गुरुवार, १६ जुलै, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रत्येक गोष्टीत चांगले पाहा तोच परमेश्वर होय. " 

भाग - नववा 

आत्मगीते 

कूडलळगर 

सहस्रनामधारी प्रभुवराशी 
योग झाला माझ्या जीवनाचा 
संहार झाला माझ्या अनंत कर्मांचा 
केवढे हे आश्चर्य ! बदलून गेले सारे काही 
मज उमगले सत्य, सारे विश्वचि माझे आप्त 
ही कृपा त्या प्रभुवरची, प्रभुवरची. 

          अशा अनेक कविता मी लिहिल्या आहेत. मी अत्यंत प्रेमाने परमेश्वाचा महिमा गायला आहे. मी त्याच्या चरणांशी संपूर्ण शरणागती पत्कारली आहे. माझे रक्षण करण्यासाठी मी त्याच्या विनवण्या केल्या आहेत. त्याने मला योग्य मार्गावर आणावे यासाठी अश्रू ढाळले आहेत. माझ्यामध्ये बदल घडव असे त्याला सांगण्याऐवजी मी कवितांमधून माझे भाव व्यक्त केले आहेत कारण माझ्या हाकांना प्रतिसाद मिळत नव्हता.
 
*

परमेश्वर आला वास्तव्यास 
माझ्या हृदयमंदिरी 
वाग्बाण बनले मधुर मधाळ 
कोठे आहे अज्ञान ?
कोठे आहे मन ?
कोठे आहे संभ्रम ?
ही सारी किमया त्या करुणाघनाची 
हे कोण जाणते ?
हे कोण जाणते ?

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा