ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे, अन्य कशालाही नाही. "
१
मी स्वतःस अलग करते
मी स्वामींचा ध्यास घेऊन रडत राहिले, तेव्हा त्यांनी आम्ही कोण आहोत याविषयी उच्चस्तरीय सत्य प्रकटन केले. ते म्हणाले, ' मी पुरुष आणि तू प्रकृती आहेस.' त्यांनी विस्तृतपणे समजून सांगितलेली सत्याची गुपितं मी ' उपनिषदांपलीकडे ' आणि ' वेदांपलीकडे' ह्या पुस्तकांमधून लिहिली आहेत. ' साई डायजेस्ट ' या पुस्तकात मी परमेश्वराला कसे ' खाते आणि पचवते' लिहिले आहे. तरीसुद्धा माझी परमेश्वराची तृष्णा तृप्त झाली नाही व साधनाही थांबली नाही. ही माझी न शमणारी तृष्णा आहे. कारण मी या पृथ्वीवर अवतरित होण्यासाठी त्यांच्यापासून अलग झाले आहे. मी त्यांना अगदी सेकंदाचा एक अंश इतका वेळही विसरू शकत नाही. मला फक्त त्यांच्याशी संयुक्त होण्याची इच्छा आहे. अशी भक्ती असलेलं कोणी या पृथ्वीतलावर असू शकेल का ?
माझ्या संपूर्ण जीवनाच्या स्थित्यंतरात, मी कोण आहे याचे स्वामी पुरावे देत आहेत. स्वामी म्हणाले की एप्रिल २००२ मध्ये वसिष्ठ गुहेत मी स्वामींमध्ये एकरूप झाले. एक महिन्यानंतर व्हाईटफिल्डला त्यांच्या एका फोटोद्वारे त्यांनी याचा पुरावा दाखवला. त्यांच्या फोटोच्या अर्ध्या भागावर गुलबक्षी रंगाच्या पाकळ्यांचे आकार साक्षात् झाले. स्वामी म्हणाले, " तू माझ्या अर्ध्या देहात व्याप्त झालीस. " मी म्हणाले, " मी यात समाधानी नाही. मला तुमचा देह पूर्णत्वाने हवा आहे. " ही इच्छा हेच दर्शवते की मी त्यांची चित्शक्ती आहे.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात.....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा