गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

        " आसक्ती विरहित प्रेम दिव्य असून ते परमेश्वराचेच सत्य आहे." 

प्रकरण - आठ 

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

२९ जुलै २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, मी माझी आणि एकलव्याची तुलना करून लिहित आहे. तुमचे अखंड चिंतन केल्याने मला ज्ञान प्राप्त झाले. 
स्वामी - माझे अखंड चिंतन केल्याने तू ' मी ' झालीस. 
वसंता - स्वामी, मी माझा ' मी ' कापून तुम्हाला दिला, हे या कथेशी कसे जुळते ?
स्वामी - जसे एखाद्याला अंगठा नसेल तर तो धनुष्यबाण चालवू शकत नाही. तसे तुला ' मी ' नसल्यामुळे तू ब्रम्हावस्थेत आहेस हे तू जाणू शकत नाहीस. 
तू ब्रम्हावस्थेत आहेस हे तू जाणू शकत नाहीस. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

रविवार, २६ एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" शुद्ध भावांमुळे आपल्याला सत्याची दृष्टी प्राप्त होते."

प्रकरण - आठ

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये

           मी स्वामींकडून, माझ्या गुरूंकडून सर्व ज्ञान संपादन केले आहे. एकलव्याने स्वतःला धनुर्विद्येत पारंगत केले. त्याचप्रमाणे मी स्वतः साधना केली. परिणामतः माझ्याकडे अवतारपद आले. अंगठ्याविना निष्णात धनुर्धर काय करू शकतो ? त्याची सर्व कौशल्ये व्यर्थ ठरतात. 
            जेव्हा मला अवतारपद बहाल करण्यात आले तेव्हा मी ते गुरुदक्षिणा म्हणून समर्पित केले. या वसंताने ' मी ' कापून त्यांच्या चरणकमलांवर अर्पण केला. अवतारपद वा ब्रम्हपद मला प्राप्त झाले, या ज्ञानाचा ' मी ' विना काय उपयोग ?

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - २८ 

ब्रम्हन् वैश्विक स्तोत, शक्ती आणि आधार आहे 



           परमेश्वर अवतार घेऊन भूतलावर आला. त्याच्या प्रती असलेले माझे प्रेम म्हणजेच उदयास येणारे सत्य युग होय. त्याच्यामधून ध्वनी रूपात वेदाचा आद्य शब्द उत्पन्न झाला आणि अग्निरूपात माझा जन्म झाला. मी अग्नी आहे. जो कोणाला स्पर्श करत नाही व ज्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही. 
           परमेश्वराचा अवतार ही क्वचित घडणारी गोष्ट आहे. जेव्हा तो अवतार घेतो तेव्हा अखिल विश्वास त्याचा लाभ व्हायला नको का ? ह्याचसाठी मी स्वतःला अवतारापासून वेगळे केले व त्याची शक्ती म्हणून जन्म घेतला. मी त्याच्यापासून वेगळे होऊन जन्म घेतल्यामुळे आता पुन्हा त्याच्याकडे परतण्याचे माझे प्रयत्न म्हणजेच नवयुग होय. अज्ञानातून विश्व जागृत झाले पाहिजे व अवताराच्या पूर्ण सत्याची त्याने पूर्णतः अनुभूती घेतली पाहिजे. जेव्हा ह्या व्यक्तिगत वसंतेस परमेश्वर प्राप्ती होईल तेव्हा वसंतमयम् विश्वही परमेश्वरास प्राप्त करेल.
            ह्या वसंतअग्निच्या आराखड्यातून निर्माण होणारी सृष्टीही अग्निसामान असेल. ह्या अग्निसृष्टीमध्ये कोणतीही अपवित्रता, मलिनता वा कचरा नसेल त्या सर्वांचा तो नाश करेल. मग कोणी विचारेल," 
           वायु (हवा ) सर्वत्र वाहतो. आकाश सर्वास व्यापून टाकते. अग्नी स्वतः प्रकट होणार नाही तो उत्पन्न होण्यासाठी क्रिया होणे आवश्यक आहे. मानवी देह उबदार असतो. त्यातून तो जिवंत असल्याचे सिद्ध होते. जेव्हा देहातून प्राण बाहेर पडतो तेव्हा ही उब नाहीशी होऊन देह थंड पडतो. जीवन म्हणजे अग्नी होय. हा अग्नी देहाचे पोषण करतो. अग्नी देहाला कार्यशील बनवतो. मृत्युनंतर काही तासांमध्ये देहास दुर्गंध येऊ लागतो. इतकी वर्ष असंख्य भावभावनासमवेत नाचणारे ते नावं आणि रूप कोठे गेले ? देह अग्नीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर उरते केवळ मूठभर राख बाकी काही शिल्लक उरत नाही. 
           वसंतअग्निमधून उदयास आलेल्या नवनिर्मितीमध्ये ' मी आणि माझे ' चे कोणतेही मालिन्य असणार नाही. केवळ अस्ति, भाति आणि प्रियम हे परमेश्वराचे मूलभूत गुण असतील. सर्वजण अस्तित्व अवस्थेत सत्य असतील. सर्वजण ज्ञानाग्नी च्या तेजामध्ये प्रेमाने दिप्तीमान होतील. सर्व सत्य, ज्ञान आणि प्रेम असतील. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' ब्रम्हसूत्र ' पुस्तकातून

जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " परमेश्वराप्रत पोहोचण्याच्या प्रवासामध्ये ( मनातील ) भाव अत्यंत महत्वाचे आहेत ."

प्रकरण - आठ

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

            द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडव दोघांनाही धनुर्विद्या शिकवली. तथापि त्यांनी केवळ अर्जुनालाच शब्दभेदी तंत्र शिकवले. एकलव्याने हे तंत्र कसे आत्मसात केले ? मनामध्ये गुरूंची प्रतिष्ठापना करून आणि त्यांचे अखंड चिंतन करून एकलव्याच्या मनातील द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली. 
           त्याचप्रमाणे स्वामींच्या आणि माझ्यामध्ये प्रत्यक्ष बोलणे - चालणे नाही, मी त्यांच्या जवळ जात नाही, बोलत नाही व त्यांना स्पर्शही करत नाही. तरीही ते माझ्या हृदयात आहेत आणि मला सर्व स्पष्ट करून सांगत आहेत. 
            अंतर्यामी माझ्या केवळ त्यांचेच रूप आहे. एकलव्य ज्या पद्धतीने शिकला त्याच पद्धतीने मी स्वामींकडून शिकत आहे. मी माझ्या हृदयात स्वामींचा आवाज ऐकते. त्यामुळेच मी ही सर्व पुस्तके लिहू शकते. एकलव्याने त्याचा अंगठा गुरुदक्षिणेची स्वरूपात अर्पण केला. अंगठ्याशिवाय कोणीही धनुष्यबाण चालवू शकत नाही. हा खरा त्याग ! एकलव्याने गुरूंसाठी सर्वस्वाचा त्याग केला. त्याच्या त्या त्यागामुळे त्याचे नाव अमर झाले. केवळ नावच नव्हे तर तो अजरामर झाला. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १९ एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" या जगामध्ये आपण केवळ धडे घेण्यासाठी जन्म घेतला आहे. "

प्रकरण - आठ

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

            अर्जुन अत्यंत आनंदित झाला. धनुर्विद्येत त्याचा हात धरणारे कोणीही नव्हते. तो एकटाच धनुर्विद्येत निष्णात आहे याची त्याला घमेंड होती. त्याच्यात असूया आणि अहंकार होता, याउलट एकलव्य भटक्या जमातीतील एक नम्र पारधी होता. त्याने आपले कसब त्यागून गुरुदक्षिणा म्हणून समर्पित केले. या सध्यासुध्या जंगलवासी पारध्याकडे असणारी विनम्रता आणि निष्कपट वृत्ती त्या उच्चकुलीन राजपुत्राकडे नव्हती. केवळ तोच युवक असा त्याग करू शकला. हे कृष्णाच्या राण्यांची तुलना गोपगोपिकांशी करण्यासारखे आहे. या राजघराण्यातील स्त्रियांना अशिक्षित गोपगोपिकांप्रमाणे त्याग करणं जमलं नाही. 
          निरागसतेला जे स्थान प्राप्त होते, ते अहंकाराला कधीही मिळणार नाही.
          द्रोणाचार्यांनी एकलव्याची विनंती फेटाळून लावली. त्यांनतर एकलव्याने त्यांची मातीची प्रतिमा तयार केली. त्यांना गुरु मानून तो अखंड त्यांची भक्ती आणि चिंतन करू लागला. त्याने स्वतःच धनुर्विद्या आत्मसात केली. धनुर्विद्येत त्याने अर्जुनाइतकेच प्राविण्य मिळवले. त्याने ध्वनीच्या रोखाने बाण सोडून सावज टिपले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" कर्मफलाचा त्याग केल्यानंतरच परमेश्वर प्राप्ती होते. "

प्रकरण - आठ 

' मी विना मी  ' चे गुणवैशिष्ट्ये 

            द्रोणाचार्य उद्गारले, " मी एकलव्याचा गुरु नाही, मी त्याला हे शिकवले नाही." मग त्याने एकलव्याला विचारले, तो म्हणाला, " द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवण्याचे नाकारले हे खरे आहे. तथापि त्यांना गुरु मानून, त्यांचे अखंड चिंतन करून, या शब्दभेदी तंत्रासह सर्व कौशल्ये मी आत्मसात केली." ते ऐकून अर्जुनाला त्याच्याविषयी अधिकच असूया वाटली. तो स्वतःला  जगातील सर्वश्रेठ धनुर्धर समजत होता. अर्जुन द्रोणाचार्यांना म्हणाला," त्याने आत्मसात केलेले हे कसब तो कायमचे गमावले अशी तुम्ही व्यवस्था करा."
           त्यानंतर द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याला त्याच्या उजव्या हाताचा अंगठा देण्यास सांगितले. एकलव्याने क्षणाचाही विलंब न लावता द्रोणाचार्यांच्या ज्ञेचे पालन केले,आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुचरणी अर्पण केला. त्यानंतर त्याला पुन्हा धनुष्यबाण चालवता आला नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १२ एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " विवेक बुद्धी हा आपल्या आतील आवाज आहे. जेव्हा आपण चूक करतो तेव्हा तो आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. हा सत्य आणि सचोटीचा आवाज आहे. "

प्रकरण आठ 

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये

कौशल्य 

२९ जुलै २००८ 
            आज मी स्वामींचा गुरुपौर्णिमा संदेश वाचला. स्वामी एकलव्याविषयी बोलले. त्यावर चिंतन केल्यावर मनात एक सुंदर संकल्पना उमटली. 
             एकलव्य पारधी होता. तो जंगलात राहात असे. गुरु द्रोणाचार्यांकडे जाऊन त्याने त्यांना धनुर्विद्या शिकवण्याची विनंती केली. द्रोणाचार्यांनी त्याला समजावून सांगितले की, धनुर्विद्येचे कौशल्य हे केवळ वीरपुरुषांनाच शिकवले जाते. भटक्या जमातीतील पारध करणाऱ्या तरुणांना नाही. 
             एकलव्य घरी परतला. त्याने गुरूंचा मातीचा पुतळा बनवला व दररोज त्यांची भक्ती करू लागला. त्याने आपल्या हृदयात गुरु म्हणून द्रोणाचार्यांची स्थापना केली आणि त्यांचे अखंड चिंतन करून त्याने धनुर्विद्येचे  कौशल्य आत्मसात केले. तो एक निष्णात धनुर्धर बनला. एक दिवस पांडव द्रोणाचार्यांबरोबर शिकारीला निघाले. त्यांच्याबरोबर त्यांची कुत्रीही होती. जंगलात प्रवेश केल्यानंतर त्यातील एक कुत्रं भुंकू लागलं. तेवढ्यात एक बाण त्या कुत्र्याच्या तोंडात येऊन त्याचा आवाज बंद झाला. सर्वजण तो बाण मारणाऱ्याचा शोध घेत घेत एकालव्यापाशी आले. अर्जुनाने त्याला विचारले," तुला हे कसाब कोणी शिकवले ?" एकलव्याने द्रोणाचार्यांकडे बोट दाखवले. अर्जुन अर्जुन ईष्येंने अत्यंत क्रोधीत झाला. द्रोणाचार्यांना त्याने तक्रारवजा सुरात विचारले, " तुम्ही मला वचन दिले होते की, हे शब्दभेदी तंत्र ( केवळ ध्वनी ऐकून सावजाचा ठाव घेण्याचे यंत्र ) माझ्याशिवाय कोणालाही शिकवणार नाही."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" व्यक्तिगत आवडनिवडीने अंतर्ज्ञानाला झाकोळले आहे."

प्रकरण -आठ

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

           ज्योतीस्वरुपात स्वामींपासून वेगळी होऊन माझा जन्म झाला. परिणामस्वरूप मला ' मी ' नाही. ते एकतत्व दोघांत विभागल्यामुळे अतीव विरहवेदना आहेत. या ' मी ' विना ' मी ' चा ' मी ' स्वामी आहेत. त्यांचा माझ्या अंतरंगात वास आहे. ते माझ्याशी बोलतात आणि मला मार्गदर्शन करतात. मला काहीही माहीत नाही. त्यांनी मला सांगितले तरच मला कळते. मी एका भावरहित जड वस्तुसम आहे. माझ्यामध्ये फक्त एकच भाव आहे - तो म्हणजे स्वामींप्रती प्रेमभाव. माझ्यामध्ये देहभाव नाही, जो देहाच्या गरजा दर्शवतो. स्वामींनी दर्शवलेल्या उच्च अवस्थांविषयी मला गोडी वाटत नाही. एका बाजूला मी ब्रम्हपद प्राप्त करून ब्रम्हसूत्र लिहिले तर दुसऱ्या बाजूला मी हेही जाणत नाही की, मला भूक लागली आहे का मला वेदना होत आहेत , का मला बाथरूमला जाणे गरजेचे आहे. मला देहभाव नाही. हाच ' मी ' विना ' मी ' आहे. केवळ स्वामीच माझ्या अंतरंगात कार्यरत आहेत. 
           मी कोण आहे ? सदैव स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालणारी मी आहे - ' मी ' विना ' मी '. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

रविवार, ५ एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


 सामूहिक कर्म 


तारीख २६डिसेंबर २००८ सकाळचे ध्यान 

वसंता - कालच्या तुमच्या ख्रिसमसच्या प्रवचनात तुम्ही म्हणालात , ' सध्याच्या अशांत परिस्थितीत , चिंता करू नका . परमेशाचे नामस्मरण करा . ' तुम्ही म्हणालात सर्वांनी जप करावा . त्याविषयी थोड विस्तृत सांगा नं ! 
स्वामी - माणसावर जेव्हा संकट कोसळत आणि जीवन धोक्यात येत , फक्त तेव्हाच त्याला परमेश्वराची आठवण होते . सर्वत्र अशांती आहे . अशा चिंताजनक वेळी माणसाचे मन परमेश्वराकडे वळते . 
वसंता - स्वामी , पण चांगली माणसंही दुःख भोगताहेत . 
स्वामी - हे सर्वांचे सामूहिक कर्म  आहे . जेव्हा सत्य दुलक्षित होत , तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा त्रास होतो . तुझे अश्रु धरणीवर पडतात , पंचमहाभूते क्रोधीत होतात ; ते दुष्ट लोकांमध्ये शिरून त्यांच्या विध्वंसक वृत्ती जागृत करतात . कृष्णावतारात कित्येकांनी कृष्णाला दुर्लक्षिले . कित्येक लोकांना त्याचा राग येत असे , मत्सर आणि तिरस्कार वाटत असे . अनेकजण कौरवांना जाऊन मिळाले आणि युद्धात मेले . काही चांगली माणससुद्धा मेली . 
वसंता - स्वामी , पांडवांच्या बाजूलासुद्धा विध्वंस झाला , अभिमन्यु आणि पाच भांडवांनी त्यांचे जीव गमावले . 
स्वामी - प्रचंड वादळ येते , तेव्हा अनेक झाडे , वृक्ष उन्मळून पडतात . वारा चांगलं , वाईट असा भेदाभेद करीत नाही . 
वसंता - स्वामी , कृष्णाने अनेक लीला करून आपण परमेश्वर असल्याचे जाहीरपणे सांगितले . माझ्याजवळ अशा काही शक्ती नाहीत . 
स्वामी - तुला ' मी ' नाही , त्यामुळे तू आहेस तशीच रहा . तू तुझ्या शक्ती प्रकट केल्या आहेस . तू अनेक रोग बरे केलेस . ऋषी , नाडीशास्त्राद्वारे तू कोण आहेस हे सांगताहेत . जर लोक तुला दुर्लक्ष करीत राहिले , तर विध्वंस होत राहील . माझे सत्य मी जाहीर केले . मी माझा महिमा प्रकट केला . तरीसुद्धा लोक बरोबर वागत नाहीत . 
ध्यानाची समाप्ती 

          संकटकाळी माणसाला परमेश्वराची आठवण होते . एक म्हण आहे ,' सर्व संपुष्टात आल्यावर देवाचा धावा करण्यात काहीच अर्थ नाही .' जेव्हा सर्व आलबेल असत तेव्हा माणूस भौतिक वस्तूंच्यामागे धाव घेतो . तो सत्य -असत्याची , शाश्वत -अशाश्वततेची चिकित्सा करीत नाही . परमेश्वरच फक्त शाश्वत आहे , बाकी सर्व अशाश्वत आहे . हे सत्य न जाणल्याने माणूस जन्माला येतो आणि मरण पावतो . एका जीवात्म्याची ही स्थिती आहे . तरीसुद्धा जेव्हा संपूर्ण जगाला उत्पात आणि अशांती ग्रासते , तेव्हा विचार आपोआपच परमेश्वराकडे वळतात . बॉम्बस्फोट ,वादळ , पूर , युद्ध , भूकंप या सर्वांमुळे माणूस भयग्रस्त होतो . हे भय जीवनाच्या असुरक्षिततेचे असते . लोक सामूहिक प्रार्थना करतात . जेव्हा संकटे माणसाला सर्व बाजूंनी ग्रासतात आणि तो स्वतःच्या प्रयत्नांनी त्यातून मार्ग काढू शकत नाही , तेव्हा तो परमेश्वराकडे वळतो . जेव्हा माणसाच्या लक्षात येते की त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ गेले , तेव्हा तो परमेश्वराचा धावा करतो . उदाहरणार्थ , एका रुग्णाला खूप मोठा आजार झालेला आहे . तो बरा होण्यासाठी एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे फिरत राहतो . अखेरीस त्याला कळून चुकते की इतर कोणीही नाही , फक्त परमेश्वरच त्याची मदत करू शकतो . 
            सामूहिक कर्म म्हणजे सामूहिक विध्वंस . स्वामी म्हणाले की जेव्हा सत्य दुर्लक्षिले जाते तेव्हा हे घडते . पूर्वी धर्माच्या अधःपतनाने संहार झाला . आता कलियुगात सत्य दुर्लक्षित केल्यामुळे संहार होत आहे . 
           स्वामी म्हणतात की माझ्या अश्रुंमुळे जगात सर्वत्र अशांती आहे . स्वामी रामावतार आणि कृष्णावतारातील अनेक उदाहरणे देतात . रामावतारात रावणाने सीतामातेला पळवून नेल्यामुळे सामूहिक संहार झाला . प्रत्यक्ष परमेश्वराच्या पत्नीला दुःख दिल्यामुळे संपूर्ण कुळाचा नाश झाला . 
         द्वापारयुगात , परमेश्वराच्या जन्मापूर्वीच कंस त्याचा विरोधी झाला . कृष्णाचा जन्म झाल्यावर अनेकांनी त्याचा तिरस्कार केला . कृष्णाने अनेक बाललीला केल्या . पण लोकांनी त्याचा दिव्यत्वावर विश्वास ठेवला नाही . तो परमेश्वर आहे हे काळूनसुद्धा त्यांनी त्याचा रागराग केला . त्यामुळे खूप मोठा संहार झाला , महाभारताचे युद्ध होऊन प्रचंड मनुष्यहानी झाली . 
      धर्माचे अधःपतन झाले की अवतार पृथ्वीवर अवतरून दृष्टांचा नाश करतो व धर्मस्थापना करतो . पूर्वीच्या युगातील अवतारांचे हेच अवतारकार्य होते . आता स्वामी म्हणतात की सत्य दुर्लक्षिले जात आहे . सत्य आणि धर्म एकच आहेत . तीच परिस्थिती स्वामी नवीन शब्दात वर्णन करीत आहेत . सत्य दुर्लक्षिले जाते तेव्हाच धर्माचे अधःपतन होते . 
       त्रेतायुगात , परमेश्वराच्या पत्नीला पळवून नेले . राम परमेश्वर आहे हे सर्वांना ठाऊक होते , तरीसुद्धा हे घडले . कृष्ण परमेश्वर आहे हे माहीत असूनही त्याचा अपमान केला गेला . 
         जेव्हा माणूस साक्षात् परमेश्वराशी संघर्ष करतो , तेव्हा धरतीवर मोठ्या प्रमाणावर विध्वंस होतो . अवतार फक्त माणसाला वाचवण्यासाठी येतो . परंतु काही लोक त्याला विरोध करतात . परिणामतः सर्वांना त्रास भोगावा लागतो . यालाच म्हणतात सामूहिक कर्म . सध्या आपण अशीच परिस्थिती अनुभवत आहोत . स्वामी परमेश्वर आहेत हे लोकांना माहीत आहे . स्वामींचा महिमा , त्यांच्या लीला , त्यांचे चमत्कार लोक पहात आहेत. तरीसुद्धा ते त्यांच्याविरुद्ध वागतात . त्याचा परिणाम म्हणून खूप मोठा संहार होईल . 
      स्वामींनी माझ्या पहिल्या पुस्तकावर सही केली आणि म्हणाले की हे प्रशांती पुस्तकलायत ठेवले जावे . त्यांची आज्ञा पाळण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष तर केलेच , आणि इतकेच नव्हे तर मला प्रशांतीमध्ये येण्यास बंदी घातली . आता या घटनेला दहा वर्षे झाली , माझी अनेक पुस्तके प्रकाशित झाली . त्यांनतर स्वामींनी मला ' भगवंताचे अखेरचे ७ दिवस ' लिहायला सांगितले . भगवंताच्या अखेरच्या ७ दिवसांबद्दल कोण बरे इतके धैर्याने लिहू शकेल ? स्वामींनी माझ्या वाढदिवशी हे पुस्तक स्विकारले . आम्ही हे त्या पुस्तकात नमूद केले आहे . 
        ज्यांनी मला प्रशांतीमध्ये येण्यास बंदी घातली , त्यांना हे सर्व माहीत आहे . तरीसुद्धा सत्य जाणून घेण्यासाठी योग्य चौकशी न करता किंवा तपास न करता त्यांनी मला विरोध केला . हेच सत्य दुर्लक्षिणे होय . त्यांनी केवळ माझाच  नाही तर स्वामींचासुद्धा अपमान केला . याच कारणासाठी स्वामी त्यांचे भाव त्यांच्या प्रवचनात व्यक्त करतात . अलीकडेच त्यांच्या विजयादशमीच्या प्रवचनात स्वामी म्हणाले, 
            " अनेक लोक माझ्या शब्दांना महत्व देत नाहीत आणि  विचारातही घेत नाही . परंतु हे योग्य नव्हे . मी कुठल्याही बाबतीत जे काही बोलतो ते सत्य आणि फक्त सत्यच असते . जे माझ्याबरोबर वावरत आहेत त्यांनाही हे समजत नाही . याचा परिणाम असा होतो की , मी त्यांना सांगतो त्याकडे त्यांचे कधीकधी दुर्लक्ष होते..... त्यामुळे माझी अतिशय कुचंबणा होते ."
         परमेश्वर स्वतः तो कशा परिस्थितीत आहे याविषयी उघडपणे बोलत आहे , ही घटना म्हणजेच सत्याकडे दुर्लक्ष करणे होय . हे दुर्लक्षच जगभरातील संकटांचे कारण होय . काही थोड्या लोकांमुळे अनेक निरपराध्यांना क्लेश सहन करावे लागतात . तरीसुद्धा या सर्व घटना ,' सत्ययुगात आगमन ' - या दिव्य योजनेचा एक भाग आहेत . 

रामावतार - राक्षसांशी युद्ध - राक्षस कुळाचा संहार 
कृष्णावतार - महाभारत युद्ध - दुष्टांचा संहार 
सत्यसाई अवतार - पंचमहाभूतांमध्ये सुसूत्रतेचा अभाव - पूर , बॉम्बस्फोट , त्सुनामी , भूकंप - लोकांचे परिवर्तन .

           ऋषींनी नाडीशास्त्रात भविष्य वर्तवल्याप्रमाणे इथे मुक्ती निलयममध्ये भव्य स्तंभ - मुक्तीस्तूप बांधला गेला . हा काही नाव , संपत्ती किंवा प्रसिद्धीसाठी बांधला गेला नाही . सर्व ऋषींनी माझ्या आणि स्वामींच्या नात्याविषयी आधीच जाहीर केले आहे . हे वाचल्यावर काही लोकांनी मला स्वामींपासून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि प्रशांतीत प्रवेश नाकारला . 
      उत्पातांच्या आधारे तुम्ही तुमच्या स्वतःच्याच संहारास आणि सामूहिक संहारास कारणीभूत होत आहात. स्वामींना जे हवे आहे ते करू द्या , त्यांच्या कार्यात ढवळाढवळ करू नका . ते परमेश्वर आहेत . 
    सामूहिक कर्मांमुळे जगातील अनेक चांगली माणसेसुद्धा बळी पडत आहेत . परंतु संहारास कारणीभूत असणाऱ्यांना परमेश्वर शिक्षा न करता फक्त साक्षी राहतो . दुष्ट विचारांमुळे पंचमहाभूते प्रदूषित होतात आणि हेच उत्पातांच कारण असतं . प्रत्येक अवतारात इतिहासाची उजळणी होत असते . जेव्हा अवतार पृथ्वीवर स्वातंत्र्यनं धर्मस्थापना करतो , तेव्हा काहीजण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात . हेच मोठ्या संहाराचे कारण असते . 
          जेव्हा प्रत्यक्ष अवताराला त्रास होतो , तेव्हा उत्पात होतात . परंतु अवतार प्रत्यक्षपणे कुठलाही संहार करत नाही . त्यांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करणाऱ्यांना ते साधन बनवतात . जसे काट्याने काटा काढला जातो किंवा हिरा कापण्यासाठी हिराच वापरला जातो ; तसेच विध्वंसासाठी काही दुष्टांना साधन केले जाते . अशाप्रकारे , धर्मस्थापना होते आणि अवतार पृथ्वीवरून परत जातात . 

सामूहिक कर्मांसाठी सामूहिक नामस्मरण 

        अलीकडेच मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात ,अनेक निरपराध्यांना प्राण गमवावे लागले . सर्वजण विचारताहेत ,' हे असे का ?' जर दुष्ट लोकांना शिक्षा झाली , तर कोणी ' असे का ?' म्हणून विचारत नाहीत . ते म्हणतात , ' न्याय दिला गेला .' परंतु जेव्हा निरपराध बळी पडतात, तेव्हा ते विचारतात ,' का , कसे , काय ?' जेव्हा त्सुनामी आली तेव्हाही असेच झाले होते . गरीब लोकांना सर्वात जास्त त्रास झाला . सर्वांनी ' असे का ?' म्हणून विचारले . आता संपूर्ण जग चिंताजनक काळाला तोंड देत आहे . आर्थिक जगतात आणि रोख्यांच्या खरेदी - विक्री बाजारात मंदी आली आहे , सर्वांचे पैसे बुडताहेत . हे सर्व दुष्टांच्या कृत्यामुळे होते . त्यांचे विचार अवकाशात जातात , पंचमहाभूते प्रदूषित होतात आणि ती अस्थिर होतात . निसर्ग त्याचा क्रोध अनेक उत्पातांमधून दर्शवितो . 
        सध्याच्या परिस्थितीसाठी आपण दुसऱ्यांना दोष देऊ नये . आपण सर्वजण जबाबदार आहोत . तुम्ही स्वतःचा विचार करा . स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा . अशा चिंताजनक वेळी ही प्रत्येकाची जबाबदारी आहे . जीवन अतिशय कष्टाचे आहे . कधीही संकट कोसळू शकते याची जाणीव असू द्या . प्रयत्न करा , स्वतःला बदला . 
          स्वामी ख्रिसमसच्या प्रवचनात म्हणाले ,' काळजी करू नका . परमेश्वराचे नामस्मरण करा .' 
       स्वामी आपल्याला सतत नामस्मरण करण्यास सांगताहेत . परमेश्वराचे नामस्मरण हाच कलिला एकमेव पर्याय आहे . 
           आपण दिवसातून ३ वेळा जेवतो , खरेदीला जातो , पण जप करायला बसतो का ? सर्वजण हे करू शकतात . ह्या वस्तुस्तितीकडे दुर्लक्ष करू नका . जगभरातील लोकांसाठी ही गंभीर गोष्ट आहे .  जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता , तेव्हा तीन बोटे तुमच्यावर रोखलेली असतात . हे सर्व प्रतिबिंब , प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी आहे . परमेश्वराचे  नाव दिवसातून २०,००० वेळा घेण्याची प्रतिज्ञा करा  किंवा जितका जमेल तितका तरी जप करा . बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रतिज्ञा करा , ' मी दिवसातून २०,००० वेळा जप करीन .' अशाप्रकारे , सर्वांनाच फायदा होईल . परमेश्वराने काही पर्वत गिळण्यास सांगितला नाही . शांतपणे बसून नामस्मरण करा . कमी बोला , जास्त जप करा . हे तुमच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आहे . 
         पूर्वीच्या युगात लोकांनी तप आणि यज्ञ केले . आता परमेश्वर आपल्याला फक्त नामस्मरण करण्यास सांगत आहे . तुम्ही कोणाच्या नावाचा जप करता किंवा तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत हे महत्वाचे नाही . बुद्ध , येशू , अल्ला , राम इत्यादी परमेश्वराच्या अनेक नावांपैकी कोणाचेही नामस्मरण करा . सामूहिक कर्मातून मुक्त होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे ; नाहीतर खूप मोठ्या संख्येने माणसे मरतील .  
       गांधीजी सामूहिक प्रार्थनेला महत्व देत असत . आता आपण वैश्विक प्रश्नाला सामोरे जात आहोत . अशा संकटकाळी प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखावी आणि जप करावा . येणारा काळ अतिक्षय बिकट आहे , नेटाने काम करा. निदान वर्षभर तरी वायफळ गप्पा मारू नका . कोणाशीही अनावश्यक बोलू नका ; आणि कृपा करून मोबाईल फोनवर बोलू नका ;तुम्ही अवकाशात कचऱ्याची भर घालता .   
        स्वामींनी त्यांच्या प्रवचनात सांगितले की भिऊ नका , परमेश्वराचे नामस्मरण करा . हे ऐकल्यावर अनेकजण म्हणाले ,' स्वामींनी घाबरू नका म्हणून सांगितले आहे ... साईभक्तांना काहीही होणार नाही . ' त्यांना वाटते ,' आपण स्वामींचे भक्त आहोत , आपल्याला काहीही होणार नाही .' संकटकाळी कोणीही सहजपणे आपली जबाबदारी झटकून टाकतो . स्वामींच्या प्रवचनातून भक्त असा अर्थ काढू शकतात की त्यानं कसलेही भय नाही . तरीपण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी नामस्मरण केले नाही तर काय उपयोग ? तुम्ही नामस्मरण केलेत तर तुम्हाला भय नाही. पुरात सर्व वाहून जाते , पूर साईभक्ताला वळगत नाही . 
    साईभक्तांवर मदत करण्याची सर्वात जास्त जबाबदारी आहे . इतर कोणाहीपेक्षा आपण अधिक नामस्मरण करायला हवे . जर तुम्ही सच्चे भक्त असाल तर स्वामींचा आदेश तंतोतंत पाळा . नामजपाला अधिक वेळ द्या आणि इतर विरंगुळयांना कात द्या . कमी बोला . अशा संकटकाळी नामजप करा . नाहीतर , सामूहिक कर्मांपासून तुमची सुटका नाही . 

जय साईराम   

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

      " दिव्यत्व आपला खरा स्वभाव आहे , हे सत्य जाणून कोणत्याही गोष्टीने संभ्रमित न होणे हे ज्ञानाचे सौंदर्य आहे."

भाग -आठवा 

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

एकदा का तुझ्या मनाने एखाद्या गोष्टीची पकड घेतली की 
ती मिळेपर्यंत तू सोडत नाहीस 
तुझा विलाप थांबवण्यासाठी परमेशाने तुला विजय बहाल करायलाच हवा 
त्याशिवाय तुझा आक्रोश, रुदन आणि विलाप नाही थांबणार 
सावधान ! मनानी खचून जाऊ नकोस आणि प्रयत्नात कसूर करू नकोस 
हृदयातल्या माझ्याशी जवळीक साध, विजय तुझाच आहे! 
            जन्मतःच मला कृष्णाशी विवाह करून त्याच्यामध्ये सदेह विलीन होण्याची इच्छा आहे. तेव्हापासून आतापर्यंत या दोन गोष्टींची माझ्या मानाने पकड घेतली आहे. त्यांनी मला यशस्वी करायलाच हवं. 

*     *     *

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम