ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमच्या मुखाने केवळ सत्य वदावे, अन्य काही नाही. "
१
मी स्वतःस अलग करते
निर्मात्यापासून निर्मिती कशी होते ? संपूर्ण विश्व ही निर्मिती आहे. हे विश्व परमेश्वरात लय पावणे यालाच प्रलय म्हणतात. जेव्हा ते परमेश्वरापासून प्रकट होतं, तेव्हा त्याला निर्मिती म्हणतात. हे नैसर्गिक चक्र कलियुगाच्या अखेरीस घडतं. हा अवतार प्रेमस्थापना करण्यास आला आहे. म्हणूनच या कलियुगाच्या शेवटी प्रलय होणार नाही. मी विश्वाचे, प्रकृतीचे, निर्मितीचे प्रतिनिधित्व करते. स्वामी हे पुरुष, परमेश्वर आहेत. मी स्वामींमध्ये एकरूप होईन. माझा देह ज्योतीरुपात स्वामींमध्ये संयुक्त होणं हाच प्रलय. त्यांनतर नवीन सृष्टी निर्माण होईल. जेव्हा माझ्या आणि स्वामींच्या देहांच अस्तित्व संपेल, तोच प्रलय असेल. आम्ही पुरुष प्रकृतीतत्व प्रकट करण्यासाठी आलो असल्यामुळे हे घडेल. ही नवनिर्मिती आहे. सत्ययुगाचा, नवनिर्मितीचा जन्म प्रलयाविना होईल.
जेव्हा स्वामींनी ह्या सत्याची उकल केली तेव्हा माझे जराही समाधान झाले नाही. एवढे महान सत्य लिहिण्याची माझी तिळमात्र इच्छा नव्हती. मी त्यांच्यापासून अलग झाले आहे. जोपर्यंत मी परत त्यांच्यात संयुक्त होत नाही, तोपर्यंत मला शांती नाही. मन, बुद्धी,अहंकार आणि पंचेंद्रिये त्यांच्यात एकरूप झाली आहेत, फक्त देह बाकी आहे. माझा देह ज्योतीरूप धारण करून स्वामींच्या देहात संयुक्त व्हायला हवा. तेव्हाच मला शांती आणि समाधान लाभेल. माझा अखेरीस स्वामींशी योग झाला तरच मी त्यांच्यापासून प्रकट झालेय हे सिद्ध होईल.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा