ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सत्य मनाला निर्मल बनवते. सत्य वचन ही अंतर्शुद्धी आहे. "
प्रकरण - आठ
' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये
प्रशांती - निलयम् येथून एक दूत आला व त्याने माझ्याकडे स्वामींच्या लिखाणावर स्पष्टीकरण मागितले. तो दूत म्हणाला,
* स्वामी तुमच्या लिखाणाने अत्यंत व्यथित झाले आहेत.
* तुमच्या पुस्तकातील मजकुराने अनेकजण संभ्रमात पडले आहेत.
* तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःला स्वामींशी जोडून जे लिहिता ते आम्हाला मान्य नाही.
* ह्या सर्वांमुळे स्वामींची प्रतिमा मालिन होत आहे.
* तुम्ही स्वतःला स्वामींहून अधिक सामर्थ्यशाली असल्याचे दर्शवत आहात.
* तुमच्या आश्रमाला परदेशातून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत आहेत.
* अनेक परदेशी भक्त तुमच्याबरोबर आश्रमामध्ये राहतात.
त्यांना माझ्यामध्ये आणि आश्रमामध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या, त्यामुळे मला असे वाटले की, त्यांच्या आरोपांना उत्तर देणे माझे कर्तव्य आहे. मी त्यांना माझी स्थिती व आश्रमाची परिस्थिती स्पष्ट करून सांगितली पाहिजे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा