ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपले विधिलिखित ब्रह्मदेव लिहीत नसून आपले आपणच लिहितो. "
भाग - नववा
आत्मगीते
परमेश्वर आला वास्तव्यास
माझ्या हृदयमंदिरी
वाग्बाण बनले मधुर मधाळ
कोठे आहे अज्ञान ?
कोठे आहे मन ?
कोठे आहे संभ्रम ?
ही सारी किमया त्या करुणाघनाची
हे कोण जाणते ?
हे कोण जाणते ?
*
कोरीले तव रूप मी मम हृदयी हे माधवा, मथुराधिपते !
शोधिता मी अन्य आश्रय
थट्टा करिती जन तुझी नी माझी
ह्या दोन गीतांमधून माझ्यामध्ये परिवर्तन कसे घडले हे दिसून येते. सहस्रनामधारक परमेश्वर माझ्याशी एकरूप माझ्या सर्व कर्मांचा नाश झाला. संपूर्ण विश्व मला आपलेसे वाटू लागले. हे विश्वचि माझे घर, सर्वजण माझे आप्तस्वकीय ही भावना मनात निर्माण झाली. परमेश्वराने माझ्या हृदयात प्रवेश करताक्षणीच ही किमया घडून आली. मायेचा अंधःकार, मनाचे अज्ञान दूर झाले. सर्वत्र माधुर्य भरून राहिले. ही त्या परमेश्वराचीच कृपा आहे.
*
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा