ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर मनाने भगवद्नामाच्या अमृताची चव चाखली तर ते इतर कोणत्याही चवीचा विचार करणार नाही."
प्रकरण - आठ
' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये
प्रिय स्वामी,
तुमच्या चरणकमलांशी माझे अनंत कोटी प्रणाम !
स्वामी, तुम्ही मला ध्यानामध्ये सांगितलेला शब्द न् शब्द मी पुस्तकांमध्ये लिहिते. त्याने तुमची आणि तुमच्या ट्रस्टची अडचण होते, हे मला माहित नव्हते. मी सदैव एकाकी असल्यामुळे मला जगाची रीत माहीत नाही. गोष्टी जशा आहेत तशाच मी लिहिल्या आहेत. त्यामध्ये काही बदल करणे वा लपवाछपवी करणे मला माहीत नाही. आपल्यामध्ये होणारे संभाषणाच मी लिहिते. मला क्षमा करा. माझ्या वडिलांनी मला ' सर्वकर्म भगवद्प्रीत्यर्थ ' अशी शिकवण दिली आहे. मी लिहिलेल्या पुस्तकातून जर तुम्हाला आनंद मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग ? मला केवळ तुमचे प्रेम हवे आहे.मला नावलौकिक नको, आश्रम नको, हे सर्व तुम्ही जाणता. जरी माझा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला असला तरी मी वयाच्या एकविसाव्या वर्षी धन, दागदागिने, किमती साड्या यांचा त्याग केला व विनयशील साधी राहणी अंगीकारली. परमेश्वर प्राप्ती हे माझे एकमेव ध्येय आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा