ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर आपण मनाची परमेश्वराशी गाठ बांधली तर ते नियंत्रणात येईल आणि फलस्वरूप विश्वातील कोणतीही गोष्ट आपल्याला स्पर्श करणार नाही. "
प्रकरण - आठवे
' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये
ध्यान म्हणजे बैठक घालून काही तास चिंतन करणे. मी गेली ७० वर्षे ✕ १२ महिने ✕ ३० दिवस ✕ २४ तास ✕ ६० मिनिटे ✕६० सेकंद इतका वेळ ध्यान केले आहे. मी अखंड त्याचेच चिंतन करत तेच बनून गेले. ते जे काही मला सांगतात - ब्रम्हसूत्र, शिवसूत्र, प्रेमसूत्र ते मी लिहिते.
' अग्नी मिले ' या वेदाच्या आद्य ध्वनीमधून माझा जन्म झाला. मी परमेश्वराचे शब्दरूप आहे. म्हणून मला नेहमी त्यांचा आवाज ऐकू येतो. शब्दभेदी म्हणजे ध्वनीच्या रोखाने बाण सोडून सावज टिपणे. तो बाण अचूक सावजाचा वेध घेतो. माझे ध्येय केवळ स्वामी आहेत. माझे कान केवळ त्यांचा आवाज ऐकतात. जर ध्वनी नसेल तर आकाशही नसेल. जर आकाश नसेल तर सृष्टी नसेल. ध्वनी सर्वव्याप्त आहे. हे सर्वव्याप्त शब्दब्रम्ह मी ऐकले आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा