ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प - २९
सत्याकडे दुर्लक्ष
भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायात, देव आणि असूर ह्यांच्यामधील युद्धाविषयी वर्णन केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की प्रत्येक मनुष्यामध्ये सत् आणि असत् (गुणांमध्ये ) युद्ध सुरु असते. हे युध्द सूक्ष्म स्तरावर चालते. महाभारतातील युध्द प्रत्यक्ष लढले गेले. ह्या अंतर्गत युद्धामध्ये, नेहमी दुष्प्रवृत्तींचा विजय होतो व मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फेऱ्यात ढकलले जाते. आपल्या गतकाळातील अनेक नकारात्मक गुणांमुळे आपण अनेक जन्म घेतले आहेत. आपण जन्म घेतला ह्यातूनच आपण शुद्धता प्राप्त केली नाही हे सिद्ध होते.
मनुष्यामध्ये उद्भवणारा प्रत्येक भाव, मनुष्याचे भावी जीवन निश्चित केले जाते. त्याच्या ह्या जीवनातील भावांद्वारे त्याच्या पुढील जन्माची निर्मिती होते. मनुष्याच्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट गुणांमध्ये सतत संघर्ष सुरु असतो. मनुष्याने वाईट विचारांना मनामध्ये प्रवेश करू देऊ नये. त्याने सदैव विनम्र असायला हवे.
हे युद्ध कधी समाप्त होईल हे कोण सांगू शकेल ? मनुष्य जन्म घेतो व मृत्यु पावतो. हजारो जन्म घेतल्यानंतर मनुष्य स्वतःला मुक्त करून घेतो.
अनेक वर्षांपूर्वी एक अनोखा विचार माझ्या मनात उद्भवला, " मी सर्वांना मुक्त का करू नये ?" सर्वांना मुक्ती मिळावी ह्या माझ्या इच्छेमुळे माझे वैश्विक मुक्तीचे तप सुरु झाले. माझ्या तपाने माझ्या ध्येयाची परिपूर्ती होईल. मी सर्वांच्या मनातील संस्कार दूर करून, त्यांना माझ्या सारखे बनवेन.
प्रत्येकामध्ये दुष्प्रवृत्ती वास करतात. त्यांचे उच्चाटन करण्याची इच्छा म्हणजे महाभारत युद्ध नव्हे तर महा जागतिक युद्ध होय. माझ्या तपोबलाने मी नवीन विश्वाची निर्मिती करेन. जेथे सर्वांठायी माझे गुण, परमेश्वराप्रती विशुद्ध प्रेम असेल.
अनेकजण माझ्यामध्ये दोष शोधतात. तथापि मी दोष स्वीकारून त्यांना क्षमा करते.
मी सत्य आहे हे सर्व नाडीग्रंथ दर्शवतात. सर्व महान ऋषी स्वामींच्या आणि माझ्यामधील बंधाविषयी सांगतात.
अनेकांना हे माहित आहे तथापि त्यांच्या वृत्ती बदलाल्या नाही. मग त्याचा काय उपयोग ? सत्य दुर्लक्षिले जात आहे. जेव्हा सत्य दुर्लक्षिले जाते तेव्हा पंचतत्वे क्रोधीत होतात. त्यांच्या क्रोधातून कोणीही सुटु शकत नाही. स्वामींनी, जरासंध, शिशुपाल, आणि कंस ह्यांच्या उदाहरणाद्वारे हे सत्य सिद्ध केले आहे.
संदर्भ - श्री वसंत साईंच्या शिवसूत्र ह्या पुस्तकातून.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा