ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रेम हे नाम, रूप, स्थळ आणि काळ या सर्वांच्या पलीकडे आहे. "
भाग - नववा
आत्मगीते
मध्यरात्री प्रवेश केलास तू नंदघरी, महद्आश्चर्य !
कपटवेषधारी असुरांचा केलास तू वध, महद्आश्चर्य !
ह्या दीन जीवाच्या कर्मसंहारास सहाय्य न केलेस तू,
तर जग काय म्हणेल हे महाप्रभू ?
कृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात झाला अन् मध्यरात्री त्याला नंदाच्या घरी नेले गेले. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले. वसुदेव आणि देवकीच्या हातांतल्या बेड्या गळून पडल्या. यमुनेने मार्ग दाखवला. आदिशेषाने पावसापासून त्याचे रक्षण केले. यशोदेचे तान्हुले आणि कान्हा यांची अदलाबदल करण्यात आली. वेगवेगळी रूपे धारण केलेल्या अनेक असुरांचा वध करून त्याने अनेक लीला दाखवल्या. माझ्या कर्मांचा संहार करण्यासाठी तो आपली लीला दाखवणार नाही का ? जर त्याचे सामर्थ्य व लीला मला बदलावयास उपयोगी ठरले नाही तर जग त्याच्या महिमेवर विश्वास ठेवणार नाही. सर्वजण त्याची चेष्टा करतील.
*
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा