ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराचे अखंड चिंतन म्हणजे परमेश्वराचे अखंड सान्निध्य."
१
मी स्वतःस अलग करते
मी काय साधना केली ? माझी साधना म्हणजे फक्त प्रेम. मला फक्त परमेश्वरावर प्रेम करणे इतकेच ठाऊक आहे. या प्रेमानी मला परमेश्वराजवळ अनेक वर मागण्यास प्रेरित केले. हे वर मी त्यांच्यापासून कधीही अलग होऊ नये या एकाच भावनेच्या आधारावर होते.
धोब्याने राम आणि सीतेला अलग केले. श्रीकृष्ण आणि राधेने त्यांच्या प्रेमाची निर्मळता जगाला दाखवली, तरीही जगाचा गैरसमज झाला. म्हणूनच मी स्वामींना सांगितले की जगात कोणीही व्यक्ती अज्ञानी असू नये, फक्त ज्ञानानी परिपूर्ण असे आत्मे असावेत. त्यांनी अवताराच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये. विश्वामुक्तीचा वर हा खरं तर जगातून अज्ञान दूर करण्यासाठीच परमेश्वरापासून पुन्हा अलग व्हावे लागू नये म्हणून मी विश्वमुक्ती मागते आहे.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा