ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" समस्या धावत्या मेघांसारख्या असतात. केवळ भक्ती म्हणजेच मुक्ती होय. "
भाग - नववा
आत्मगीते
गुरुवायूरचा भगवान कृष्ण
हे गुरुवायूरपूर श्रीहरी कृष्णा
कोण बनून दूत
सांगेल त्या प्रभुवरास
मम प्रेमाचा उत्कट आवेश
रोमांचित देह, ब्रम्हानंदी लीन
ईशप्राप्ती माझ्या अस्तित्वाचे प्रयोजन
सर्वव्यापी प्रभुपरमेश्वर
जाणत नाही का माझी अवस्था ?
ज्या दिवशी आत्मचरित्रासाठी मी ही कविता निवडली त्या दिवशी एक भक्त गुरुवायूरच्या श्रीहरीचा फोटो घेऊन आले. मी म्हणाले, " त्याला निश्चितच माझी मनोदशा माहीत आहे."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा