ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" विवेक बुद्धी हा आपल्या आतील आवाज आहे. जेव्हा आपण चूक करतो तेव्हा तो आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. हा सत्य आणि सचोटीचा आवाज आहे. "
प्रकरण आठ
' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये
२९ जुलै २००८
आज मी स्वामींचा गुरुपौर्णिमा संदेश वाचला. स्वामी एकलव्याविषयी बोलले. त्यावर चिंतन केल्यावर मनात एक सुंदर संकल्पना उमटली.
एकलव्य पारधी होता. तो जंगलात राहात असे. गुरु द्रोणाचार्यांकडे जाऊन त्याने त्यांना धनुर्विद्या शिकवण्याची विनंती केली. द्रोणाचार्यांनी त्याला समजावून सांगितले की, धनुर्विद्येचे कौशल्य हे केवळ वीरपुरुषांनाच शिकवले जाते. भटक्या जमातीतील पारध करणाऱ्या तरुणांना नाही.
एकलव्य घरी परतला. त्याने गुरूंचा मातीचा पुतळा बनवला व दररोज त्यांची भक्ती करू लागला. त्याने आपल्या हृदयात गुरु म्हणून द्रोणाचार्यांची स्थापना केली आणि त्यांचे अखंड चिंतन करून त्याने धनुर्विद्येचे कौशल्य आत्मसात केले. तो एक निष्णात धनुर्धर बनला. एक दिवस पांडव द्रोणाचार्यांबरोबर शिकारीला निघाले. त्यांच्याबरोबर त्यांची कुत्रीही होती. जंगलात प्रवेश केल्यानंतर त्यातील एक कुत्रं भुंकू लागलं. तेवढ्यात एक बाण त्या कुत्र्याच्या तोंडात येऊन त्याचा आवाज बंद झाला. सर्वजण तो बाण मारणाऱ्याचा शोध घेत घेत एकालव्यापाशी आले. अर्जुनाने त्याला विचारले," तुला हे कसाब कोणी शिकवले ?" एकलव्याने द्रोणाचार्यांकडे बोट दाखवले. अर्जुन अर्जुन ईष्येंने अत्यंत क्रोधीत झाला. द्रोणाचार्यांना त्याने तक्रारवजा सुरात विचारले, " तुम्ही मला वचन दिले होते की, हे शब्दभेदी तंत्र ( केवळ ध्वनी ऐकून सावजाचा ठाव घेण्याचे यंत्र ) माझ्याशिवाय कोणालाही शिकवणार नाही."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा