ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार - १७ जानेवारी
" ज्याप्रमाणे मेणबत्ती प्रकाश देण्यासाठी सर्वत्याग करते, त्याप्रमाणे तू तुझा प्रेम भाव जगातील सर्वांमध्ये भरतेस. "
मेणबत्ती लावली की ती दुसऱ्यांना प्रकाश देते. ती पूर्ण नामशेष होईपर्यंत स्वतःस समर्पित करत तेवत राहून प्रकाश देते. सुरुवातीला मेणबत्तीला नाव आणि रूप असते. शेवटी काहीही उरत नाही. मेणबत्तीच्या त्यागामुळे हे सर्व घडतं.
स्वामी माझ्या जीवनाची तुलना चंदनाशी करतात.चंदनाचं लाकूड सहाणेवर घासतात,जेणेकरून सर्वांना त्याचा सुगंध अनुभवता येईल. अगदी तसंच मी सुद्धा सर्वाना मोक्षरूपी सुगंध प्राप्त व्हावा म्हणून माझी काया सातत्यानं झिजवत आहे.हे घडून येण्याकरिता माझं शरीर वैश्विक कर्मे स्वीकारून यातना सहन करतं. अखेरीस माझं शरीर नाहीसे होऊन ज्योतिस्वरूप धारण करेल आणि स्वामींमध्ये विलीन होईल. त्याग आणि प्रेम म्हणजे जणू काही जुळी भावंडं. अवघे विश्व् कवटाळणारं माझं प्रेम मला माझ्या परमेश्वराचाही त्याग करावयास लावतं.
परवा विमलानी एक केळ आणलं आणि म्हणाल्या की, ' ह्या केळ्यात संदेश आहे.' त्यावर कासवावर एक डुक्कर उभं होतं. मी म्हटलं, "हा वराह अवतार कूर्मावतारावर उभा आहे ." त्याच्या बाजूला पाच अग्रांच्या चांदणीसह स्तूप होता . तसंच दोन बाजूना चार हा अंक लिहिलेला होता . आम्ही फोटो काढला . मी स्वामींना लगोलग विचारायला विसरले,म्हणून दुसऱ्या दिवशी विचारलं.
२८ जून २०१६ प्रात: ध्यान
वसंता: स्वामी, कायम काही ना काही प्रश्न का बरं उदभवत असतात? एअर कंडिशनर मध्ये बिघाड झाला आणि माझी गादी ओली झाली .
स्वामी: तुला काहीही होणार नाही, धीर धर.
वसंता: केळ्यावर काय आकार आहेत? मला वाटते, कूर्मावतारावर वराह अवतार आहे आणि जवळ स्तूप आहे.
स्वामी: मी कूर्मावतारात मेरू मंदार माझ्या पाठीवर धारण केला होता. क्षीरसागराचं मंथन केलं गेलं तेव्हा तू, ‘महालक्ष्मी’ बाहेर आलीस.आता मी कुर्माप्रमाणे तुला पाठीवर धारण करतो, आणि तू वराह अवताराप्रमाणे कलीरुपी राक्षसापासून पृथ्वीचा उद्धार करतेस. तू पृथ्वीचं सत्यभुमीत रूपांतर करतेस.
वसंता: हे काय स्वामी? तुम्ही असं का सांगताय ?
स्वामी: हे सत्य आहे. तू पृथ्वीला मुक्त करून स्तूप रुपी अश्वत्थ वृक्षाचं रोपण करतेस.
वसंता: स्वामी, ते हिऱ्यांचे आकार काय आहेत? आणि ते 'चार' अंक ?
स्वामी: तू 'dai mind' द्वारे सर्वाना diamonds बनवतेस . तुझ्या द्वारे चार आश्रम आणि चार युगं परिपूर्ण होतात.
वसंता: मला कळलं स्वामी. तुम्ही जर रोज ‘केस आणि केळ’ संदेश दिलेत तर खूप उत्सुकता वाटेल. स्वामी तुम्ही यायला हवं.
स्वामी: मी येईन. धीर धर .
ध्यान समाप्त.
आता आपण पाहुयात. देव आणि दानवांना जेव्हा क्षीर सागराचे मंथन करायचं होतं तेव्हा मंदार पर्वत कूर्मावताराच्या पाठीवर ठेवला होता.पर्वत समुद्रात बुडू नये म्हणून परमेश्वरानं पर्वताचं वजन पेलण्याकरिता अवतार धारण केला. सागराचे मंथन करत असताना महालक्ष्मी बाहेर आली. तिने योगनिद्रेत स्थित महाविष्णूला हार घातला. प्रभू क्षीरसागरात आदी शेषावर पहुडले होते, महालक्ष्मी त्यांची चरण सेवा करू लागली.
भगवंताच्या दहा अवतारांपैकी एक अवतार कूर्मावतार. हा अवतार वराह अवताराच्या आधी येतो. हे जगत हिरण्याक्ष ह्या राक्षसापासून वाचवण्यासाठी प्रभुनी हा अवतार घेतला. स्वामींनी केळ्यावर हे दोन अवतार दाखवले. ध्यानात स्वामींनी मला सांगितलं की, ‘त्यांनी कूर्मावतार घेतल्याचं तसंच ते मला धारण करत असल्याचं प्रतीक आहे.’ मला 'मी', अहंकार नाही त्यामुळं मी स्वतः ठामपणे उभी राहू शकत नाही. मी वराह अवतारासारखी 'त्या'च्यावर उभी राहून कली राक्षसाच्या पकडीतून पृथ्वीला सोडवते . कली राक्षस सर्वांच्या मनात घुसलाय आणि त्यांना दुराचार करण्यास प्रवृत्त करत आहे . मानव धार्मिक मार्ग विसरलाय, सत्य वचन विसरलाय. सर्वांमध्ये दुर्गुणांचा जसं की, काम,क्रोध,लोभ, मत्सर,तिरस्कार यांचा प्रादुर्भाव झालाय. माणूस खरं प्रेम म्हणजे काय हेच विसरून गेलाय.
मानवी जीवनाचा उद्देश काय हे शिकवण्याकरिता हा सर्वोत्तम अवतार अवतरला . भगवत्प्राप्तीसाठी; अजन्मा अवस्था प्राप्त करण्यासाठीच केवळ आपल्याला हा मानवी जन्म मिळाला आहे . मनुष्याच्या 'मी आणि माझं' ह्या भावनांमुळे तो कायमचा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकला आहे . स्वामींची अपरंपार करुणा आणि प्रेम ह्यांमुळे त्यांनी ८४ वर्षे ही शिकवण दिली .
मी आजीवन तप केलं. त्याचं फळ म्हणून मी वैश्विक मुक्तीचा वर मागितला. माझ्या कठोर, एकाग्र,आणि सातत्याने केलेल्या तपामुळे स्वामींना मला हा वर देणं भाग आहे. तरीही हा वर साध्य करण्याकरता स्वामींनी आणि मी सर्वांची कर्मे आमच्यावर घेऊन खूप यातना सहन केल्या. ह्या रीतीनं आम्ही कलीरुपी राक्षसाला जगामधून घालवून देत आहोत. आमच्या ह्या कार्याद्वारे लोकं रिक्त होतात, आणि मग त्यांच्या मध्ये स्वामींचं सत्य आणि माझ्या प्रेमाचा शिरकाव होतो. अशा रीतीनं आम्ही पृथ्वीवर अश्वत्थ वृक्षाचं रोपण करतो . मुक्ती निलायम मधील स्तूप हा तो अश्वत्थ वृक्ष आहे जेथून नव सृष्टीची निर्मिती होते . भगवत गीतेच्या १५व्या अध्यायात पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात श्री कृष्ण घोषित करतात,
ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्
छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्
अधश्चोर्ध्वं प्रस्तुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला:
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके
आदिपुरुष परमेश्वररूपी मूळ असलेल्या, ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूप अश्वत्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसाररूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे.
त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्यानं वाढलेल्या, तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या, देव, मनुष्य आणि पशु-पक्ष्यादि योनीरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत. तसेच मनुष्य योनीत कर्मांनुसार बांधणारी अहंता, ममता, आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत.
तथापि मानव ह्या अश्वत्थ वृक्षाचा संसार सागररूपी वृक्ष बनवितो. प्रत्येकाने ह्या वृक्षाची मुळे तीव्र वैराग्याच्या तलवारीने कापायलाच हवीत. तरच तुम्हाला ह्या वृक्षाचं मूळ जे स्वर्ग आहे ते प्राप्त होईल. साधनेद्वारा तुम्ही हे प्राप्त करू शकता . भगवान हे आपलं खरं मूळ आहे . सर्वांनी त्यास प्राप्त केलेच पाहिजे . ती वेळ येईपर्यंत तुम्हाला पुनः पुन्हा जन्मास यावेच लागणार . पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग हे शिकवितो . मी मानवाला कलीरूपी राक्षसाच्या कचाट्यातून सोडवते आणि पृथ्वीवर सत्ययुग आणते .
केळ्यावर स्तूपाच्या बाजूला एक हिऱ्याचा (Diamond) आकार होता . माझ्या कठोर प्रयत्नांद्वारे मी सर्वांची मने नाहीशी (die mind) करते . सर्वांची मनं रिक्त होतात. दोनदा लिहिलेला अंक ४ सुचवितो की, चार युगं आणि चार अवस्था; ब्रह्मचर्य,गृहस्थ, वानप्रस्थ, आणि संन्यास पूर्ण स्थिती प्राप्त करतात. आम्ही प्रत्येक युगाच्या त्रुटी भरून काढतो. सत्य युगात सर्व काही परिपूर्ण, निर्दोष होते .
२८ जून २०१६ मध्यान ध्यान
वसंता: स्वामी, तुमच्या हाताचा ठसा माझ्या खुर्चीवर दिसला होता. तुम्ही माझा भार वाहता हे यामधून दिसून येतं . याचा अर्थ काय ?
स्वामी: मी तुला वाहतो.
वसंता: म्हणजे काय स्वामी?
स्वामी: म्हणजे तुला 'मी' (अहंकार) नाही आहे, तू स्वतःस रिक्त केलंस, आणि मी 'मला' तुझ्यात भरलं. म्हणून मी तुला वाहतो .
वसंता: आता मला कळलं स्वामी. तुम्ही लवकर या .
स्वामी: मी येईन.
वसंता: स्वामी, मला हा खोकला सहन होत नाहीये आणि त्यातच उद्या न्हायचं आहे.
स्वामी: तू उद्या न्हाणं कर, मी सर्व काही करीन.
ध्यान समाप्त .
आता आपण पाहुयात. ज्या दिवशी माझ्या खुर्चीवर बसायच्या जागी मी हाताचा ठसा पाहिला तेव्हापासून माझ्या मनात एकच विचार होता ,'का? का बरं ?' माझ्या तपाद्वारे मी अनेक अवस्था प्राप्त केल्या; परंतु मी त्या सर्व दूर सारल्या आणि स्वामींना सांगितलं की त्यांनी मला रिक्त करावं. माझ्या तपाची सर्व फळं त्यांनी स्वीकारावी असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी सर्व स्वीकारलं आणि त्यांचं सत्य ह्या रिकाम्या पात्रात (माझ्यात) भरलं . मी माझं पहिलं पुस्तक लिहीत असताना स्वामींनी मला त्यांची अनेक रूपं माझ्या संपूर्ण रक्तात प्रवाहीत झालेली दाखविली होती . केवळ तेच माझ्यामध्ये कार्य करतात; तेच सर्वकाही करतात . मी शून्य आहे, शून्यच आहे. हनुमंतानं जसा संजीवनी पर्वत खांद्यावर वाहून आणला त्याप्रमाणे ते मला त्यांच्या डाव्या हातावर तोलत आहेत. हनुमंतानं पर्वत उजव्या हातावर तोलला तर स्वामी मला डाव्या हातावर तोलतात.
एकदा स्वामींनी स्तूपाचं चित्र दिलं होतं, त्यात स्तूप प्रकाशमय होता . हा स्तूपच जगास ज्ञानदीपाचा प्रकाश बहाल करतो . मी माझ्या आणि स्वामींच्या भावतरंगांबाबत सर्व पुस्तकांमध्ये लिहिले आहे . माझं लिखाण जगातून अज्ञानाचा अंधार दूर करत ज्ञानाचं तेज फाकविते . कलियुगात ज्ञानाचा उजेड पसरत ते सत्य युगात परिवर्तित होते .
'दहा अवतार एकात' ह्या माझ्या पुस्तकात मी एक गाणं उधृत केलंय, त्यात दहा अवतारांसंबंधी मी लिहिलंय. सर्वोत्तम अवतार भगवान सत्य साई बाबा हे,केवळ हे जग नव्हे तर हे युगच बदलण्यासाठी अवतरले आहेत. ते एकाच अवतारात दहा अवतार आहेत.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा