ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
गुरुपौर्णिमा संदेश
ब्रम्हाने एका विशिष्ट कार्यासाठी सत्यसाईंच्या रूपाने मानवी देह धारण केला आहे. तथापि प्रत्येक जीवाद्वारे कार्यरत असणारे ब्रम्ह हे सत्यसाई ब्रम्हाहून वेगळे आहे. प्रत्येक जीव हा त्याच्या आध्यात्मिक उन्नतीनुसार, त्यांच्या आत्मनिवासी ब्रम्हाची अनुभूती घेतात व त्याला जाणतात. जरी स्वामी मला सांगतात ती सत्य मी प्रकट करत असले तरी ती सर्वांना समजतात असे नाही. त्यांच्या उन्नतीच्या पातळीनुसार त्यांना त्याचे आकलन होते.
श्री सत्यसाई बाबा राधेला दिलेल्या वराची परिपूर्ती करण्यासाठी व आध्यात्मिक क्रांती घडवण्यासाठी येथे आले आहेत. त्यांच्या कृती अशा आहेत की ज्यायोगे ह्या दोन्ही कार्यांची पूर्तता होईल. सर्व त्यांच्या इच्छेनुसारच घडल.
स्वामींना भूत, वर्तमान आणि भविष्य ज्ञात आहे व ते त्यानुसार कृती करतात. त्यांच्या विश्व नाट्यामध्ये काय, केव्हा आणि कसे उघड करायचे हे ते जाणतात. ह्या तिन्ही काळांविषयी मी अनभिज्ञ आहे. मला फक्त एक आणि एकच गोष्ट माहित आहे ती म्हणजे माझे प्रभु सत्यसाई आणि माझे त्यांच्याप्रती प्रेम.
मी वेद, उपनिषदे वा अन्य धर्मग्रंथांमधून ब्रम्हज्ञान प्राप्त केले नाही. तर मी ते प्रेममार्गाद्वारे प्राप्त केले आहे. जर आपण प्रेममार्गावरून वाटचाल केली तर आपण आपल्या विशुद्ध प्रेमाने परमेश्वराला बद्ध करू शकतो. परमेश्वर जो कोणत्याही दोरीने बांधला जाऊ शकत नाही त्याला प्रेमाच्या धाग्याने बांधता येते.
माझा असा अनुभव आहे की प्रेमाला सत्याहून अधिक स्वातंत्र्य असते. प्रेमाला कोणाचेही भय नाही. ते त्याच्या इच्छेनुसार स्वतःला प्रकट करण्यास मुक्त असते. त्याला त्याच्या पसंतीनुसार, कोणत्याही प्रकारे परमेश्वरावर प्रेमवर्षाव करण्याची मोकळीक असते मग चुकीचे आहे वा बरोबर आहे ह्याचा ते विचारही करत नाही.
सत्य प्राप्तीसाठी प्रेममार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे . वेद व अन्य धर्मग्रंथांपेक्षा हा खूप सोपा आहे. जगाला हा मार्ग दाखवण्यासाठी आम्ही येते आलो आहोत. सत्य हेच ब्रम्ह आहे. सत्याच्या प्राप्तीसाठी प्रेममार्गाचे अनुसरण करा. जर आपल्याकडे प्रेम असेल तर ब्रम्ह आपलेच आहे असे समजा.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' Bliss, Bliss, Bliss Part -2 ' ह्या पुस्तकातून.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा