गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " परमेश्वराप्रत पोहोचण्याच्या प्रवासामध्ये ( मनातील ) भाव अत्यंत महत्वाचे आहेत ."

प्रकरण - आठ

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

            द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडव दोघांनाही धनुर्विद्या शिकवली. तथापि त्यांनी केवळ अर्जुनालाच शब्दभेदी तंत्र शिकवले. एकलव्याने हे तंत्र कसे आत्मसात केले ? मनामध्ये गुरूंची प्रतिष्ठापना करून आणि त्यांचे अखंड चिंतन करून एकलव्याच्या मनातील द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली. 
           त्याचप्रमाणे स्वामींच्या आणि माझ्यामध्ये प्रत्यक्ष बोलणे - चालणे नाही, मी त्यांच्या जवळ जात नाही, बोलत नाही व त्यांना स्पर्शही करत नाही. तरीही ते माझ्या हृदयात आहेत आणि मला सर्व स्पष्ट करून सांगत आहेत. 
            अंतर्यामी माझ्या केवळ त्यांचेच रूप आहे. एकलव्य ज्या पद्धतीने शिकला त्याच पद्धतीने मी स्वामींकडून शिकत आहे. मी माझ्या हृदयात स्वामींचा आवाज ऐकते. त्यामुळेच मी ही सर्व पुस्तके लिहू शकते. एकलव्याने त्याचा अंगठा गुरुदक्षिणेची स्वरूपात अर्पण केला. अंगठ्याशिवाय कोणीही धनुष्यबाण चालवू शकत नाही. हा खरा त्याग ! एकलव्याने गुरूंसाठी सर्वस्वाचा त्याग केला. त्याच्या त्या त्यागामुळे त्याचे नाव अमर झाले. केवळ नावच नव्हे तर तो अजरामर झाला. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा