गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - २८ 

ब्रम्हन् वैश्विक स्तोत, शक्ती आणि आधार आहे 



           परमेश्वर अवतार घेऊन भूतलावर आला. त्याच्या प्रती असलेले माझे प्रेम म्हणजेच उदयास येणारे सत्य युग होय. त्याच्यामधून ध्वनी रूपात वेदाचा आद्य शब्द उत्पन्न झाला आणि अग्निरूपात माझा जन्म झाला. मी अग्नी आहे. जो कोणाला स्पर्श करत नाही व ज्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही. 
           परमेश्वराचा अवतार ही क्वचित घडणारी गोष्ट आहे. जेव्हा तो अवतार घेतो तेव्हा अखिल विश्वास त्याचा लाभ व्हायला नको का ? ह्याचसाठी मी स्वतःला अवतारापासून वेगळे केले व त्याची शक्ती म्हणून जन्म घेतला. मी त्याच्यापासून वेगळे होऊन जन्म घेतल्यामुळे आता पुन्हा त्याच्याकडे परतण्याचे माझे प्रयत्न म्हणजेच नवयुग होय. अज्ञानातून विश्व जागृत झाले पाहिजे व अवताराच्या पूर्ण सत्याची त्याने पूर्णतः अनुभूती घेतली पाहिजे. जेव्हा ह्या व्यक्तिगत वसंतेस परमेश्वर प्राप्ती होईल तेव्हा वसंतमयम् विश्वही परमेश्वरास प्राप्त करेल.
            ह्या वसंतअग्निच्या आराखड्यातून निर्माण होणारी सृष्टीही अग्निसामान असेल. ह्या अग्निसृष्टीमध्ये कोणतीही अपवित्रता, मलिनता वा कचरा नसेल त्या सर्वांचा तो नाश करेल. मग कोणी विचारेल," 
           वायु (हवा ) सर्वत्र वाहतो. आकाश सर्वास व्यापून टाकते. अग्नी स्वतः प्रकट होणार नाही तो उत्पन्न होण्यासाठी क्रिया होणे आवश्यक आहे. मानवी देह उबदार असतो. त्यातून तो जिवंत असल्याचे सिद्ध होते. जेव्हा देहातून प्राण बाहेर पडतो तेव्हा ही उब नाहीशी होऊन देह थंड पडतो. जीवन म्हणजे अग्नी होय. हा अग्नी देहाचे पोषण करतो. अग्नी देहाला कार्यशील बनवतो. मृत्युनंतर काही तासांमध्ये देहास दुर्गंध येऊ लागतो. इतकी वर्ष असंख्य भावभावनासमवेत नाचणारे ते नावं आणि रूप कोठे गेले ? देह अग्नीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर उरते केवळ मूठभर राख बाकी काही शिल्लक उरत नाही. 
           वसंतअग्निमधून उदयास आलेल्या नवनिर्मितीमध्ये ' मी आणि माझे ' चे कोणतेही मालिन्य असणार नाही. केवळ अस्ति, भाति आणि प्रियम हे परमेश्वराचे मूलभूत गुण असतील. सर्वजण अस्तित्व अवस्थेत सत्य असतील. सर्वजण ज्ञानाग्नी च्या तेजामध्ये प्रेमाने दिप्तीमान होतील. सर्व सत्य, ज्ञान आणि प्रेम असतील. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' ब्रम्हसूत्र ' पुस्तकातून

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा