रविवार, १९ मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
 
सुविचार
 
" केवळ परमरेश्वराची इच्छा धरा. तोच एकमात्र सत्य आहे. " 

भाग - सातवा
 
प्रेम सूत्र 

सायं ध्यान 
वसंता - स्वामी, 'शिव सूत्र' पुस्तकातील 'प्रेम सप्ताह' हे शेवटचे प्रकरण मी लिहून पूर्ण केले. 
स्वामी - तू हे सर्व कसे काय लिहिलेस ? यातून परमोच्च ज्ञानावस्था प्रकट होते. 
वसंता - स्वामी, मी नाही लिहिले. माझ्या अंतरात असणाऱ्या तुम्हीच ते लिहिले आहे. स्वामी, कृपा करुन माझे पत्र घ्या.
स्वामी - एकीकडे तू म्हणतेस, की मी तुझ्या अंतर्यामी आहे आणि नंतर मी तुझे पत्र घ्यावे म्हणून करुण रूदनही करतेस. तू ह्या उच्च अवस्थेतून स्वतःला खालच्या पातळीवर उतरू देतेस. 
वसंता - स्वामी, ही प्रेमाची गहनता आहे. गहनातील गहन प्रेम. ज्ञानाला उंची असते तर प्रेमाला खोली. प्रेमासाठी दोघांची गरज असते, म्हणून ते गहन असते. एवढेच काय, तर तुम्हालाही या प्रेमाची सखोलता माहीत नाहीय. जो प्रेम व्यक्त करतो त्यालाच प्रेमाची खोली कळू शकते. ज्ञानाची शिखरे कोणीही पादाक्रांत करू शकेल किंवा दाखवू शकेल, तथापि प्रेमाची गहानता कुणालाही मोजता येणार नाही, दाखवता येणार नाही किंवा कोणी समजूही शकणार नाही. 
स्वामी - मी जिंकू शकत नाही. मी पुन्हा एकदा हारलो. 
वसंता - नाही स्वामी, मी सदैव तुमच्या चरणांची धूळच आहे. 
स्वामी - तुझ्या प्रेमाची गहानता कोणीही जाणू शकणार नाही. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, १६ मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या जन्मांची निर्मिती करत असता. तुमचे भाव तुम्हाला जन्ममृत्युच्या चक्रात ढकलतात."

भाग - सातवा
 
प्रेम सूत्र 

२४ जून २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, मला तुमच्याविषयी एवढे प्रेम का वाटते ? हे प्रेम मला वेडेपिसे बनवते. 
स्वामी - प्रेम सदैव भरभरून येते. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी व्यक्ती अथवा वस्तूची गरज असते. प्रेमाशिवाय जगाचे अस्तित्व असू शकत नाही. केवळ प्रेमाद्वारे जगाचे व्यवहार चालतात. 
वसंता - स्वामी, आता मला समजले. 
स्वामी - केवळ प्रेम जगाच्या अस्तित्वाचे कारण आहे. प्रेमामुळे जगाणे रूप धारण केले आहे. प्रेमभावनेला सदोदित द्यायची इच्छा असते. तुझं प्रेमसुद्धा तसंच आहे, ते सर्वांना देत असते. तुझ्याप्रेमाने संपूर्ण विश्वाला कवटाळले आहे. 
           प्रेम विस्तार पावते. प्रेमाशिवाय जग असूच शकत नाही. प्रेमाच्या पायावरच विश्वाची निर्मिती झाली आहे. प्रेमाशिवाय निर्मिती नाही. 
           दानशीलता (देण्याची वृत्ती ) हे प्रेमाचे वैशिष्ट्य आहे. दिल्याने प्रेम वाढते. प्रेम स्वतःला अनेक मार्गांनी व्यक्त करते. याबद्दल मी पूर्वी बरेच काही लिहिले आहे. 
            माझे प्रेमही असेच आहे. मला जे जे काही प्राप्त होते ते सर्वांमध्ये वाटून द्यावे असे मला वाटते. ह्या वसंताकडे जे काही आहे, ते सर्वांकडे असायलाच हवे. जंतूपासून ते ब्रह्मपर्यंत सर्वांकडे सारखेच असायला हवे. 
            मनुष्य म्हणतो, " मला हे हवे, मला ते हवे. " पैसा, घरदार, नावलौकिक, पदव्या, व्यवसाय सर्व अशाश्वत आहे. मी काय प्राप्त केले आहे ? परमेश्वराचे प्रेम, शाश्वत प्रेम, मोक्षावस्था, शाश्वत आनंद, शांती. सर्वांनी याचा आनंद लुटावा अशी माझी इच्छा आहे. कोणताही भेदभाव न पाहणारा माझा स्वभाव अखिल विश्वास आलिंगन देतो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १२ मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " तुमचे सर्व भाव ईश्वराकडे वळवा. राग आला तर तो परमेश्वराप्रती व्यक्त करा, " मला तुझे दर्शन का नाही मिळाले ? " त्यांच्यापाशी तुम्ही तुमचे भाव व्यक्त करा. "
भाग - सातवा 
प्रेम सूत्र 
           
          " माझे सर्वकाही तुम्हीच ....."

सूत्र पहिले 
दानशीलता 


           ' प्रेम सूत्र ' एक स्वतंत्र पुस्तक आहे. यामध्ये परमेश्वरावर प्रेमवर्षाव कसा करावा हे लिहिले आहे, कारण माझे संपूर्ण जीवनच प्रेमसूत्र आहे. काही संबंधित प्रकरणांचा मी या पुस्तकामध्ये समावेश केला आहे. 
            माझे जीवन आकाशगंगेप्रमाणे शुद्ध आणि पवित्र भावविश्वाने भरले आहे. या पवित्र जलौघावर मी ५० पुस्तके लिहिली त्यातील हे एक पुस्तक !  

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ९ मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " आपल्या अतृप्त इच्छा आकांक्षा व आसक्ती पुढील जन्मात आपल्या बरोबर येतात."

प्रकरण सहा 

सतीत्व 

            १९)  स्वामींनी एकदा मला विचारले, " आज मी परमेश्वर आहे. जर अचानक मी एखादा सामान्य मनुष्य बनलो तर तू काय करशील ?"
     मी म्हणाले, " मी सामान्य स्त्री बनेन."
     त्यावर त्यांनी विचारले," जर मी राक्षस बनलो तर तू                   काय करशील ?" 
     मी उत्तरले," मी राक्षसीण बनेन."
     पुन्हा स्वामींनी विचारले, " जर मी मोर असेन तर ?"
     मी म्हणाले," मी लांडोर बनेन." 
            सूक्ष्म जीवजंतूंपासून ते ब्रम्हापर्यंत जे कोणते रूप ते धारण करतील, त्या रूपातील नारीचे रूप धारण करून मी त्यांची सहचारिणी बनेन. माझा प्रिय परमेश्वर जे रूप धारण करेल त्या रूपाच्या नारीचे रूप मी धारण करेन. हा माझ्या पातिव्रत्याच्या कळस आहे. स्वामी पुढे म्हणाले, " जिथे जिथे परमेश्वर आहे तिथे तिथे तू आहेस." जर स्वामी ब्रम्हदेव असतील तर मी सरस्वती आहे, ते शिव असतील तर मी शक्ती आहे. ते विष्णू असतील तर मी लक्ष्मी आहे. देव, मनुष्य, पशुपक्षी, जीवजंतू, संपूर्ण निर्मितीमधील कोणत्याही रूपातील ते नर झाले तर मी नारी होते. माझे समर्थ पातिव्रत्य आणि दुर्दम्य इच्छा यातूनच नवनिर्मिती होईल. सर्व नर सत्य असतील व सर्व नारी प्रेम असतील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, ५ मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " आपल्या भावविश्वाने मनावर केलेले संस्कार आपला पुढील जन्म ठरवतात. "

प्रकरण सहा 

सतीत्व 

           १८) एकदा स्वामींनी मला विचारले," तू जर तुझ्या देहाचे वीस वर्षे वयाच्या देहात रूपांतर केलेस, तर माझे शरीर ९० वर्षे वयाचे असेल मग आपण एकमेकांना अनुसरून कसे होऊ ? मी म्हणाले, की त्यामुळे काही फरक पडत नाही. मला फक्त एवढेच माहीत आहे, की मला हा देह स्वामींना समर्पित करायचा आहे. परमेश्वर हा परमेश्वर आहे. त्याला वय नाही. 
            आपण परमेश्वराचे वय कसे काय ठरवणार ? आपण असे म्हणू शकतो का, की ते ८० वर्षांचे आहेत किंवा ९० वर्षांचे आहेत. 
            मी या देहामध्ये बदल घडवून तो त्यांच्या चरणी समर्पित करेन. मग त्यावेळेस त्यांचे वय किती का असेना !
            परमेश्वर ९० वर्षांचा आहे का ९०० वर्षांचा आहे ही बाब गौण आहे. तो परमेश्वर आहे. हा देह त्यांना अर्पण करायचा आहे. आणि म्हणून तो परिपूर्ण असावा, शुद्ध असावा असे मला वाटते. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २ मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

         " आपल्या मृत्युचे ठिकाण आणि वेळ ही अगोदरच निश्चित असते, व त्यानुसारच हे घडते. यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. " 

प्रकरण सहा 

सतीत्व 

            ह्या जन्मातील माझ्या विरहाश्रूंमुळे पुढील जन्मात स्वामी स्वतः रात्री मला झोपावतील आणि सकाळी उठवतील. हळुवारपणे माझा हात धरून मला खाली घेऊन येतील. सार काही परमेश्वर स्वतःच करेल. माझ्या एकाग्र पातिव्रत्याच्या हे प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी आहे. आज मी सर्व काही यांच्याकडे मागते,  म्हणून भविष्यामध्ये स्वामीच माझ्यासाठी सारकाही करतील. 
            १७) मला माझ्या स्थूल देह स्वामींना अर्पण करायचा आहे. याआधी जगातील कोणीही परमेश्वराला स्थूल देह अर्पण केलेला नाही. तथापि मला हा देह जसा आहे तसा अर्पण करायचा नाही. तरुणपणात माझ्या ज्या काही इच्छा होत्या, त्या इच्छांनुसार माझा देह असायला हवा. माझा देह व्याधीमुक्त असावा. तसेच वृद्धत्वाचा स्पर्श न होता चिरतरुण असावा. तीन मुलांना जन्म दिलेल्या या देहास कौमार्य अवस्था प्राप्त व्हायला हवी. हे संभवेल का ? हा ७० वर्षांचा देह पुन्हा तरुण, सुंदर, अक्षत आणि परिपूर्ण होऊ शकेल का ? ते शक्य आहे ? हो, हे शक्य आहे आणि निश्चितपणे घडेल. याच कारणासाठी मी माझे तप अखंड चालू ठेवेले आहे.


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम