ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपले भाव आपल्या जीवनिर्मितीस जबाबदार असतात."
भाग - नववा
आत्मगीते
' परिपूर्णतेच्या दिशेने आत्म्याचा प्रवास म्हणजे भक्ती '
तरुण वयापासूनच परमेश्वराच्या तृष्णेने मला वेडेपिसे बनवले. मी त्याच्या शोधात धावत होते. श्रीरंगनाथ हे आमचे कुलदैवत. त्याच्या अनेक फोटोंनी आमचे घर सुशोभित झाले होते. प्रत्येक दरवाज्यावर त्यांचे चित्र होते. आम्ही कुटुंबीय वरचेवर श्रीरंगमला जात असू. असेच एकदा आम्ही तेथे गेलो असताना मी श्री रंगनाथाच्या चरणांवर लोटांगण घातले आणि शेकडो गीते लिहायला सुरुवात केली. माझे समाधान झाले नाही. त्यानंतर मी गीतांमधून माझे भाव व्यक्त केले. तिरुपतीला साद घालणारी १०० गीते लिहून त्यांच्या चरणी अर्पण केली . मी गुरुवायूर , तिरुमलीरुंचोलाई, मदुराई कुडलळगर तिरुकण्णापूरमचे श्री सौरीराजर, कांची श्री-वरदराज तिरुमोखूर या सर्वांवर गीते रचली.
५० ओव्यांच्या रचनेमधून मी आंडाळची जीवनकथा रचली. मी आंडाळ होऊन जगले. तिचे आणि माझे भावविश्व एकच होते या कविता म्हणजे माझ्या उत्कट भक्तीचे फळ होते . माझे वडील मधुर कवी आळ्वार यांच्यामध्ये आंडाळचे वडील पेरियाळ्वर यांचा अंश होता .
हा पद्यसंग्रह म्हणजे माझ्या गीतांचा आणि काव्यांच्या जगताची छोटीशी झलक आहे. ही गीते म्हणजे माझ्या आत्म्याने गेली ५० वर्षे काकुळतेने मारलेल्या हाकाच आहेत.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा