ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
श्री वसंतसाईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने
रत्न - ४
भाव - मूळ कारण
जेव्हा मनात विचार उद्भवतात, तेव्हा ते चांगले आहेत का वाईट हा भेद आपण करू शकतो परंतु ह्या प्रकारे मनातील भाव आपण समजून घेऊ शकत नाही. *भाव अंतरंगातून अचानकपणे उफाळून येतात* आणि त्यांना खीळ घालता येत नाही वा नियंत्रित करता येत नाही.
*सर्व भाव ईश्वराभिमुख करायला हवेत*,ते चांगली फळे बहाल करतील. केवळ भावच मनुष्याची जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तता करतील.
*स्पर्शाची संवेदना हे जन्माचे मूळ कारण आहे.*देहभाव नाहीसा झाल्यानंतरच ही स्पर्शाची जाणीव दूर करता येते.
जशी भक्ती वृद्धिंगत होते तसा देहभाव कमी होतो आणि परमेश्वराप्रती विशुद्ध प्रेमभावच देह बनतो.
प्रेम मनुष्याला,परमेश्वर सर्वांमध्ये आहे;आणि तो एकातून अनेक झाला आहे हे ज्ञान प्रदान करते.
परमेश्वराप्रती असणारे प्रेम,भौतिक सुखापासून पंचेंद्रियांना अंतर्मुख करण्यासाठी मनुष्याला सहाय्य करते.
-- श्री वसंत साई अम्मा
🌸ॐ श्री साई वसंत साईसाय नम:🌸
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा